प्राग्दृष्टिकर्म्मखचरस्तनुतोऽल्पकोऽस्तात्पुष्टश्र्च दृश्य इह खेचरभोग्यकालः ॥
लग्नेन युक्च विवरोदययुग्द्युयातः स्यात्खेचरस्य सितगोर्यदि गोपलोनः ॥१॥
अर्थ -
रात्री जेव्हां अभीष्टग्रहाचा दिनगत काल आणावयाचा असेल तेव्हां पूर्व दृक्कर्म दत्र अभीष्ट ग्रह आणि तात्कालिक लग्न हीं आणावीं . नंतर पूर्वदृक्कर्म दत्र अभीष्ट ग्रह जर तात्कालिक लग्नापेक्षां कमी आणि षड्शियुक्त तात्कालिक लग्नांपेक्षां अधिक असेल तर रात्रीं त्यावेळीं तो ग्रह दृश्य होईल . नंतर दृक्कर्मदत्र ग्रहापासून आणलेला भोग्यकाल , तात्कालिक लग्नाचा भक्तकाल , आणि तात्कालिक लग्न . आणि दृक्कर्म दत्रग्रह ह्यांच्यामधील पलात्मक उदयांची बेरीज करावी . म्हणजे अभीष्ट ग्रहाचा घटिकादि दिनगत काल येतो . परंतु जर चंद्राचा दिनगत काल आणणें असेल तर वरच्या रीतीनें आणलेल्या कालांतून ९ पलें वजा करावीं .
उदाहरण .
शके १५३२ वैशाख शुद्ध ९ , शनिवार १० घटिका रात्रीस चंद्राचें छाया साधन . अहर्गण ७७७ , प्रातःकालीन मध्यमग्रह रवी ० राशि २० अं . ५६क . २२ विकला ; चंद्र ३ रा . २६अं . ५८क . ३विक . , उच्च ७ रा . २२अं . ४क . ६विक ., राहू २ रा . २३अं . ४७क . ३विक . स्पष्टीकरण - रविमंद केंद्र १ रा . २७अं . ३क . ३८विक ., मंदफलधन १अं . ४९क . ४०विक ., मंद स्पष्टरवि ० रा . २२अं . ४६क . २ विक ., अयनांश १८क . ८ चरऋण ७३ विकला , स्पष्टरवि ० रा . २२अं . ४४क . ४९विक . स्पष्टगति ५७क . ५८ विक . त्रिफलचंद्र ३ रा . २६अं . ३५क . १३ विक ., मंदकेंद्र ३ रा . २५अं . २८ कला ५३ विकला , मंदफल धन ४अं . ३२क . ०विक ., स्पष्टचंद्र ४ रा . १अं . ७क . १३विक ., स्पष्टगति ८१९ कला १९ विक ., स्पष्टगति ८१९ कला १९ विक ., दिनमान ३२ घटी २६ पलें + १० घटिका = सूर्योदयापासून एकंदर गत घटी ४२ पलें २६ याचें चालन देऊन आणलेलें ग्रह .- रवि ० रा . २३अं . २५क . ४८विक ., चंद्र ४ रा . १०अं . ४६क . ३९विक ; राहु २ रा . २३अं . ४४क . ४८विक ., व्यगुविधु १ रा . १७अं . १क . ५१ विकला ; चंद्रशर उत्तर ६५ अंगुलें ४४ प्रतिअंगुलें . ३ राशिरहित चंद्रापासून ( १ रा . १०अं . ४६क . ३९वि .) आणलेली क्रांति उत्तर २०अं . १९क . ३९ विकला ; अक्षांश दक्षिण २५अं . २६क . ४२वि . नतांश दक्षिण ५अं . ७क . ३ विक . पूर्व दृक्कर्म कला ऋण १९ .. १९ विकला दृक्कर्म दत्रचंद्र ४ रा . १०अं . २९क . ५० विकला ; १० घटिका रात्रीचें लग्न ८ रा . १६अं . २४क . २२विक . आतां दृक्कर्म दत्रचंद्र लग्नापेक्षां कमी आणि षड्राशी युक्त लग्नापेक्षा ( २ रा . १६अं . २४क . २४विक .) अधिक आहे म्हणून चंद्र दृश्य आहे . दृक्कर्मदत्त चंद्रापासून आणलेला भोग्यकाल १५ पलें + लग्नापासून आणलेला भक्तकाल ४६ पलें + दृक्कर्म दत्रचंद्र आणि लग्न यांच्यामधील उदयांची बेरीज म्हणजे सिंहोदयापासून मकरोदयापर्यंत उदयांची बेरीज १३५७ = १४१८ पलें = २३ घटी ३८ पलें यांत ९ पलें वजाकरून २३ घ . २९प . हा चंद्राचा स्पष्टदिनगत काल झाला .
ग्रहाचें दिनमान .
जिनाप्तोऽक्षाभाघ्नोऽङ्गुलमयशरोऽनेन तु चरं स्फुटं संस्कृत्यातो दिनमथ खगस्य द्युविगतात् ॥
प्रभाद्यं संसिद्ध्य़ेदथ खचरभादेर्निशि गतं व्रुवेऽथारादिनां द्युतिपरिगमं यन्त्रवशतः ॥२॥
अर्थ -
शरास पलभेनें गुणून २४ नीं भागावें जो पलात्मक भागाकार येईल तो शर उत्तर असेल तर उत्तर आणि दक्षिण असेल तर दक्षिण असें जाणावें आणि दृक्कर्म दत्र यापासून चर आणून तें , ग्रह उत्तर गोलीय आहे तर उत्तर आणि दक्षिण गोलीय आहे तर दक्षिण असें जाणावें . नंतर पलात्म्क भागाकाराचा आणि चराचा संस्कार करावा म्हणजे ते स्पष्टचर होतें . मग त्या चरापासून दिनमान साधावें , तें अभीष्ट ग्रहाचें दिनमान होतें . नंतर अभीष्ट ग्रहाचें दिनमान आणि दिनगत काल यांपासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्याप्रमाणें अभीष्ट ग्रहाची इष्ट छाया आणावीं .
उदाहरण .
शर उत्तर ६५ अंगुलें ४४ प्रति अंगुलें पलभा ५ अंगुलें ४५ प्रति अंगुलें ( = ३७७ अंगुलें ५८ प्रति अंगुलें ) ÷ २४ =१५ पलें ; हा भागाकार शर उत्तर म्हणून उत्तर +दृक्कर्मदत्र चंद्रापासून आणलेलें चर उत्तर ५९ पलें = ७४ पलें हें स्पष्ट चर झालें ; हें दृक्कर्मदत्र चंद्र उत्तर गोलीं आहे म्हणून धन . म्हणून ७४ पलें + १५ घटी = १६ घटी १४ पलें = दिनार्ध , म्हणून ३२ घटी २८ पलें हें चंद्राचें दिनमान झालें . यांतून दिनगतकाल २३ घटी २९ पलें वजा केल्यानें शेष काल . ८ घटी . ५९ पलें हा पश्र्चिमोन्नत काल झाला . हादिनार्धांतून (१६घ . १४प .) वजा करून बाकी ७ घटी १५ पलें हा पश्र्चिम नत काल झाला . यावरून आणलेला अक्षकर्ण १३ अंगुलें २९ प्रति अंगुलें ; हार १२८ अं . ५६ कला , सामाख्य ३० ..१ , इष्टहार ७ ..२५ , भाज्य ११ ..७ ..५५ , कर्ण १५ अंगुलें ५३ प्रति अंगुलें , इष्ट छाया १० अंगुलें ३४ प्रति अंगुलें .
वेधानें ग्रहछाया साधन .
पश्येज्जलादौ प्रतिबिम्बितं वा खेटं दृगोच्च्यं गणेयेच्च लम्बम् ॥
तं लम्बपातप्रतिबिम्बमध्यं दृगौच्च्यत्दृत्सूर्य्यहृतं प्रभा स्यात् ॥३॥
अर्थ -
पाण्यांत किंवा आरशांत अभीष्ट ग्रहाचें प्रतिबिंब पाहून आपल्या दृष्टीपासून एक ओळंबा सोडून तो सपाटीस लागला म्हणजे त्याची अंगुलात्मक लांबी मोजावी . मग ओळंबा आणि प्रतिबिंबाचा मध्य ह्यांच्या मधील अंगुलात्मक अंतर सपाटीवर मोजून त्यास १२ नीं गुणावें आणि ओळंव्याच्या लांबीनें भागावें . म्हणजे अभीष्ट ग्रहाची अंगुलात्मक इष्ट छाया होतें .
ग्रहाचे छायेवरून दिनगत कालसाधन .
ज्ञात्वाऽनुमानान्निशि यातनाडीस्तत्कालखेटात्कथितैश्र्चराद्यैः ॥
दृष्टप्रभादेर्द्युगतो ग्रहस्य साध्यस्त्विहेन्दोर्यदि गोपलाढ्यः ॥४॥
अर्थ -
जेव्हां ग्रहाचा वेध केला असेल तेव्हां किती रात्री झाली . तें अनुमानानें काढून त्यावेळचा ग्रह , स्पष्टचर , आणि दिनमान ही आणावीं . ह्यांपासून आणि ग्रहाच्या इष्ट छायेपासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्या रीतीनें अभीष्ट ग्रहाचा दिनगत काल आणावा . हा काल चंद्राचा असल्यास त्यांत ९ पलें मिळवावीं .
उदाहरण .
रात्री चंद्र पाहिला तेंव्हां अनुमानानें १० घटिका रात्र झाली होती म्हणून त्यावेळच्या चंद्रापासून आणलेलें स्पष्टचर ७४ पलें , व दिनमान ३२ घटी २८ पलें आहे ; आणि वेधानें आणलेली इष्ट छाया १० अंगुलें ३४ प्रति अंगुलें आहे म्हणून यांपासून आणलेला कर्ण १५ अंगुलें ५३ प्रति अंगुलें , भाज्य ११ ७ ..५५ , इष्ठ हार ७ ..२५ , अक्षकर्ण १३ अंगुलें १९ प्रति अंगुलें , हार १२८ ..५६ , आणि पश्र्चिमनत ७ घटी १५ पलें . म्हणून दिनार्ध १६ घटी १४ पलें + पश्र्चिमनत ७ घटी १५ पलें = २३ घटी २९ पलें . यांत ९ पलें मिळविल्यानें २३ घटी ३८ पलें हा चंद्राचा दिनगत काल झाला .
ग्रहोदय कालसाधन .
प्राग्दृक्खचराङ्गभाढ्यभान्वोरल्पोऽर्कस्त्वपरस्तनुस्तदन्तः ॥
कालः स खगोदये द्युशेषो रात्रीतः क्रमशो ग्रहेऽल्पपुष्टे ॥५॥
अर्थ -
पूर्व दृक्कर्म दत्रग्रह आणि षड्शियुक्त रवि यामध्यें जो कमी असेल त्यांस रवि आणि अधिक असेल त्यास लग्न असें मानून त्यांपासून अभीष्टकाल आणावा म्हणजे पूर्व दृकर्मदत्रग्रह षडाशियुक्त सूर्यापेक्षां कमी आहे तर ग्रहोदय होताना अभीष्ट काल इतका दिवस राहील आणि पूर्वदृक्कर्मदत्रग्रह षड्राशियुक्त सूर्यापेक्षां अधिक आहे तर ग्रहोदय होतांना अभीष्ट काला इतकी रात्र होईल असें जाणावें .
उदाहरण .
पूर्व दृक्कर्मदत्रचंद्र (४ रा . १०अं . २९क . ५०वि .) आणि षड्राशियुक्त सूर्य (६रा . २३अं . २५क . ४८विक .) यांमध्ये चंद्र कमी आहे म्हणून चंद्र तो रवि - ४ रा . १०अं . २९क . ५० विकला मानून आणलेला भोग्यकाल १५ पलें , आणि रवि हेच लग्न ६ रा . २३अं . ५५क . ४८ विकला मानून आणलेला भक्तकाल १३३ पलें , आतां भोग्यकाल पलें १५ + भुक्तकाल पलें १३३ + (रवि व लग्न यांच्यामधील उदय पलें ) कन्या ३५५ पलें + तूळ ३३५ पलें = ८१८ पले = १३ घटी ३८ पलें हा इष्ट काल झाला . आतां चंद्र षड्राशियुक्त रवीपेक्षां कमी आहे म्हणून १३ घटी ३८ पलें शेष दिवस असतां चंद्रोदय होईल .
सूर्यास्तापासून ग्रहावलोकना पर्यंतचा काल .
तेनोनोऽथ च सहितो ग्रहद्युयातः स्यादर्कास्तसमयतो निशि प्रयातः ॥
चेद् ग्लावोऽनुमितघटीष्वतोऽल्पपुष्टं द्विघ्नं तत्समपलयुग्वियुक्स्फुटः सः ॥६॥
अर्थ -
ग्रहाच्या दिनगत कालांत दिनशेष काल वजा करावा , आणि रात्रि गतकाल आला असेल तर तो मिळवावा म्हणजे सूर्यास्तापासून ग्रहवेधापर्यंत काल येतो . परंतु हा काल चंद्राविषयी असून अनुमानाच्या घटिकांपेक्षा अधिक किंवा कमी असेल तर त्या दोहों कालांच्या अंतरास २ नीं गुणून तो पलात्मक गुणाकार वेधीय कालांत कमी किंवा अधिक करावा म्हणजे चंद्राचा वेधीयकाल स्पष्ट होतो .
उदाहरण .
चंद्राचा दिनगत काल . २३ घटी ३८ पलें - दिनशेष काल १३ घटी ३८ पलें = १० घटी हा सूर्यास्तापासून चंद्रवेधापर्यंतचा काल झाला . हा आणि अनुमानाच्या घटिका (१० ) बराबर आहेत म्हणून हाचस्पष्ट काल झाला .
छायाधिकार समाप्त .