चंद्रदर्शन
सार्कांशाविह कुरु पक्ष तिक्षयेऽर्कव्यवर्को चरमथ केवलाद्य्वगोर्यत् ॥
षड्बाणैर्वित्दृतमिदं क्रमाल्लवाद्यं स्वर्णं स्याद्य्वगुरविगोलयोः पृथक्तत् ॥१॥
त्रिभायनलवार्न्वितारुणचराहतं द्य्वक्षभाहतेः कृतित्दृतं धनर्णमसमैकगोले व्यगोः ॥
खखानलविशेषितः सरसभायनार्कोदयः शरद्विकत्दृतो धनाधनमनल्पकाल्पोदये ॥२॥
द्युमितिप्रतिपद्रमान्तरं यच्छरभक्तं स्वमृणं दिनेऽधिकोने ॥
धनमत्र चतुष्कसंस्कृतिश्र्चेत्तपनास्ते विधुरीक्ष्यतेऽन्यथा न ॥३॥
अर्थ -
अभीष्ट मासाच्या शुद्ध प्रतिपदेच्या अंती स्पष्टसूर्य आणि स्पष्ट व्यग्वर्क हें करून त्या दोघांसही १२ अंश मिळवावे . नंतर व्यग्वर्कांत अयनांश न मिळवितां त्यापासून चर आणावें आणि त्या चरास ५६ नीं भागून जो भागाकार येईल तें अंशादि प्रथम फल होतें . ते व्यगु उत्तर गोलीं असल्यास धन आणि दक्षिण गोलीं असल्यास ऋण असें जाणावें .
स्पष्ट सूर्यास अयनांश आणि ३ राशि हे मिळवून त्यापासून चर आणावें आणि त्या चरास प्रथम फलानें गुणून गुणाकारास पलभेच्या दुपटीच्या वर्गानें भागावें म्हणजे अंशादि द्वितीय फल होतें . तें , त्रिभायन लवान्वित सूर्य आणि व्यगु हे जर एक गोली आहेत , तर ऋण आणि भिन्न गोलीं आहेत तर धन असें जाणावें . स्पष्ट सूर्यास अयनांश आणि ६ राशि हे मिळवून जें येईल त्याचा पलात्मक उदय घेऊन तो आणि ३०० पलें याचें अंतर करावें आणि त्या अंतरास २५ नीं भागून जो भागाकार अंशादि येईल ते तृतीय फल होतें तें , पलात्मक उदय ३०० पेक्षां अधिक आहे तर धन आणि पलात्मक उदय ३०० पेक्षां कमी आहे तर ऋण असें जाणावें .
प्रतिपदेचा अंत आणि दिनमान याचें अंतर करून त्यास ५ नीं भागावें म्हणजे अंशादि चतुर्थ फल होतें . तें , दिनमान प्रतिपदंना पेक्षा अधिक आहे तर धन आणि दिनमान प्रतिपदंतापेक्षा कमी आहे तर ऋण असें जाणावें .
मग या चार फलांचें एकीकरण करून तें धन आलें तर प्रतिपदेस चंद्रदर्शन होईल , आणि जर एकीकरण ऋण आले तर प्रतिपदेस चंद्र दर्शन होणार नाही असें जाणावें .
उदाहरण
संवत १६६७ शके १५३२ माघ शुक्लप्रतिपदा १ शनिवार घ्हती७ श्रवणनक्षत्र घटी २६ पले २५ सिद्धियोग घटी ४० चक्र अहर्गण १०३६ प्रातःकालीन मध्यम रवि ९ राशि ६ अंश १२ कला ३८ विकला .
प्रातःकालीन मध्यम चंद्र ९ राशि ६ अंश ३८ कला ३३ विकला .
चन्द्रोच्च ८ राशि २० अंश ५५ कला १४ विकला .
प्रातःकालीन राहु २ राशि १० अंश ३ कला २५ विकला .
या ग्रहांत पंचांगस्थित ७ घटीचे चालान दिले तेव्हा
मध्यम रवि ९ राशि ६ अंस १९ कला ३१ विकला झाला .
मध्यम चंद्र ९ राशि २१ अंश १० कला ४० विकला झाला .
चन्द्रोच्च ८ राशि २० अंश ५५ कला १४ विकला झाला .
राहु २ राशि १० अंश ३ कला ३ विकला झाला .
आता स्पष्टीकरण लिहीतो -
रविचे मन्दकेन्द्र झाले ५ राशि ११ अंश ४० कला २९ विकला .
मन्दफल घन झाले ० अंश ४१ कला २७ विकला .
मन्दस्पष्टरवि झाला ९ राशि ७ अंश ० कला ५८ विकला .
अयनांश झाले १८ कला ८ विकला चरघन १०६ विकला
चरसंस्कृतस्पष्ट रवि ९ राशि ७ अंश २ कला ४४ विकला
स्पष्टगति ६१ कला १० विकला आणि
त्रिफलसंस्कृतचंद्र ९ राशि २१ अंश २५ कला १२ विकला
मन्दकेन्द्र १० राशि २९ अंश ३० कला २ विकला
मन्दफल ऋण २ अंश ३३ कला ० विकला
संस्कृतस्पष्टचंद्र ९ राशि १८ अंश ५२ कला १२ विकला
चन्द्रस्पष्टगति ७३५ कला १ विकला .
स्पष्टरविचंद्रावरून आणलेली तिथि ० घटि ५६ पळे आहेत म्हणून ५६ पलांचे चालन देऊन
स्पष्टरवि ९ राशि ७ अंश ३ कला ४१ विकला ,
राहु २ राशि १० अंश ३ कला १ विकला तर
व्यगु ६ राशि २७ अंश ० कला ४० विकला होतात .
स्पष्टरवि ९ रा . ७ अं . ३ क . ४१ वि . + १२ अं . = ९ रा . १९ अं . ३ क . ४१ वि . मिळतात .
आता व्यगु ६ रा . २७ अं . ० क . ४० वि . + १२ अं .= ७ रा . ९ अं . ० क . ४० वो . मिळतात .
या अयनांशरहित केवळ व्यगुपासून चर मिळाले ७० याला ५६ ने भाग दिल्यास
अंशादिलब्धि मिळतात १ अंश १५ कला ओ विकला हे प्रथम फल व्युगु दक्षिण गोलीय आहे म्हणून ऋण .
आता सूर्य ९ राशि १९ अंश ३ कला ४१ विकला + १८ अंश ८ कला = १० राशि ७ अंश ११ कला ४१ विकला .
आता १० राशि ७ अंश ११ कला ४१ विकला + ३ राशि = १३ राशि ७ अंश ११ कला ४१ विकला यापासून मिळालेले चर ६८ .
आता १ अंश १५ कला X ६८ = ८५ अंश ० कला ० विकला मिळतात .
यात पलभा ५ अंगुले ४५ प्रतिअंगुले दुप्पट करून त्याला १९ अंगुले ३० प्रतिअंगुले याचा वर्ग १३२ अंगुले १५ प्रतिअंगुलेनी भाग दिला असता
अंशादिलब्धि मिळतात ० अंश ३८ कला ३३ विकला , हे द्वितीय फळ व्यगु आणि सूर्य भिन्न गोलार्धात आहे म्हणून घन .
आता स्पष्टरवि ९ राशि १९ अंश ३ कला ४१ विकला + १८ अंश ८ कला = १० राशि ७ अंश ११ कला ४१ विकला यातून ६ राशि वजा केल्यास
मिळतात ४ राशि ७ अंश ११ कला ४१ विकला . म्हणून ५वे राशिचा सिंहाचा उदय होतो .
आत सिंह राशिच्या ३५४ मधून ३०० वजा केल्यास मिळतात ४५ याला २५ ने भाग दिल्यास मिळतात १ अंश ४८ कला .
हे तृतीय फल पलात्मक उदयाच्या ३०० च्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने घन आहे .
आता दिनमान २६ घटि २८ पले - वजा ७ घटि ५८ पळे = १८ घटि ३२ पळें . याला ५ ने भाग दिल्यास अंशादिलब्धि मिळतात ३ अंश ४२ कला २५ विकला .
हे चतुर्थ फल दिनमानाच्या प्रतिपदन्तच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने घन आहे .
आता द्वितीय फल ० अंश ३८ कला ३३३ विकला + तृतीय फल १ अंश ४८ कला ० विकला + चतुर्थ फल ३ अंश ४२ कला २४ विकला याच्या बेरजेतून
म्हणजे बेरीज झाली ६ अंश ८ कला ५७ विकला यातून प्रथम फल १ अंश १५ कला वजा केल्यास बाकी राहते ४ अंश ५३ कला ५७ विकला या चारही फलांचा
एअकीकरण घन आहे म्हणून सूर्यास्ताच्या वेळेस चंद्रदर्शन होणार .
गुरूचा अस्त आणि उदय .
चक्राढ्यो मधुवक्रमासनिचयो विश्र्वाप्तचक्रोनितो द्विघ्नो युग्दशमासधूर्जटिदिनैर्भैः शेषितो भच्युतः ॥
द्य्वाप्तः स्याद्धमुखः पृथक्तिथिलवैरूनोऽस्य बाह्वंशकार्काप्तांशोनयुतो धटाचरसभे मासाधिकः स्यान्मधोः ॥४॥
तिथिदिनरहिताढ्योऽसौ द्विधा तैश्र्च मासैः क्रमश इह भवेतां भंत्रिणोऽस्तोदयौ च ॥ऽऽ॥
अर्थ -
अभीष्ट वर्षाच्या चैत्रशुद्ध प्रतिपदेस मासगण आणून त्यात चक्र मिळवावें , आणि त्यांतून चक्रास १३ नीं भागून जो भागाकार मासादि येईल तो वजा करावा ; जी बाकी राहील तिला २ नीं गुणून त्या गुणाकारांत १० मांस ११ दिवस हे मिळवावे . नंतर जी बेरीज येईल तिचे मासांस मात्र २७ नीं भागून जी बाकी मासादिक राहील ती २७ मासांतून वजा करावी ; मग जी बाकी राहील तिला २ नीं भागून जो भागाकार राश्यादि येईल त्यांतून १५ अंश वजा करावे . आणि बाकीचा भुज करून त्या भक्तजांशास १२ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो , वरील राश्यादि भागाकार मेषादि आहे तर त्यातच मिळवावा , आणि राश्यादि भागाकार तूलादि आहे तर त्यांतूनच वजा करावा म्हणजे मासादिक येतें . नंतर त्या मासादिकांतून १५ दिवस वजा करून जी बाकी राहील त्या मासादिकाने चैत्रापासून गुरूचा पश्र्चिमेस अस्त होईल आणि त्या मासादिकांत १५ दिवस मिळवून जी बेरीज येईल त्या मासादिकाने चैत्रापासून पूर्वेस गुरूचा उदय होईल असे जाणावे .
उदाहरण .
संवत १६६७ शके १५३२ या वर्षांत गुरू च्या अस्तोदयाचे दिवस आणतों .
१५३२ - वाजा १४४२ =९०
९० ÷ ११ =८ बाकी २
२ X १२ = २४ मध्यम मासगण
२४ +१६ +१० =५० होतात
५० ÷ ३३ = १ भागाकार म्हणून १ अधिकमास झाला .
यात मध्यममास २४ मिळविल्यास २५ मासगण होतात .
२५ मासगण + चक्र ८ = ३३ मास .
यातून चक्र ८ ला १३ ने भाग दिल्यास प्राप्त झालेले मासादिलब्धि ० मास १८ दिवस २७ घटि ४१ पळे वजा केल्यास बाकी राहते
३२ मास ११ दिवस ३२ घटि १९ पळें याला २ गुणल्यास मिळतात ६४ मास २३ दिवस ४ घटि ३८ पळें . यात १० मास ११ दिवस मिळविल्यास
७५ मास ४ दिवस ४ घटि . ३८ पळें मिळतात . याला २७ ने भाग दिल्यास बाकी राहते २१ मास ४ दिवस ४ घटि ३८ पळें .
ही बाकी २७ मधून वजा केल्यास बाकी राहते५ मास २५ दिवस ५५ घटि २२ पळें . याला २ भाग दिल्यास भागाकार येतो
राश्यादि २ राशि २७ अं . ५७ कला . ४१ विकला . यातून १५ अंश वजा केल्यास बाकी राहते २ राशि १२ अंश ५७ कला ४१ विकला .
याचे भुजांश झाले ७२ अंश ५७ कला ४१ विकला . ( कारण २ राशि म्हणजे ६० अंश )
याला १२ ने भाग दिल्यास भागाकार ६ अंश ४ कला ४८ विकला येतो .
वरील भागाकार मेषादि आहे म्हणून + ६अं . ४क . ४८विकला . भागाकार २ रा . २७अं . ५७क . ४१ वि . मासादिक ३ मा . १९ दि . २घ . २९ पलें इतक्या कालानें पश्र्चिमेस गुरूचा अस्त होईल , आणि ३ मा . १९ दिवस २ घ . २९ पलें इतक्या कालानें पूर्वेस गुरूचा उदय होईल .
शुक्राचा अस्त आणि उदय
अथ मधुमुखमासाः सप्तभूनिघ्नचकैः सवशरयुगलवाढ्यैः संयुता मार्गणघ्नाः ॥
उदधिरससमेताश्छिद्रखेगामितष्टा नवनवपरिशुद्धाः पञ्चभक्ताः पृथक्स्थाः ॥
रसगुणदिनहीनाढ्या द्विधा चैत्रतस्तैर्भृगुजहरिदिगस्ताम्बूदयौ स्तः क्रमेण ॥५॥
नवमासभघस्रतोऽल्पपुष्टाः पृथगास्थाः क्रमशस्त तैर्युतोनाः ॥
द्वेधा युगवासरोनयुक्तास्तोयास्तैन्द्र्य़ुदयौ क्रमाद् भृगोः स्तः ॥६॥
अर्थ -
अभीष्ट वर्षाच्या चैत्रशुक्ल प्रतिपदेस चक्र आणि मासगण हे आणावे . नंतर चक्रास १७ नीं गुणून ४५ नीं भागावें आणि जो मासादिक भागाकार येईल तो त्याच गुणाकारांत मिळवून बेरिजेंत मासगण मिळवावा मग त्या बेरजेस ५ नीं गुणून गुणाकारांत ६४ मास मिळवावे आणि बेरजेच्या मासांस मात्र ९९ नीं भागून जी बाकी मासादिक राहील ती ९९ मासांतून वजा करून त्या बाकीस ५ नीं भागावें म्हणजे मासादिक होतें . नंतर त्या मासादिकांतून ३६ दिवस वजा करून जी बाकी राहील तितक्या कालानें चैत्रापासून शुक्राचा पूर्वेस अस्त होईल आणि त्या मासादिकांत ३६ दिवस मिळवून जी बेरीज येईल तितक्या कालानें चैत्रापासून शुक्राचा पश्र्चिमेस उदय होईल असें जाणावें .
मग वर आणलेले मासादिक जर ( ९ मास २७ दिवस ) यापेक्षा कमी असेल तर त्या मासादिकांत ९ मास २७ दिवस हे मिळवून त्या बेरजेंत ४ दिवस वजा करावे म्हणजे तितक्या कालानें चैत्रापासून शुक्राचा पश्र्चिमेस अस्त होईल आणि त्या बेरजेंत ४ दिवस मिळवावे म्हणजे तितक्या कालानें चैत्रापासून शुक्राचा पूर्वेस उदय होईल . आणि जर वर आणलेले मासादिक ( ९ मास २७ दिवस ) यापेक्षां अधिक असेल तर त्या मासादिकांतून ९ मास २७ दिवस हे वजा करून जी मासादिक बाकी राहील तींत ४ दिवस वजा करावे व मिळवावे म्हणजे त्या त्या कालांनी चैत्रापासून शुक्राचा अनुक्रमें पश्र्चिमेस अस्त आणि पूर्वेस उदय होतील असें जाणावें .
उदाहरण
चक्र ८ X १७ = १३६
१३६ भागिले ४५ = मासादि उत्तर ३ मास ० दिवस ४० घटि ० पळ .
३ मास ० दिवस ४० घटि ० पळ + १३६ गुणनफल + २५ मासगण = १६४ मासगण ० दिवस ४० घटि ० पळ येणार .
१६४ मासगण ० दिवस ४० घटि ० पळ X ५ = ८२० मास ३ दिवस २० घटि ० पळ . + ६४ = ८८४ मास ( फक्त मासाचाच विचार करावा )
८८४ भगिले ९९ = ९२ मास ३ दिवस २० घ ० पळ बाकी .
हे ९२ मास ३ दिवस २० घ ० पळ जर ९९ मधून वजा केल्यास बाकी येते ६ मास २६ दिवस २० घटि ० पळे .
६ मास २६ दिवस २० घटि ० पळे याला ५ ने भाग दिल्यास भागाकार आला १ मास ११ दिवस २० घटि ० पळे
यास दोन स्थानी लिहून एका स्थानातून ३६ वजा केल्यास बाकी मिळेल ० मास ५ दिवस २० घटि ० पळ
यावरून असे समजते की चैत्रापासून ० मास ५ दिवस २० घटि ० पळ इतक्या काळाने शुक्राचा अस्त पूर्वेस होईल .
आणि दुसर्या स्थानात लिहिलेल्या १ मास ११ दिवस २० घटि ० पल यात ३६ दिवस मिळविल्यास
२ मास १७ दिवस २० घटि ० पळे मिळतातम्हणून २ मास १७ दिवस २० घटि इतक्या कालाने पुनः पूर्वेस शुक्रोदय होईल .
वरील मासादिक १ मास ११ दिवस २० घटि इतक्या कालाने पुनः पश्चिमेस शुक्रास्त होईल आणि ११ मास १२ दिवस २० घटि इतक्या कालाने पुनः पूर्वेस शुक्रोदय होईल .
शुक्र आणि गुरू यांच्या उदयास्त कालांविषयी सामान्य नियम ..
मासैर्नखैर्व्यरिदिनैरुदयास्तकालः शुक्रस्य शुद्ध्य़ति गुरोर्यदि साधविश्र्वैः ॥
सोऽन्यो भवेन्मधुमुखादथ तैर्युतश्र्चत्स्यात्तत्परोऽथ पुरतोऽपि विलोमशुद्ध्य़ा ॥७॥
अर्थ -
शुक्राचा पूर्वोदय किंवा पूर्वास्त झाल्यापासून पुनः पूर्वोदय किंवा पूर्वास्त होण्यास १९ मास २४ दिवस लागतात आणि पश्र्चिमोदय किंवा पश्र्चिमास्त झाल्यापासून पुनः पश्र्चिमोदय किंवा पश्र्चिमास्त होण्यास ही इतकाच काल लागतो . गुरूचा पूर्वोदय किंवा पश्र्चिमास्त झाल्यापासून पुनः पूर्वोदय किंवा पश्र्चिमास्त होण्यास १३ मास १५ दिवस लागतात . ज्या मासांत उदयास्त आला असेल त्यांत हा काल मिळविला असतां चैत्रापासून पुढील उदयास्ताचा काल येतो आणि वजा केला असतां मागील उदयास्ताचा काल येतो .
उदाहरण .
शके १७९० आषाढ कृष्ण १४ शीस शुक्राचा पूर्वोदय लिहिला आहे म्हणून ३ मास २९ दिवस + १९ मास २४ दिवस = २३ मास २३ दिवस , म्हणजे शके १७९१ वांत फालगून वद्य ९ मीस पुनः शुक्राचा पूर्वोदय व्हावा व पंचांगांत माघ वद्य १० मीस लिहिला आहे , कारण त्या वर्षी अधिक वैशाख होता . असेंच शके १७९१ चैत्र शुद्ध १४ शीस शुक्राचा पूर्वास्त आहे म्हणून ० मास १४ दिवस + १९ मास २४ दिवस = २० मास ८ दिवस म्हणजे शके १७९२ मार्गशीर्ष शुद्ध ८ मीस पुनः शुक्राचा पूर्वास्त व्हावा पण १७९१ वांत अधिक वैशाख असल्यामुळें पंचांगांत १७९२ कार्तिक शुद्ध १५ मेस शुक्राचा पूर्वास्त लिहिला आहे . असेंच गुरूच्या अस्तोदयां विषयीं करून पाहावें .
ग्रहांचा पूर्व पश्र्चिम दिशेकडे उदयास्त केव्हां होतो ?
लघुगोऽल्प इनादुदेति पूर्व भूयान् भूरिगतिर्ग्रहः प्रतीच्याम् ॥
भूयॉंल्लघुगः परत्र चास्तं प्राच्यां भूरिजवो लय प्रयति ॥८॥
अर्थ -
ग्रहाचीगति सूर्याच्या गतीपेक्षां कमी असून जर तो राश्यादिअवयवानें सूर्यापेक्षा कमी अेल तर तो पूर्वेस उदय पावतो . आणि ग्रहाची गति सूया्रच्या गतीपेक्षां अधिक असून जर तो राश्यादि अवयवानें सूर्यापेक्षां अधिक आहे तर तो पश्र्चिमेस उदय पावतो . आणि ग्रहाची गति सूर्याच्या गतीपेक्षां कमी असून जर तो राश्यादि अवयवानें सूर्यापेक्षां अधिक आहे तर तो पश्र्चिमेस अस्त पावतो ; आणि ग्रहाची गति सूर्याच्या गतीपेक्षां अधिक असून जर तो राश्यादि अवयवानें सूर्यापेक्षां कमी आहे तर तो ग्रह पूर्वेस अस्त पावतो .
चंद्राचाशर .
प्रथमे व्यगुचन्द्रदोर्गृहेंशाः स्वदलांढ्यास्त्वपरे नगाब्धियुक्ताः ॥
चरमे दलिता नगाद्रियुक्ता व्यगुविधुदिग्विशिखोऽङ्गुलादिकः स्यात् ॥९॥
अर्थ -
स्पष्टचंद्रांतून राहू वजा करावा . म्हणजे व्यगुविधु होतो . नंतर व्यगुविधूचा भक्तज करून तो भक्तज मेष राशीस म्हणजे त्यांत शुन्य राशि आहे तर भुजाच्या अंशाची दीडपट करावी किंवा त्यांस ३ नीं गुणून २ नीं भागावें म्हणजे अंगुलादि चंद्रशर होतो . जर भक्तज वृषभ राशीस आहे तर भक्तजाचे राशी टाकून अंशादिकांत मात्र ४७ अंश मिळवावे म्हणजे अंगुलादिक शर होतो . आणि भक्त जर मिथुन राशीस आहे तर भुजाचे राशि टाकून अंशादिकांचें अर्ध करावें आणि त्या अर्धांत ७७ अंश मिळवावें ; म्हणजे चंद्राचा अंगुलादिक शर होतो . मग व्यगु विधु उत्तर गोलीं आहे तर तो शर उत्तर आणि व्यगुविधु दक्षिण गोलीं आहे तर दक्षिण असतो .
उदाहरण
शके १५३२ मार्गशीर्ष कृष्ण ३० बुधवार १२ घटि ५९ पळें .
दर्शान्तकालीन स्पष्ट चंद्र ८ राशि ५ अंश २६ कला २० विकला - वजा राहु २ राशि ११ अंश ४१ कला १८ विकला = व्यगुविधु ५ राशि २३ अंश ४५ कला २ विकला बाकी .
या व्यगुविधुचे ६ अंश १४ कला ५८ विकला होतात . कारण हा भुज मेष राशिचा आहे म्हणून .
याचे अर्धे केल्यास म्हणजे २ ने भाग दिल्यास भुजार्घ ३ अंश ७ कला २९ विकला मिळेल .
आता
व्यगुविधुचे ६ अंश १४ कला ५८ विकला + भुजार्घ ३ अंश ७ कला २९ विकला करून याला ३ /२ ( तीन द्वितीयांश ) ने गुणल्यास ुत्तर मिळते ९ अंगुले २२ प्रतिअंगुले .
हा चंद्रशर व्यगुविधुच्या उत्तर गोलार्धात असल्याने उत्तर आहे .
चंद्राचासूक्ष्मशर .
नृपतिथिमनुविश्र्वरुद्रगोऽद्रिश्रुतिवसुधाः शरखण्डकानि तैर्यत् ॥
व्यगुविधुभुजतोऽपमोक्तिवद्वाव्यगुविधुदिग्विशिखोऽङ्गुलादिकःस्यात् ॥१०॥
अर्थ -
व्यगुविधूचे भक्तजांश करून त्यांपासून खालीं दिलेल्या शरांकांनीं क्रांति आणावी . परंतु क्रांति आणते वेळेस शेवटी १० नीं भागावें लागतें तें येथें करू नये . म्हणजे तो अंगुलादि चंद्राचाशर होतो तो , व्यगुविध उत्तर गोलीं आहे तर उत्तर आणि दक्षिण गोलीं आहे तर दक्षिण असतो .
अंकसंख्या |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
९ |
शरांक |
१६ |
१५ |
१४ |
१३ |
११ |
९ |
७ |
४ |
१ |
उदाहरण
व्यगुविधु ५ राशि २३ अंश ४५ कला २ विकला याचे भुजांश मिळतात ६ अंश १४ कला ५८ विकला याला १० ने भाग दिल्यास भागाकार ० आणि बाकी उरली ६ अंश १४ कला ५८ विकला .
या ६ अंश १४ कला ५८ विकलास एकाधिक शरांक १६ ने गुणल्यास उत्तर येते ९९ अंश ५९ कला २८ विकला . याला १० ने भाग दिल्यास उत्तर मिळते ९ अंगुले ५९ प्रतिअंगुले .यात ० शरांक मिळविल्यास उत्तर मिळते ९ अंगुले ५९ प्रतिअंगुले हेच झाले चंद्रशर .
ग्रहांच्या उदयास्ताचे कालांश
भास्करा नगभवो गुणचन्द्रा भूभवो दिविषदस्तिथयोऽब्जात् ॥
प्राक्तनैर्निगदिताः समयांशा वक्रिणोर्भृगुविदोः क्षितिहीनाः ॥११॥
अर्थ -
वर सांगितलेल्या कालांनी म्हणजे सूर्य आणि प्रत्येक ग्रह त्यांच्या मधील अंतराचे अंशांनी ग्रहाचे उदय किंवा अस्त होतात . परंतु बुध आणि शुक्र वक्री असल्यास त्यांचे वर सांगितलेल्या कालांशांतून एक अंश वजा करून जे बाकी कालांश राहतात त्या कालांशांनी त्यांचा उदय किंवा अस्त होतो .
ग्रहोंके नाम |
चं . |
मं . |
बु . |
गु . |
शु . |
शु . |
वक्रीबुध |
वक्रीशुक्र |
कालांश |
१२ |
१७ |
१३ |
११ |
९ |
१५ |
१२ |
८ |
भौमादिकग्रहांचे पातांश .
खाम्बुधयः खयमाः खभुजङ्गाः खाङ्गमिताः खदशक्रमशः स्युः ॥
पातलवाः कुसुताद् बुधभृग्वोर्मध्यमचञ्चलकेन्द्रविहीनाः ॥१२॥
अर्थ -
आतां वरजे बुध आणि शुक्र यांचे पातांश सांगितलें आहेत , ते शीघ्र प्रति मंडस्थ आहेत म्हणून अनुक्रमें त्यांची जीं अहर्गणोत्पन्न शीघ्रकेंद्र असतील तीं वर सांगितलेल्या पातांशांतून वजा करून जेबाकी अंश राहतील ते बुध आणि शुक्र याचे पातांश होतात .
ग्रहोंके नाम |
मं . |
बुध |
गुरू |
शुक्र |
शनि |
पातांश वा सपातांश |
० |
० |
८ |
६० |
१०० |
भौमादि कांचेशीघ्र कर्ण
कुद्वित्र्यब्धियुगाश्र्विनो दलचयश्र्चेत्षङ्भपुष्टं चलं केन्द्रं चक्रविशुद्धमस्य भमितार्धैंक्यं लवघ्नागतात् ॥
त्रिंशल्लब्धयुतं कुजात्कुयमलाब्धीन्द्वद्रिभक्तं क्रमात्तद्धीना धृतिरिष्विला गुणभुवो गोब्जा इनाद्राक्छुतिः ॥१३॥
अर्थ -
अभीष्ट ग्रहाचे द्वितीय शीघ्र केंद्र घेऊन तें ६ राशींपेक्षा अधिक असेल तर तें १२ राशींतून वजा करावे . आणि त्या षड्भाल्प केंद्राचे राशी इतक्या खालीं दिलेल्या शीघ्रांकांची बेरीज घ्यावी आणि एकाधिक केंद्र राशि परिमित शीघ्रांकानें , केंद्राचे राशि टाकून अंशादिकांस मात्र गुणावें आणि त्या गुणाकारास ३० नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांत शीघ्रांकांची बेरीज मिळवून अभीष्ट ग्रहाच्या खाली दिलेल्या भाज्यांकानें भागावें आणि अंशादि भागाकार अभीष्ट ग्रहाच्या शीघ्रकर्णांकांतून वजा करावा म्हणजे अंशादि शीघ्र कर्ण होतो .
संख्या |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
शीघ्रांक |
१ |
२ |
३ |
४ |
४ |
२ |
ग्रहोंके नाम |
मं . |
बु . |
गु . |
शु . |
श . |
ग्रहोंकेभाज्यांक |
१ |
२ |
४ |
१ |
७ |
ग्रहोंकेशीघ्रकरणांक |
१८ |
१५ |
१३ |
९ |
१२ |
उदाहरण
शके १५३४ वैशाख शुद्ध १५ स मंगलादिकांचे शीघ्रकर्ण आणतो . मंगलाचें द्वितीय शीघ्रकेंद्र ३रा . १अं . ४क . ५७ विकला हें षड्भाल्प आहे . ३ राशि परिमित शीघ्रांकांची बेरीज ६ आणि एकाधिक शीघ्रांक ४ म्हणून राशि रहित केंद्र १अं . ४क . ५७विक ४ ( = ४अं . १९क . ४८विकला ) ÷ ३० = ०अं . ८क . ३८विक ; यांत शीघ्रांकांची बेरीज ६ मिळवून ६अं . ८क . ३८विक ÷ भौम भाज्यांक १ = ६ अंश ८ कला ३८ विकला . हें मंगलाचें शीघ्र कर्णांकांतून ( १८ ) वजा करून बाकी ११ अंश ५१ कला २२ विकला हा मंगलाचा शीघ्रकर्ण झाला .
इतर ग्रहांची द्वितीय केंद्रें व शीघ्र कर्ण हे आहेत .
बुधद्वि . शी . के . १रा . १६अं . २५क . २७वि . शीघ्रकर्ण . १३अं . ५७क . १०वि .
गुरू ..... ८ - २१ - १० - ५८ ११ - १२ - ४२
शुक्र ..... ३ - ४ - १९ - ५० १२ - २४ - २
शनि ..... २ - २२ - ५५ - ० ११ - २३ - १८
ग्रहांचे शर आणि स्पष्टक्राति .
मन्दस्पष्टखगात्स्वपातरहितात्क्रान्त्यंशकाः केवलात् कर्णाप्तास्त्रियमाहता अथ गुरोश्र्चेल्लोचनाप्ताः पुनः ॥
स्वांघ्रयूना असृजोऽङ्गुलादिकशरः पातोनदिक्स्यादसौ त्रिघ्नः स्यात्कलिकादिकः स्फुटतरस्तत्संस्कृतश्र्चापमः ॥१४॥
अर्थ -
मंदस्पष्ट ग्रहांतून अभीष्ट ग्रहांचे पानांश वजा करावे म्हणजे पानोन ग्रह होतो . नंतर पानोन ग्रहास अयनांश दिल्याशिवाय त्यापासून न क्रांती आणावी . आणि त्या क्रांतीस २३ नीं गुणून शीघ्र कर्णानें भागावें म्हणजे अभीष्ट ग्रहाचा अंगुलादिक शर होतो . तो पातोन ग्रह उत्तरगोलीय आहेतर उत्तर आणि दक्षिण गोलीय आहेतर दक्षिण असतो . पण गुरूचा शर आणतांना वरच्या रीतीनें आणलेल्या शरास २ नीं भागावें , आणि मंगळाचा शर आणतांना वरच्या रीतीनें आणलेल्या शरास ३ नीं गुणून ४ नीं भागावें . अभीष्ट ग्रहाची क्रांति आणून तिचा आणि अभीष्ट ग्रहाच्या अंगुलादिक तिप्पट शर कलादि मानून त्याचा संस्कार करावा . म्हणजे अभीष्ट ग्रहाची स्पष्टक्रांति होत्ये .
उदाहरण .
मंदस्पष्ट भौम १० राशि ३अं . ८क . ४५ विकला - भौम पातांश ४० ( = १ रा . १०अं .) = ८रा . २३अं . ८क . ४५ विक . हा पातोन मंगळ झाला . यापासून आणलेली क्रांति २३अं . ४३क . ३३विक . २३ = ५४५अं . ४१क . ३९ विक . ÷ भौमशीघ्र कर्ण ११अं . ५१क . २२विक .= ४६अं . १क . ३८ विक . म्हणून ४६अं . १क . ३८विक . ३ ( = १३८अं . ४क . ५४विक .) ÷ ४ = ३४ अंगुलें ३१ प्रति अंगुलें , हा मंगळाचा शर , पातोन मंगल दक्षिण गोली आहे म्हणून दक्षिण आहे .
मंदस्पष्ट बुध १ रा . ५अं . ३क . १५ विक . - ( राश्यादि पात . ० रा . २०अं . ०क . ०विक .- बुधाचे शीघ्रकेंद्र १ रा . १७अं . १४क . ५० विक .) = बुधाचा पात ११ रा . २अं . ४५क . १० विक . = २रा . २अं . १८क . ५विक ., हा पातोन बुध झाला . यापासून आणलेली क्रांति २१अं . ०क . ५१विक . ÷ २३ ( = ४८३अं . १९क . २३ विक .) ÷ बुधशीघ्र कर्ण १३अं . ५७क . १० विक . = ३४अं . ३८प्र . अंगुलें , हा बुधाचा शर , पातोन बुध उत्तर गोलीं आहे म्हणून उत्तर आहे .
मंदस्पष्टगुरु ४रा . १२अं . ५२क . ४४विक . हा पातोन गुरू झाला . यापासून आणलेली क्रांति १८अं . ४९क . ११विक . २३ ( = ४३२अं . ५१क . १३ विक .) ÷ गुरूचा शीघ्र कर्ण १३ ११अं . १२क . ४२विक . = ३८ अंगुलें ३६ प्रति अंगुलें म्हणून ३८ अंगु . ३६ प्रत्यंगुलें ÷ २ = १९ अंगुलें १८ प्रति अंगुलें , हा गुरूचा शर पातोन ग्रह उत्तर गोलीं आहे .
मंदस्पष्ट शुक्र १ रा . ५अं . २५क . २५विक .-( राश्यादिपात २ रा . ० अं . ० क . ० विक .- शुक्रशीघ्र केंद्र ३ रा . ५अं . ४१क . ३५विक . = ) शुक्रपात १० रा . २४अं . १८क . २५विक . = २रा . ११अं . ७क . ०विक . हा पातोन शुक्र झाला . यापासून आणलेली क्रांति २२अं . ३२क . २ विकला २३ ( = ५१८अं . १६क . ४६विक .) ÷ शुक्राचा शीघ्र कर्ण १२अं . २४क . २विक . = ४१ अंगुलें . ४७ प्रतिअंगुलें हा शुक्राचा शर पातोन शुक्र उत्तर गोलीय आहे म्हणून उत्तर आहे .
मंदस्पष्ट शनि १० रा . २१अं . २३क . ४२विक .- शनिपातांश १०० ( = ३ रा . १०अं .) = ७ रा . ११अं . २२क . ४२विक . हा पातोन शनि झाला . यापासून आणलेली क्रांती १५अं . ३१क . ६विक . २३ ( = ३५६अं . ५५क . १८विक .) ÷ शनीचा शीघ्रकर्ण ११अं . २३क . १८ विक . = ३१ अंगुलें २० प्रति अंगुलें हा शनीचा शर , पातोन शनि दक्षिण गोलीं आहे म्हणून दक्षिण आहे .
आतांस्पष्ट क्रांतिसाधन .
स्पष्टमंगळ ११ रा . ५अं . ५६क . ४ विकला + अयनांश १८ कला १० = ११रा . २४अं . ६क . ४वि . या सायन मंगळापासून आणलेली क्रांति दक्षिण २अं . २१क . ३४विक .+ दक्षिणशर ३४ अंगुलें ३१ प्रति अंगुलें ३ ( = १अं . ४३क . ३३विक ) = ४अं . ५क . ७विक ., ही मंगळाची दक्षिण स्पष्ट क्रांति झाली .
स्पष्ट बुध १ रा . १७अं . ४क . ० विक . + अयनांश १८क . १० = २ रा . ५अं . १४क . ०विकला या सायन बुधापासून आणलेली क्रांति उत्तर २१अं . ३२क . ३१विक . + शर उत्तर ३४ अंगुलें ३ ( = १ अंश ४३ कला ५४ विकला ) = २३ अंश १६ कला २६ विकला , ही बुधाची स्पष्ट क्रांति उत्तर झाली .
स्पष्ट गुरु ४ रा . २अं . ९क . ४९ विकला + अयनांश १८ कला १० = ४ रा . २०अं . १९क . ४९ विकला . या सायन गुरूपासून आणलेली क्रांति उत्तर १४अं . ५९क . १९विक .+ शर उत्तर १९ अंगुलें १८ प्रतिअंगुलें ३ ( = ५७ कला ५४ विकला ) = १५अं . ५७क . १३ विकला . ही गुरूस्पष्ट क्रांति उत्तर झाली .
स्पष्ट शुक्र २ रा . १२अं . १५क . ४६ विकला + अयनांश १८ कला १० = ३रा . ०अं . २५क . ४६ विकला , या सायन शुक्रापासून आणलेली क्रांति उत्तर २३ अंश ५८क . ५८ विकला + शर उत्तर ४१ अंगुलें ४७ प्रति अंगुलें ३ ( = २अं . ५क . २१ विकला ) = २६ अंश ४ कला १९ विकला ही उत्तर शुक्रस्पष्ट क्रांति झाली .
स्पष्टशनि १० रा . २६अं . ४२क . ३० विकला + अयनांश १८ कला १० = ११रा . १४अं . ५२क . ३० विकला . या सायन शनिपासून आणलेली क्रांति दक्षिण ६अं . ३क . ० विकला .+ शरदक्षिण ३१ अंगुलें २० प्रतिअंगुलें ३ ( = १ अंश ३४ कला ) = ७ अंश ३७ कला ० विकला , ही दक्षिण शनि स्पष्ट क्रांति झाली .
पंचांगस्थ स्पष्टग्रह आणि वक्रास्तादि दिवस यांपासून इष्ट दिवशीं मंद स्पष्ट ग्रह साधन .
वक्रास्ताद्यं तिथिपटगतं तद्दिनेऽस्योक्तकेन्द्रं स्यात्तच्चाल्पं त्वभिमतदिने स्वाशुकेन्द्रोक्तगत्या ॥
तस्मात्प्राग्वच्चलफलमिदं चालितस्पष्टखेटे व्यस्तं देयं मृदुजफलभाक्स्यात्ततो वा शराद्यम् ॥१५॥
अर्थ -
पंचांगांत ज्या दिवशीं अभीष्ट ग्रहाचें वक्रास्तादिक लिहिलें असेल त्या दिवशी अभीष्ट ग्रहाचें वक्रास्तादिकाचे पंचतारास्पष्टाधिकारांत सांगितलेले द्वितीय शीघ्र केंद्रांश घेऊन त्यांस शीघ्र केंद्रांच्या गतीनें , अभीष्ट दिवस आणि वक्रास्तादिकाचा दिवस यांच्यामध्ये जे दिवस असतील त्या दिवसांचें चालन द्यावें म्हणजे अभीष्ट दिवशीं द्वितीय शीघ्रकेंद्रांश होतात . नंतर त्याद्वितीय शीघ्रकेंद्रांशापासून द्वितीय शीघ्रफल आणावें . मग पंचांगांतील अभीष्ट स्पष्टग्रहास त्याच्याच गतीनें आणलेल्या अंतरित दिवसांचें चालन द्यावे म्हणजे इष्ट दिवशींचा स्पष्टग्रह होतो . त्या ग्रहांत द्वितीय शीघ्र फल धन असेल तर ऋण करावें आणि ऋण असेल तर धन करावें म्हणजे मंदस्पष्ट ग्रह होतो . मग त्या मंदस्पष्ट ग्रहापासून शरादिक आणावें .
नतांश आणि दृक्कर्मदत्रग्रह .
प्राक्रिभेण वर्जितात्संयुतात्तु पश्र्चिमे ॥
खेटतोपमाक्षयोः संस्कृतिर्नता लवाः ॥१६॥
षट्शैलाष्टनवार्कधृत्यदितिजाः खण्डानि कार्य्यं नतांशांशांशप्रमखण्डकैक्यमगतोच्छिष्टांशघाताद्युतम् ॥
आशाप्त्या रवित्दृच्छराङ्गुलहत लिप्ता ग्रहे ता नतांशेष्वोः स्वर्णमभिन्नभिन्नदिशि स व्यस्तं परे दृग्ग्रहः ॥१७॥
अर्थ -
ग्रहांचा उदयास्त पूर्वेस असेल तर त्या स्पष्टग्रहांतून ३ राशि वजा करावे . आणि उदयास्त पश्र्चिमेस असेल तर त्या ग्रहांत ३ राशि मिळवावे . मग त्यापासून क्रांति आणून तिचा आणि अक्षांशांचा संस्कार करावा म्हणजे नतांश होतात . नंतर नतांशांस १० नीं भागून भागाकार परमित खालीं दिलेल्या अंकांची बेरीज घ्यावी . आणि पुढील अंकानें अंशादि बाकीस गुणून १० नीं भागावें आणि अंशादि भागाकार अंकांच्या बेरजेंत मिळवून जें येईल त्यास शरांगुलांनी गुणून १२ नीं भागावें म्हणजे दृक्कर्म कला येतात . नंतर त्या दृक्कर्म कला नतांश आणि शर हे एकदिशेचे आहेत तर स्पष्टग्रहांत मिळवाव्या आणि भिन्न दिशेचे आहेत तर स्पष्ट ग्रहांतून वजा कराव्या म्हणजे दृक्कर्म दत्रग्रह होतो . परंतु वेध सूर्यास्ता नंतर असल्यास नतांश आणि शर हे एक दिशेचे असतां दृक्कर्म कला स्पष्टग्रहांतून वजा कराव्या आणि भिन्न दिशेचे असतां स्पष्टग्रहांत मिळवाव्या म्हणजे दृक्कर्म दत्र ग्रह होतो .
अंकसंख्या |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
दृक्कमांक |
६ |
७ |
८ |
९ |
१२ |
१८ |
३३ |
उदाहरण .
शके १५३२ चैत्र शुक्ल ५ गुरूवार या दिवशीं शुक्राच्या पूवा्रस्ताचें गणित . चक्र ८ अहर्गण ७४७ , मध्यमरवि ११ रा . २१अं . २२क . १७ विकला . रविकेंद्र २ रा . २६अं . ३७क . ४३विकला . मंदफलधन २अं . १०क . ३१विकला ; मंदस्पष्टरवि ११रा . २३अं . ३२ कला ४८ विक ; चर ऋण २२ विकला , स्पष्टरवि ११ रा . २३अं . ३२ कला २६ विकला ; रविस्पष्टगति ५९ क . ० विकला . शुक्रशीघ्र केंद्र ११ रा . ८अं . ३१क . ५२ विक . शीघ्रफलार्ध ऋण . ० अं . ४क . ३० विकला , शीघ्र फलदल स्पष्टशुक्र ११ राशी १६अं . ५७क . ४५ विकला , मंदकेंद्र ३रा . १३अं . ८क . १३ विकला मंदफलधन १अं . ३० कला ० विकला ; मंदस्पष्टशुक्र ११ रा . २२अं . ५२क . १७ विकला . द्वितीयशीघ्र केंद्र . ११ रा . ७अं . १क . ५२ विकला शीघ्रफल ऋण ९अं . ७क . ४८ विकला स्पष्टशुक्र ११ रा . १३अं . १४क . २९ विकला . स्पष्टगति ७४ कला ५४ विकला ; शुक्रशीघ्र कर्ण १८अं . १४क . ४ विकला ; क्रांति उत्तर २३अं . ५६ कला ३८ विकला ; शरदक्षिण ३० अंगुलें १२ प्रतिअंगुलें . आतां दृक्कर्मकला साधन .
शुक्राचें पूर्वास्त आहे म्हणून स्पष्ट शुक्र ११रा . १३अं . १४ कला २९ विकला - ३रा . = ८रा . १३अं . १४क . २९विक . या पासून आणलेली क्रांति दक्षिण २३ अंश ५६ कला ४२ विकला + अक्षांश २५अं . २६क . ४२ विकला = नतांश दक्षिण ४९अं . २३क . २४ विकला . नतांश ४९अं . २३ कला २४ विकला यास १० नीं भागून भागाकार ४ आणि बाकी ९अं . २३ कला २४ विक . म्हणून पहिल्या चार दृक्कर्मांकांची बेरीज ३० आणि पांचवा अंक १२ बाकी ९अं . २३क . २४ विकला ( = ११२अं . ४०क . ४८विकला ) ÷ १० = ११अं . १६क . ४ विकला या भागाकारांत वरील बेरीज ३० मिळवून ४१अं . १६क . ४ विकला शर ३० अंगुलें १२ प्रतिअंगुलें ( = १२४६ अं . १८क .) ÷ १२ = १०३क . ५१विक . या दक्कर्म कला झाल्या . आतां नतांश आणि शर यांची एकदिशा आहे म्हणून स्पष्टशुक्र ११रा . १३अं . १४क . २९विक .+ दृक्कर्मकला १०३क . ५१ विकला ( = १अं . ४३क . ५१विक .) = ११ रा . १४अं . ५८क . २० विकला , हा दृक्कर्म दत्रशुक्र झाला .
ग्रहांचा उदय किंवा अस्त होऊन गेला किंवा होणार आहे .
कल्प्योऽल्पो रविरर्कदृक्खचरयोरन्यश्र्च लग्नं तयोर्मध्ये स्युर्घटिकाश्र्च पूर्ववदिमाः पश्र्चात्स चक्रार्द्धयोः ॥
षड्घ्नाः काललवा अमीभिरधिकैर्गम्योऽस्त ऊनैर्गतः प्रोक्तेभ्योऽभ्यधिर्कर्गतः समुदयो न्यूनैस्तु गम्यो भवेत् ॥१८॥
स्यात्खाभ्राग्न्युदयान्तरं भवित्दृतं स्वर्णं पृथूनोदये यत्तत्संस्कृतदृष्टिकर्म्मलवतः प्राणांशसंस्कारिताः ।
पूर्वोक्ता भृगुचन्द्रयोः क्षणलवाः स्पष्टा भृगोश्र्चोनिता द्वाभ्यां तैरुदयास्तदृष्टिसमता स्याल्लक्षितैषा मया ॥१९॥
अर्थ -
स्पष्ट सूर्य आणि दृक्कर्म दत्रग्रह यामध्ये जो कमी असेल त्यास रवि , आणि अधिक असेल त्यास लग्न असे समजून त्या सूर्य लग्नापासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्याप्रमाणें अभीष्टकाल आणावा . परंतु पश्र्चिमोदयास्त साधनीं लग्न आणि रवि या दोघांत ही ६ राशि मिळवून नंतर अभीष्टकाल आणावा . मग त्या अभीष्ट घटिकात्मक कालास ६ नीं गुणावें म्हणजे इष्ट कालांश होतात . ते अभीष्ट ग्रहाचे पूर्वी सांगितलेल्या कालांशांपेक्षां अधिक आहेत तर अभीष्ट ग्रहाचा अस्त होणार आहे , आणि ते पूर्वोक्त कालांशांपेक्षां कमी आहेत तर अस्त होऊन गेला असें समजावें . याचे उलट , जर इष्ट कालांश , प्रोक्त कालांशांपेक्षां कमी आहेत तर उदय होणार आहे आणि अधिक आहेत तर उदय होऊन गेला असें समजावें . परंतु चंद्र आणि शुक्र यांच्या पूर्वी सांगितलेल्या कालांशांस एक विशेष संस्कार करावा लागतो . तो असा आहे कीं , ग्रहाचा पलात्मक उदय आणि ३०० पलें याचें अंतर करून त्यास २७ नीं भागावें , जो भागाकार अंशादि येईल तो , पलात्मक उदय ३०० पलांपेक्षा अधिक आहे तर धन , आणि कमी आहे तर ऋण जाणावा . नंतर अंशादि भागाकाराचा आणि दृक्कर्म कलांचा संस्कार करावा आणि जे धन ऋणात्मक येईल त्यास ५ नीं भागावें आणि अंशादि धन ऋणात्मक भागाकार प्रोक्त कालांशांत धन ऋण करावा ; म्हणजे चंद्राचे स्पष्टकालांश होतात . या रीतीनें आणलेल्या स्पष्ट कालांशांतून २ अंश वजा केल्यानें शुक्राचे स्पष्ट कालांश होतात . हे कालांश आणि इष्ट कालांश यावरून वर सांगितल्याप्रमाणें अस्तोदयाचे गतगम्य लक्षण जाणावें .
उदाहरण .
स्पष्ट सूर्य ११ रा . २३अं . ३२क . २६वि . आणि दृक्कर्मदत्र शुक्र ११ रा . १४अं . ५८क . २०वि . या मध्यें सूर्य अधिक आहे म्हणून ११ रा . २३अं . ३२क . २६ विकला , हें लग्न आणि ११ रा . १४अं . ५८क . २० विकला हा सूर्य या दोघांत अयनांश १८ कला ८ मिळवून ० रा . ३अं . ६क . २० विकला हा सायन रवि आणि ० रा . ११अं . ४०क . २६ विकला हें सायन लग्न झालें . आतां , सायन रवि आणि सायन लग्न हीं एकराशीस आहेत म्हणून त्यांचें अंतर ८अं . ३४क . ६ विकला मेषोदय २२१ ( = १८९३अं . ३६क .) ÷ ३० = ६३ पलें = १ घटी ३ पलें हा अभीष्ट काल झाला . म्हणून १ घ . ३प . ६ = ६ अंश १८ कला हे इष्ट कालांश झाले .
आतां , शुक्रा विषयीं गणित आहे म्हणून शुक्राचा ( मेषोदय ) उदय २२१ आणि ३०० यांचें अंतर ७९ ÷ २७ = २ अं . ५५क . ३३ विकला . हा भागाकार , उदय ३०० पेक्षां कमी आहे म्हणून ऋण आहे . आता दक्कर्म कला साधन १०३क . ५१वि . = ( = १अं . ४३क . ५१ विकला ) - भागाकार २ अंश ५५ कला . ३३ विकला . = ( ऋण ) १अं . ११क . ४२ विकला - भागाकार २ अंश ५५ कला . ३३ विकला . = ( ऋण ) १अं . ११क . ४२ विकला यास ५ नें भागल्यानें भागाकार ऋण ० अं . ४४ क . हा शुक्राचे उक्त कालांशांतून ( ९ ) वजा करून बाकी ८ अं . ४६ कला - २अं . = ६ अंश = ६ अंश ४६ कला हे शुक्राचे स्पष्ट कालांश झाले यापेक्षां इष्ट कालांश ( ६ अं . १८ क .) कमी आहेत म्हणून अस्त होऊन गेला .
ग्रहांचा उदय किंवा अस्त कधी होईल
खभ्राग्निभिर्विनिहिताः कथितेष्टकालभागान्तरस्य कलिका रविभोदयाप्ताः ॥
तत्सप्तमेन परतोऽथ जवान्तराप्ता योगेन वक्रिणि दिनान्युदयास्तयोः स्युः ॥२०॥
अर्थ -
अभीष्ट ग्रहाचे उक्त कालांश आणि इष्ट कालांश यांचें अंतराच्या कला करून त्यास ३०० नीं गुणावें आणि त्या गुणाकारास सायन रवीच्या पलात्मक उदयानें भागावें ; परंतु पश्र्चिमोदयास्त साधनीं सायन सूर्यांत ६ राशि मिळवून त्याच्या पलात्मक उदयानें भागावें आणि भागाकारास पुनःरवि आणि ग्रह यांच्या गतींच्या अंतरानें भागावें ; परंतु ग्रहवक्री आहेतर भागाकारास रवि आणि ग्रह याच्या गतियोगानें भागावें म्हणजे उदयाचें किंवा अस्ताचे दिवस येतात .
उदाहरण -
शुक्राचे स्पष्टकालांश ६ कला ४६ - इष्टकालांश ६ कला १८ = कालांश २८ कला ३०० ( = ८४०० कला ) ÷ सायन सूर्याचा उदय २२१ = ३८ कला ० विकला ३२ प्रति विकला म्हणून हा भागाकार ÷ ( शुक्रगति ) ७४ कला ५४ विकला - रविगति ५९ कला = ) १५क . ५४ विकला = २ दिवस २३ घटी ३४ पलें , हें दिवस शुक्राचा अस्त होऊन झालें .
अगस्त्योदयास्त साधन .
पलभाष्टवधोनसंयुता गजशैला वसुखेचरा लवाः ॥
इह तावति भास्करे क्रमाद्धटजोऽस्तं ह्युदयं च गच्छति ॥२१॥
अर्थ -
पलभेस ८ नीं गुणून अंशादि गुणाकार ७८ अंशांतून वजा करावा म्हणजे त्या बाकी इतक्या अंशांवर रवि ज्यावेळेस येईल त्यावेळेस अगस्तीचा अस्त होईल आणि तो अंशादि गुणाकार ९८ अंशांत मिळवावा म्हणजे त्या बेरजे इतक्या अंशावर रवि ज्यावेळेस येईल त्यावेळेस अगस्त्योदय होईल असें समजावें .
उदाहरण .
७८ अंश -( पलभा ५ अंगुलें ४५ प्रति अंगुले ८ = ) ४६अं . = ३२ अंश = १ रा . २अं . इतके अंशावर रवि मे महिन्याचे १४ तारखेस येतो म्हणून तेव्हां अगस्त्यास्त होईल आणि ( पलभा ५ अंगुलें ४५ प्रति अंगुले ८ = ) ४६अं .+ ९८अं . = १४४अं . = ४रा . २४ अंश ; एतत्रुल्य रवि सपूटंबरचे ८ वे तारखेस होतो म्हणून तेव्हां अगस्त्योदय होईल . हें उदाहरण काशीचें आहे म्हणून असें तेथे दृष्टीस पडेल .
अभीष्ट ग्रहाचा उदय किंवा अस्तरात्रीं होईल .
खेचरोऽर्कास्तकाले सषड्भार्कतो योऽधिकोऽल्पोऽर्कतो निश्युदेतीह सः ॥
अस्तमेत्यन्यन्यथाऽथो विधेयः क्रमात्पूर्वपश्र्चात्स्थदृक्कर्म्मभाक्स ग्रहः ॥२२॥
अर्थ -
सायंकाली स्पष्ट सूर्य आणि स्पष्टग्रह हे करावे . मगजर तो स्पष्ट ग्रह षड्शि युक्त स्पष्ट सूर्याहून अधिक व स्पष्ट सूर्याहून कमी असेल तर तो रात्री उदय पावेल . जर तो स्पष्टग्रह षडाशि युक्त सूर्याहून कमी आणि स्पष्ट सूर्याहून अधिक असेल तर रात्रीं त्या ग्रहाचा उदय असेल तर तरे पूर्व दृक्कर्म दत्र करावा आणि आणि रात्रीं त्याचा अस्त असेल तर तो पश्र्चिम दृक्कर्म दत्र करावा .
उदाहरण .
शके १५३४ वैशाख शुक्ल १५ या दिवशीं रात्री गुरूच्या अस्ताचें गणित . प्रातःकालीन ग्रह ० स्पष्टरवि १ रा . ५अं . ४२क . ३७वि ; स्पष्टगति ५७ क . २६ विकला स्पष्टगुरू ४ राशि २अं . ९क . ४९ विकला ; स्पष्टगति ५क . २६ विकला स्पष्ट गुरू ४ राशि २अं . ९क . ४९ विकला ; स्पष्ट गति ५क . २२ विकला . मंदस्पष्ट गुरू ४ रा १२अं . ५२क . ४४ विकला ; मंदस्पष्टगति ४क . ४२ विकला . दिनमान ३३ घटी ६ पले आतां सायंकालीन रवि १ रा . ६अं . १४क . ३३ विकला ; गुरू ४ रा . २अं . १२क . ४६ विकला . मंदस्पष्ट गुरू ४ रा . १२अं . ५५क . १९ विकला .- गुरूपात राशि २अं . २० = १ रा . २२ अं . ५५ कला १९ विकला . यापासून आणलेला शीघ्रकर्ण ११ अंश १२ कला ४२ विकला ; गुरूशर उत्तर १९ अंगुलें १८ प्रति अंगुलें . आतां गुरू ( ४ रा . २अं . १२क . ४६ विकला ) षडाशियुक्त रवी ( ७ रा . ६अं . १४क . ३३ विकला ) पेक्षां कमी , आणि स्पष्ट रवी पेक्षां अधिक आहे म्हणून रात्रीं गुरूचा अस्त होईल . गुरू ४ रा . २अं . १२क . ४६ विकला + ३ रा . = ७ रा . २अं . १२क . ४६ विकला . यापासून आणलेली क्रांति दक्षिण १८अं . ११ कला ४१ विकला . नतांश दक्षिण ४३अं . ३८क . २३ विकला . दृक्कर्म कला धन ५५ कला १८ विकला . दृक्कर्म दत्तगुरू ४ रा . ३अं . ८क . ४विक .
अभीष्टग्रहाचा उदय किंवा अस्त रात्रीं केव्हां होईल .
उद्रमे यातकालः खगात्त्वस्तके षड्भयुक्तात्सषड्भार्कभोग्यान्वितः ॥
युक्तमध्योदयोऽस्योद्रमास्ते भवेद्रात्रियातोऽथ तत्कालखेटात्स्फुटः ॥२३॥
अर्थ -
ग्रहोयदय काल आणणें आहे तर दृक्कर्म दत्रकर्मदत्तग्रहास लग्न मानून त्यापासून भक्तकाल आणावा ; परंतु अस्तकाल आणणे आहे तर षड्राशि युक्त दक्कर्म दत्र ग्रहास लग्न मानून त्यापासून भक्तकाल आणावा आणि षड्राशियुक्त सूर्यास रविमानून त्यापासून भोग्यकाल आणावा . नंतर भक्तकाल आणि भोग्यकाल यांच्या बेरजेंत लग्न आणि रवि यांच्या मधील पलात्मक उदयांची बेरीज मिळवावी . म्हणजे रात्रीं तितक्या घटिकांनी ग्रहाचा उदय किंवा अस्त होईल . नंतर उदयास्त कालीन दृर्क्मदत्र ग्रह आणि सूर्य हे पुनः करून त्यांपासून वरचे रीतीनें उदयास्त कालाच्या घटिका पुनः आणाव्या म्हणजे तो स्पष्ट उदयास्त काल होतो .
उदाहरण .
षड्शियुक्त दृक्कर्म दत्रगुरू १० रा . ३अं . ८क . ४ विकला हेंच लग्न मानून या पासून आणलेला पलात्मक भक्तकाल १७९ +( षड्शियुक्तसूर्य ७रा . ६अं . १४क . ३३ विकला हाच रवि यापासून आणलेला ) भोग्यकाल ६४ पलें + (लग्न व रवि यांतील उदय धनोदय पलें ३४२ + मकरोदय पलें ३०४ = ) ६४६ पलें = १४ घटी ४९ पलें , सूर्यास्तापासून इतक्या घटिकांनीं गुरूचा अस्त होईल . आता , १४ घटी ४९ पलें याचें चालन देऊन आणलेले दृक्कर्म दत्रगुरू ४रा . ३अं . ९क . २४ विकला आणि स्पष्ट सूर्य १रा . ६अं . २८क . ३६ विकला . ह्यांस ६ राशि जोडून पहिल्यास लग्न आणि दुसऱ्यास रवि असें मानून त्यापासून आणलेले भक्त आणि भोग्यकालांची बेरीज २४० पलें + लग्न आणि रवि यांमधील उदयांची बेरीज ६४६ पलें = ८८६ पलें = १४ घटी ४६ पलें हा गुरूचा स्पष्ट अस्तकाल झाला .
चंद्रस्पष्टोदयास्तकाल साधन .
इन्दोस्तु गोपलाढ्योनः कार्य्योऽथ प्रतिनाडिकम् ।
युतो द्विद्विपलैः स्पष्टः किं स्यात्तात्कालिकेन्दुना ॥२४॥
अर्थ -
चंद्राच्या उदय कालांत ९ पलें मिळवावीं आणि अस्तकालांतून ९ पलें वजा करावीं , आणि जे येईल त्यांत अनुक्रमें उदयकालाच्या आणि अस्तकालाच्या घटिकांस २ नीं गुणून तत्रुल्य पलें मिळवावीं म्हणजे त्यावेळचा चंद्र केल्याशिवाय त्याचा स्पष्ट उदयास्त काल होतो .
अस्तोदयाधिकार समाप्त .