पंचतारांचे शीघ्रांक
खमष्टमरुतोऽद्रिभूभुव उदघ्यगोर्व्योष्टदृग्दृशो नवनगाश्र्विनोऽक्षदशनाः शराङ्गाग्नयः ।
गुणाङ्कदहनाः खखाब्धय इभाङ्गरामाः क्रमान्नवाम्बुधिदृशो नभः क्षितिभुवश्र्चलाङ्का इमे ॥१॥
खं भूकृताः कुवसवोऽद्रिभवाः खतिथ्योऽष्टाद्रीन्दवो नवनवक्षितयोऽर्कपक्षाः ॥
अर्काश्र्विनः शरखगक्षितयोऽक्षतिथ्यो गोष्टौ खमाशुफलजाः स्युरिमे विदोऽङ्काः ॥२॥
खं तत्त्वानि नगाब्धयोऽष्टषट्काः पञ्चेभा गजखेचरा रसाशाः ॥
नागाशा द्विदिशो नवाहयः षट्षष्टिः षट्कगुणा नभो गुरोः स्युः ॥३॥
खमग्न्यङ्गैस्तुल्या रसयमभुवः षट्कधृतयोऽरिसिद्धाः पक्षाभ्राग्नय उदधिनाराचदहनाः ॥
द्विशून्योदन्वन्तः खजलधिकृता भूरसकृतास्त्रिवेदोदन्वन्तो रसयमगुणाः खं भृगुजनेः ॥४॥
खमिषुक्षितयो गजाश्र्विनो गोदहना नागकृताः पयोधिबाणाः ॥
द्विरगेषुमिता हुताशबाणाः शरवेदास्त्रिगुणा धृतिः खमार्केः ॥५॥
शीघ्रांकांचे कोष्टक
नाम |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
९ |
१० |
११ |
१२ |
मंगळ |
५८ |
११७ |
१७४ |
२२८ |
१७९ |
३२५ |
३६५ |
३९३ |
४०० |
३६८ |
२४९ |
० |
बुध |
४१ |
८९ |
११७ |
१५० |
१७८ |
१९९ |
२१२ |
२१२ |
१९५ |
१५५ |
८९ |
० |
गुरू |
२५ |
४७ |
६८ |
८१ |
९८ |
१०६ |
१०८ |
१०२ |
८९ |
६६ |
३६ |
० |
शुक्र |
६० |
१२६ |
१८६ |
१४६ |
३०२ |
३५४ |
४०२ |
४४० |
४६१ |
४४३ |
३२६ |
० |
शनि |
१५ |
२८ |
३९ |
४८ |
५४ |
५७ |
५७ |
५३ |
४५ |
३३ |
१८ |
० |
पंचग्रहांची शीघ्रकेंद्रे शीघ्रफल आणि शीघ्रफलार्घाचा संस्कार
भौमार्कीज्यविहीनमध्यमरविः स्यात्स्वाशुकेन्द्रन्तुविद्भृग्वोरुक्तमिदं रसोर्घ्वमिनभाच्छुद्धं तदंशा दिनैः ॥
भक्ताः खादिफलं क्रमादिह गताङ्काऽसौ क्षयद्धर्य़ा हताच्छेषाद्बाणकुलब्धिहीनयुगयं दिग्त्दृल्लवाद्यं फलम् ॥६॥
प्राङ्मध्यमे चलफलस्य दलं विदध्यात्तस्माच्च मान्दमखिलं विदधीत मध्ये ।
द्राक्केन्द्रकेऽपि च विलोममतश्र्च शीघ्रं सर्वं च तत्र विदधीत भवेत्स्फुटोऽसौ ॥७॥
अर्थ -
मध्यम रवींतून मध्यमग्रह (मंगळ , गुरु किंवा शनि ) वजा करावा . म्हणजे तें त्या ग्रहाचें (मंगळ , गुरु , शनि ) शीघ्र केंद्र होते . मध्यम बुध आणि मध्यम शुक्र त्द्यांची केंद्रें पूर्वी मध्यम ग्रह आणते वेळेस सांगितली आहेत .
अभीष्ट ग्रहांचे केंद्र घेऊन तें ६ राशींपेक्षा अधिक असेल तर १२ राशींतून वजा करावें . नंतर त्याषड्भाल्प केंद्राचे अंश करून त्यास 15 नीं भागावें . जो भागाकार येईल तत्परिमित त्याग्रहाचे पूर्वी दिलेले शीघ्रांक घ्यावे , आणि त्या भागाकारांत एक मिळवून तत्परिमित पुनः त्याग्रहाचे शीघ्रांक घेऊन नंतर त्या दोन शीघ्रांकाची वजाबाकी करावी . जी बाकी राहील तिणें वरचे अंशात्मक बाकीस गुणून त्या गुणाकारास १५ नीं भागून भागाकार अंशादि तो , प्रथम घेतलेल्या शीघ्रांकांपेक्षां दुसरे घेतलेले शीघ्रांक अधिक आहेत तर प्रथम शीघ्रांकांत मिळवावा . आणि जर प्रथम शीघ्रांकांपेक्षां दुसरे शीघ्रांक कमी आहेत तर प्रथम शीघ्रांकांतून वजा करावा . आणि त्यास १० नीं भागून भागाकार अंशादि येतें तें शीघ्र फल होते . तें केंद्र मेषादि षड्भांत आहे तर धन आणि तूलादि षड्भांत आहे तर ऋण जाणावें . नंतर शीघ्र फलाचें अर्ध करून ते शीघ्र फल धन असेल तर अभीष्ट मध्यम ग्रहांतून वजा करावें म्हणजे शीघ्र फल दल स्पष्ट ग्रह होतो . या सातच्या श्र्लोकाचा अवशिष्ठ अर्थ पुढें लिहूं .
उदाहरण .
मध्यम रवि १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला - मध्यम मंगळ ९ राशि २९ अंश ५५ कला १३ विकला = ३ राशि ४ अंश १८ कला २९ विकला , हें मंगळाचें शीघ्र केंद्र झालें . मध्यम रवि १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला मध्यम गुरु ४ राशि ८ अंश १५ कला १७ विकला = ८ राशि २५ अंश ५८ कला २५ विकला , हें गुरूचें शीघ्र केंद्र झाले . मध्यम रवि १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला — मध्यम शनि ११ राशि ० अंश ३६ कला ४५ विकला = २ राशि ३ अंश ३६ कला ५७ विकला हें शनीचे शीघ्र केंद्र झालें . मंगळाचे केंद्र ३ राशि ४ अंश १८ कला २९ विकला ; हें षड्भाल्प आहे म्हणून ९४ अंश १८ कला २९ विकला यांस १५ नीं भागून भागाकार ६ बाकी ४ अंश १८ कला २९ विकला ( भागाकार परिमित भौमाचे शीघ्रांक ३२५ आणि एकाधिक शीघ्रांक ३६५ यांचें अंतर ) ४० ( = १७२ अंश १९ कला २० विकला ) ÷ १५ = ११ अंश २९ कला १७ विकला . आतां प्रथम शीघ्रांकांपेक्षा दुसरे शीघ्रांक अधिक आहेत म्हणून प्रथम शीघ्रांक ३२५ + ११ अंश २९ कला १७ विकला ( = ३३६ अंश २९ कला १७ विकला ) ÷ १० = ३३ अंश ३८ कला ५५ विकला , हे शीघ्र फल झाले . हें केंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून घन . आतां शीघ्र फलाचें अर्ध १६ अंश ४९ कला २७ विकला + मध्यम मंगळ ९ राशि २९ अंश ५५ कला १३ विकला = १० राशि १६ अंश ४४ कला ४० विकला , हा शीघ्र फलदल स्पष्ट भौम झाला . बुधकेंद्र १ राशि १७ अंश १४ कला ५० विकला ; हें षड्भाल्प आहे म्हणून ४७ अंश १४ कला ५० विकला यांस १५ नीं भागून भागाकार ३ बाकी २ अंश १४ कला ५० विकला भागाकार परिमित बुध शीघ्रांक ११७ आणि एकाधिक शीघ्रांक १५० त्द्यांचें अंतर ३३ (= ७४ अंश ९ कला ३० विकला ) ÷ १५ = ४ अंश ५६ कला ३८ विकला , आता प्रथम शीघ्रांक अधिक आहेत म्हणून प्रथम शीघ्रांक ११७ + ४ अंश + ५६ कला ३८ विकला ( = १२१ अंश ५६ कला ३८ विकला ) ÷ १० = १२ अंश ११ कला ३९ विकला . हे शीघ्रफल झालें , हें केंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून घन . म्हणून शीघ्रफलार्ध ६ अंश ५ कला ४९ + मध्यम बुध १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला = १ राशि १० अंश १९ कला ३१ विकला हा शीघ्रफल दल स्पष्टबुध झाला .
गुरूचें शीघ्रकेंद्र ८ राशि २५ अंश ५८ कला २५ विकला , हे ६ राशींहून अधिक आहे म्हणून १२ राशींतून वजा करून बाकी तीन राशि ४ अंश १ कला ३५ विकला ( = ९४ अंश १ कला ३५ विकला ) यांस १५ नीं भागून भागाकार ६ बाकी ४ अंश १ कला ३५ विकला ( ६ भागाकार परिमित गुरूचे शीघ्रांक १०६ आणि एकाधिक शीघ्रांक १०८ त्याचें अंतर २ ( = ८ अंश ३ कला १० विकला ) ÷ १५ = ० अंश ३२ कला १२ विकला . आतां प्रथम शीघ्रांक पुढील शीघ्रांका पेक्षां कमी आहेत म्हणून प्रथम शीघ्रांक १०६ + ० अ . ३२ कला १२ विकला . ( = १०६ अंश ३२ कला १२ विकला ) ÷ १० = १० अंश ३९ कला १३ विकला , हें शीघ्रफल झालें ; हें केंद्र तुलादि षड्भांत आहे म्हणून ऋण . आतां मध्यमगुरू ४ राशि ८ अंश १५ कला १७ विकला — शीघ्र फलार्ध ५ अंश १९ कला ३६ विकला = ४ राशि २ अंश ५५ कला ४१ विकला हा शीघ्र फल दल स्पष्ट गुरू झाला .
शुक्रांचे शीघ्र केंद्र . ३ रा . ५ अं . ४१ क . ३५ वि . हें षड्भाल्प आहे म्हणून ९५ अंश ४१ कला ३५ विकला भागाकार परिमित शुक्राचें शीघ्रांक ३५४ आणि एकाधिक शीघ्रांक ४०२ त्द्यांचें अंतर ४८ ( = २७३ अंश १६ कला ० विकला ) ÷ १० = १८ अंश १३ कला ४ विकला . आतां प्रथम शीघ्रांकांपेक्षा पुढील अधिक आहेत म्हणून प्रथम शीघ्रांक ३५४ + १८ अं . १३ क . ४ विक . ( = ३७२ अं . १३ क . ४ दिक .) ÷ १० = ३७ अंश १३ कला १८ विकला , हें शीघ्र फल झाले . हे , केंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून धन . आतां , शीघ्र फलार्ध १८ अंश ३६ कला — ३९ विकला + मध्यमशुक्र १ रा . ४ अं . १३ क . ४२ विक . = १ रा . २२ अं . ५० क . २१ विक . हा शीघ्र फलदल स्पष्टशुक्र झाला .
शनीचे केंद्र २ रा . ३ अं . ३६ क . ५७ विक . हे षड्भाल्प आहे म्हणून ६३ अंश ३६ क . ५७ विक . यांस १५ नीं भागून भागाकार ४ ; बाकी तीन अंश ३६ क . ५७ वि .+ भागाकार परिमित शनीचें शीघ्रांक ४८ आणि एकाधिक शीघ्रांक ५४ त्द्यांचे अंतर ६ ( = २१ अंश ४१ कला ४२ विकला ) ÷ १५ = १ अंश २६ क . ४६ विक . प्रथम शीघ्रांकांपेक्षा दुसरे शीघ्रांक अधिक आहेत म्हणून प्रथम शीघ्रांक ४८ + १ अं . २६ क . ४६ विक . ( = ४९ अं . २६ क . ४६ विक .) ÷ १० = ४ अं . ५६ क . ४० विक ., हे शीघ्रफल झालें . हें केंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून धन . आता , शीघ्र फलार्ध २ अंश २८ कला २० विकला + मध्यमशनि ११ राशि ० अं . ३६ क . ४५ विक . = ११ रा . ३ अं . ५ कं . ५ विकला , हा शीघ्र फलदल स्पष्ट शनि झाला .
मांदांक
खं गोऽश्र्विनोऽद्रिमरुतोऽक्षगजा नवाशाः सिद्धेन्दवः खदहनक्षितयोऽसृजोऽङ्काः ॥
मान्दा बुधस्य खमिनाः कुदृशोऽष्टपक्षा देवाः शरानलमिता रसवह्नयः स्युः ॥८॥
खेन्द्रर्क्षाणि नवाग्नयोऽहूयुदधयोऽक्षाक्षा नवाक्षा गुरोः शुक्रस्याभ्ररसेशविश्र्वमनवो द्विर्बाणचन्द्राः क्रमात् ॥
खं गोऽब्जाः खकृताः खषण्नगनगा गोष्टौ त्रिनन्दाः शनैः शुद्धोऽब्ध्यद्रिषडग्निनागगृहतः स्यान्मन्दकेन्द्रं कुजात् ॥९॥
मांदां कांचे कोष्टक
नाम |
० |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
मंगलकेमेदांक |
० |
२९ |
५७ |
८५ |
१०९ |
१२४ |
१३० |
बुधकेमेदांक |
० |
१२ |
२१ |
२८ |
३३ |
३५ |
३६ |
गुरूकेमेदांक |
० |
१४ |
२७ |
३९ |
४८ |
५५ |
५७ |
शुक्रकेमेदांक |
० |
६ |
११ |
१३ |
१४ |
१५ |
१५ |
शनिकेमेदांक |
० |
१९ |
४० |
६० |
७७ |
८९ |
९३ |
मंदकेंद्र
ग्रहांची मंदोच्चें , मंगळाचें ४ राशि , बुधाचें ७ राशि , गुरूचें ६ राशि , शुक्राचें ३ राशि , शनीचें ८ राशि आहे . आता अभीष्ट ग्रहाचें मंदोच्च घेऊन त्यांतून शीघ्रफल दल स्पष्ट ग्रह वजा करावा म्हणजे मंद केंद्र होते .
उदाहरण .
मंगळाचें मंदोच्च ४ रा . ० अ . क . ० विक — शीघ्र फलदल स्पष्ट मंगळ १० रा . १६ अं . ४४ क . ४० विक . = ५ राशि १३ अं . १५ क . २० विकला , हें मंगळाचें मंद केंद्र झाले . बुधाचें मंदोच्च ७ रा . ० अं . ० क . ० विक .— शीघ्रफलदल स्पष्ट बुध १ रा . १० अं . १९ क . ३१ विक . = ५ रा . १९ अं . ४० क . २९ विकला , हें बुधाचें मंद केंद्र झालें . गुरूचें मंदोच्च ६ राशि ० अंश ० कला ० विकला — शीघ्रफल दल स्पष्ट गुरू ४ रा . २ अं . ५५ कला ४१ विक . = १ राशि २७ अं . ४ कला १९ विकला हें गुरूचें मंदकेंद्र झालें . शुक्राचें मंदोच्च ३ रा . ० अंश ० क . ० विक .— शीघ्र फलदल स्पष्ट शुक्र १ रा . २२ अं . ५० क . २१ विक . = १ रा . ७ अं . ९ क . ३९ विक ., हें शुक्राचें मंद केंद्र झालें .
शनीचें मंदोच्च ८ रा . ० अं . ० क . ० विक . — शीघ्र फलदल स्पष्ट शनी ११ राशि ३ अंश ५ कला ५ विकला = ८ राशि २६ अंश ५४ कला ५५ विकला , हें शनीचें मंदकेंद्र झालें .
मंदफल .
मृदुकेन्द्रभुजांशका दिनाप्ताः फलमङ्कः प्रगतस्तदूनितैष्यः ।
परिशेषहतो दिनाप्तियुक्तो दशभक्तः फलमंशकादि मान्दम् ॥१०॥ ( तस्माच्च मांद श्लोक ७ पहा )
अर्थ -
अभीष्ट ग्रहांच्या मंदकेंद्राचा भक्तज करावा , आणि त्या भुजांचे अंशास १५ नीं भागून , भागाकार परिमित मांदांक घेऊन त्यांची वजाबाकी करावी , आणि त्या बाकीनें अंशादिक बाकीस गुणून त्या गुणाकारास १५ नीं भागावें , जो भागाकार अंशादि येईल तो प्रथम मांदांकांत मिळवून जी बेरीज येईल तिला १० नीं भागावें म्हणजे अंशादि मंदफल होतें . तें , मृदु केंद्र मेषादि षड्भांत आहेतर धन आणि तुलादि षड्भांत आहेतर ऋृण जाणावें . नंतर ते मंदफल अभीष्ट मध्यम ग्रहांत धन ऋण करावें म्हणजे मंद स्पष्ट ग्रह होतो .
उदाहरण .
मंगळाचें मंदकेंद्र ५ राशि १३ अंश १५ कला २० विकला ; त्या चा भक्तज ० राशि १६ अंश ४४ कला ४० विकला = १६ अंश ४४ कला ४० विकला त्द्यास १५ नीं भागून भागाकार १ , म्हणून बाकी १ अंश ४४ कला ४० विकला भागाकार परिमित मंगळाचे मांदांक २९ आणि एकाधिक मांदांक ५७ यांचें अंतर २८ ( = ४८ अंश ५० कला ४० विकला ) ÷ १५ = ३ अंश १५ कला २२ विकला ; यांत प्रथम मांदांक २९ मिळवून ३९ अंश १५ कला २२ विकला ÷ १० = ३ अंश १३ कला ३२ विकला , हें मंदफल झालें ; हें मंदकेंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून धन . आतां मंदफल ३ अंश १३ कला ३२ विकला + मध्यम मंगळ ९ राशि २९ अंश ५५ कला १३ विकला = १० राशि ३ अंश ८ कला ४५ विकला , हा मंदस्पष्ट मंगळ झाला .
बुधाचें मंदकेंद्र ५ राशि १९ अंश ४० कला २९ विकला , याचा भक्तज ० राशि १० अंश १९ कला ३१ विकला = १० अंश १९ कला ३१ विकला . यांस १५ नीं भागून भागाकार ० , म्हणून बाकी १० अंश १९ कला ३१ विकला . यांस १५ नीं भागून भागाकार ० , म्हणून बाकी १० अंश १९ कला ३१ विकला ÷ १५ भागाकार परिमित बुधाचे मांदांक ० आणि एकाधिक मांदांक १२ यांचें अंतर १२ ( = १२३अंश ५४ कला १२ विकला ) ÷ १५ = ८ अंश १५ कला ३६ विकला ; यांत प्रथम मांदांक ० मिळवून ८ अंश १५ कला ३६ विकला ÷ १० = ० अंश ४९ कला ३३ विकला ; हें मंदफल , केंद्र मेषादि आहे म्हणून धन म्हणून मध्यम बुध १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला + मंदफल ० अंश ४९ कला ३३ विकला = १ राशि ५ अंश ३ कला १५ विकला , हा मंदस्पष्ट बुध झाला .
गुरूचें मंदकेंद्र १ रा . २७ अंश ४ कला १९ विकला , याचा अंशादि भक्तज ५७ अंश ४ कला १९ विकला . यांस १५ नीं भागून भागाकार ३ म्हणून बाकी १२ अंश ४ कला १९ विकला भागाकार परिमित गुरूचे मांदांक ३९ आणि एकाधिक मांदांक ४८ यांचें अंतर ९ ( = १०८ अंश ३८ कला ५१ विकला ) ÷ १५ = ७ अंश १४ कला ३५ विकला ; यांत प्रथम मांदांक ३९ मिळवून ४६ अंश १४ कला ३५ विकला ÷ १० = ४ अंश ३७ कला २७ विकला ; हें मंदफल मंदकेंद्र मेषादि षड्भांत आहे म्हणून घन . आता मध्यम गुरू ४ रा . ८ अं . १५ कला . १७ विकला + मंदफल ४ अं . ३७ क . २७ विक . = ४ रा . १२ अं . ५२ कला ४४ विकला , हा मंदस्पष्ट गुरु झाला .
शुक्राचें मंदकेंद्र १ राशि ७ अंश ९ कला ३९ विकला . याचा अंशादि भक्तज ३७ अंश ९ कला ३९ विकला . यास १५ नीं भागून भागाकार दोन , म्हणून बाकी ७ अंश ९ कला ३९ विकला भागाकार परिमित शुक्राचे मांदांक ११ आणि एकाधिक मांदांक १३ यांचें अंतर २ ( = १४ अंश १९ कला १८ विकला ) ÷ १५ = ० अंश ५७ कला १७ विकला ; यांत प्रथम मांदांक ११ मिळवून ११ अंश ५७ कला १७ विकला ÷ १० = १ अं . ११ कला ४३ विकला ; हे मंदफल मंदकेंद्र मेषादि आहे म्हणून घन . आतां मध्यम शुक्र १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला + मंदफल १ अंश ११ क . ४३ विकला = १ राशि ५ अंश २५ कला २५ विकला ; हा मंद स्पष्ट शुक्र झाला .
शनीचे मंदकेंद्र ८ राशि २६ अंश ५४ क . ५५ विक . याचा भुज २ रा . २६ अं . ५४ क . ५५ विक . = ८६ अं . ५४ क . ५५ विक . यास १५ नीं भागून भागाकार ५ म्हणून बाकी ११ अं . ५४ कला . ५५ विकला भागाकार परिमित शनीचे मांदांक ८९ आणि एकाधिक मांदांक ९३ यांचें अंतर ४ ( = ४७ अंश ३९ क . ४० विक .) ÷ १५ = ३ अंश १० कला ३८ विक ; यांत प्रथम मांदांक ८९ मिळवून ९२ अं . १० क . ३८ विक . ÷ १० = ९ अं . १३ क . ३ विकला ; हें मंदफल , मंदकेंद्र तुलादि आहे म्हणून ऋण . आतां मध्यम शनि राशि ० अंश ३६ कला ४५ विकला - मंदफल ९ अंश १३ कला ३ विकला = १० राशि २१ अंश २३ कला ४२ विकला , हा मंदस्पष्ट शनि झाला .
द्वितीय शीघ्रफल आणि ग्रहस्पष्टीकरण संस्कार .
द्राक्केंद्रेनि — श्र्लोक ७ उत्तरार्ध -
अर्थ -
अभीष्ट ग्रहांचे मंदफल घेऊन तें शीघ्र केंद्रांत धन असेल तर वजा करावें आणि ऋण असेल तर मिळवावे , म्हणजे द्वितीय शीघ्र केंद्र होते . मग त्यापासून प्रथम शीघ्र फलाप्रमाणेंच शीघ्रफल आणावें म्हणजे तें द्वितीय शीघ्र फल होतें . मग ते प्रथम शीघ्र फलार्धा प्रमाणेंच मंदस्पष्ट ग्रहांत धन ऋण करावें म्हणजे अभीष्टग्रह स्पष्ट होतो .
उदाहरण .
मंगळाचें मंदफल (३ अंश १३ कला ३२ विकला ) धन आहे , म्हणून शीघ्र केंद्र ३ राशि ४ अंश १८ कला २९ विकला -मंदफल ३ अंश १३ कला ३२ विकला = ३ राशि १ अंश ४ कला ५७ विकला ; हें द्वितीयशीघ्रकेंद्र झालें , हें ६ राशिंहून कमी आहे म्हणून ९१ अं . ४ कला ५७ विक . यांस १५ नीं भागून भागाकार ; आणि बाकी १ अंश ४ कला ५७ विकला भागाकार परिमित मंगळाचा शीघ्रांक ३२५ आणि एकाधिक शीघ्रांक ३६५ त्यांचे अंतर ४० ( = ४३ अंश १८ कला ० विकला ) ÷१५ =२ अंश ५३ कला १२ विकला ; यांत प्रथम शीघ्रांक ३२५ मिळवून ३२७ अंश ५३ कला १२ विकला ÷१० =३२ अंश ४७ कला १९ विकला , हे द्वितीय शीघ्र फल झालें . हें द्वितीय शीघ्र केंद्र मेषादि आहे म्हणून धन . आतां , शीघ्रफल ३२ अंश ४७ कला १९ विकला +मंदस्पष्ट मंगळ १० राशि ३ अंश ८ कला ४५ विकला = ११ राशि ५ अंश ५६ कला ४ विकला , हा स्पष्ट मंगळ झाला .
बुधाचें मंदफल (० अंश ४९ कला ३३ विकला ) धन म्हणून शीघ्रकेंद्र १ रा . १७ अं . १४ क . ५० विक .— मंदफल ० अं . ४९ क . ३३ विक . = १ रा . १६ अं . २५ क . १७ विक . हें द्वितीय शीघ्र केंद्र झालें . हे षड्भाल्प आहे म्हणून ४६ अं . २५ कला १७ विकला , यांस १५ नीं भागून भागाकार ३ आणि बाकी १ अंश २५ कला १७ विकला भागाकार परिमित बुधाचे शीघ्रांक ११७ आणि एकाधिक शीघ्रांक १५० त्यांचे अंतर ३३ ( =४६ अंश ५४ कला २१ विकला ) ÷१५ =३ अंश ७ कला ३७ विकला , यांत प्रथम शीघ्रांक ११७ मिळवून १२० अंश ७ कला ३७ विकला ÷१० =१२ अंश ० कला ४५ विकला . हे द्वितीय शीघ्र फल , द्वितीय केंद्र मेषादि आहे म्हणून धन म्हणून मंदस्पष्ट बुध १ रा . ५ अंश ३ कला १५ विकला +द्वितीय शीघ्रफल १२ अंश ० कला ४५ विकला १ राशि १७ अंश ४ कला ० विकला ; हा स्पष्ट बुध झाला .
गुरूंचे मंदफल (४ अं . ३७ कला २७ विकला ) धन आहे म्हणून शीघ्रकेंद्र ८ राशि २५ अंश ५८ कला २५ विकला —मंदफल ४ अंश ३७ कला २७ विकला =८ राशि २५ अंश ५८ कला २५ विकला —मंदफल ४ अंश ३७ कला २७ विकला =८ राशि २१ अंश २० कला ५८ विकला . हें द्वितीय शीघ्रकेंद्र झालें हें १२ राशींतून वजा करून बाकी ३ राशि ८ अंश ३९ कला २ विकला =९८ अंश ३९ कला २ विकला ; यांस १५ नीं भागून भागाकर ६ , आणि बाकी ८ अंश ३९ कला २ विकला भागाकार परिमित गुरूचे शीघ्रांक १०६ आणि एकाधिक शीघ्रांक १०८ यांचें अंतर २ ( =१७ अंश १८ कला ४ विकला ) ÷१५ =१ अंश ९ कला १२ विकला ; यांत प्रथम शीघ्रांक १०६ मिळवून , १०७ अंश ९ कला १२ विकला ÷१० =१० अंश ४२ कला ५५ विकला ; हें द्वितीय शीघ्रफल , द्वितीय केंद्र तुलादि आहे . म्हणून ऋण . आतां मंदस्पष्टगुरू . ४ राशि १२ अंश ५२ कला ४४ विकला द्वितीय शीघ्रफल १० अंश ४२ कला ५५ विकला = ४ राशि २ अंश ९ कला ४९ विकला , हा स्पष्टगुरू झाला .
शुक्राचें मंदफल (१ अंश ११ कला ४३ विकला ) धन आहे म्हणून शीघ्रकेंद्र ३ रा . ५ अं . ४१ कला ३५ विकला — मंदफल १ अंश ११ कला ४३ विकला = ३ राशि ४ अंश २९ कला ५२ विकला हें द्वितीयशीघ्र केंद्र झालें . (९४ अंश २९ कला ५२ विकला ) यांतील अंशांस १५ नीं भागून भागाकर ६ ; आणि बाकी ४ अंश २९ कला ५२
विकला भागाकार परिमित शुक्राचे शीघ्रांक ३५४ आणि एकाधिक शीघ्रांक ४०२ यांचे अंतर ४८ ( =२१५ अं . ५३ कला ३६ विकला ) ÷१५ =१४ अंश २३ कला ३४ विकला , यांत प्रथम शीघ्रांक ३५४ मिळवून ३६८ अंश २३ कला ३४ विकला ÷१० =३६ अंश ५० कला २१ विकला , हें द्वितीय शीघ्रफल , द्वितीय केंद्र मेषादि आहे म्हणून धन . म्हणून मंदस्पष्ट शुक्र १ राशि ५ अंश २५ कला २५ विकला + द्वितीय शीघ्रफल ३६ अंश ५० कला २१ विकला = २ राशि १२ अंश १५ कला ४६ विकला , हा स्पष्ट शुक्र झाला .
शनीचें मंदफल (९ अंश १३ कला 3 विकला .) ऋण आहे म्हणून शीघ्रकेंद्र २ राशि ३ अंश ३६ कला ५७ विकला +मंदफल ९ अंश १३ कला . ३ विकला = २ राशि १२ अंश ५० कला ० विकला =७२ अंश ५० कला ० विकला . यांस १५ नीं भागून भागाकार ४ आणि बाकी १२ अंश ५० क . विक . भागाकार परिमित शनीचे शीघ्रांक ४८ आणि एकाधिक शीघ्रांक ५४ यांचें अंतर ६ ( = ७७ अंश ० क . ० विक .) ÷१५ =५ अंश कला ० विकला ; यांत प्रथम शीघ्रांक ४८ मिळवून ५३ अंश ८ कला ० विकला ÷१० =५ अंश १८ कला ४८ विकला ; हें द्वितीय शीघ्रफल , द्वितीय केंद्र मेषादि आहे म्हणून धन . म्हणून मंदस्पष्ट शनि १० राशि २१ अंश २३ कला ४२ विकला +द्वितीय शीघ्रफल ५ अंश १८ कला विकला = १० राशि २६ अंश ४२ कला ३० विकला हा स्पष्ट शनि झाला .
शुक्र आणि मंगळ यांस विशेष संस्कार
शुक्रारयोश्र्चलभवोऽन्त्यगतो यदाङ्कः शेषांशकाश्र्च पतिताः पृथगक्षभूभ्यः ॥
येऽल्पा भृगोस्त्रित्दृता असृजोऽक्षभक्ता देयाः स्वशीघ्रफलवत्स्फुटयोः स्फुटौ तौ ॥११॥
अर्थ -
द्वितीय शीघ्रफल आणते वेळेस जर भागाकारानें शीघ्रांक अंत्य म्हणजे शेवटचा आला तर ग्रह स्पष्ट केल्यानंतर ही , शुक्र आणि मंगळ त्यांस स्पष्ट होण्यास एक विशेष संस्कार करावा लागतो . तो असा आहे की , षड्भाल्प द्वितीय शीघ्र केंद्रास १५ नीं भागून जी अंशादिक बाकी राहिली असेल ती १५ अंशांतून वजा करून जी बाकी राहील ती आणि पहिली बाकी यांत जी कमी असेल ती घेऊन तिला अनुक्रमें ३ आणि ५ यांनीं भागावें ; जे भागाकार अंशादि येतील ते द्वितीय शीघ्रफलांप्रमाणेंच अनुक्रमें स्पष्टशुक्र आणि स्पष्ट मंगळ त्यांस धन ऋण करावें .
पंचग्रहांच्या मंदस्पष्टगति .
मान्दाङ्कान्तरमार्क्यसृग्गुरूणां भक्त बाणनगैः शरैः खरामैः ॥
विद्भृग्वोर्द्विहतेषु भाजितं तद्दद्यात्प्राग्वदितौ मृदुस्फुटा सा ॥१२॥
अर्थ -
मंदफल आणते वेळेस जें मांदांकांतर आले असेल त्यास अभीष्ट ग्रहाच्या खालीं दिलेल्या आंकड्यानें भागावें ; जो भागाकार कलादि येईल तो , मंदकेंद्र कर्कादि षड्भांत आहे तर धन , आणि मकरादि षड्भांत आहे तर ऋण जाणावा . नंतर तो कलादि भागाकार अभीष्ट ग्रहाचे मध्यम गतींत धन ऋण करावा म्हणजे मंदस्पष्ट गति होते .
मंगळ |
बुध |
गुरू |
शुक्र |
शनि |
५ |
५ /२ |
३० |
५ /२ |
७५ |
हे मांदांकांतराचे भाजकांक आहेत .
५ /२ नी भागणे म्हणजे २ ने गुणून ५ नी भागणे .
उदाहरण .
मंगळाचें मंदफळ आणते वेळेस मांदांकांतर २८ ÷५ =५ कला ३६ विकला . हा भागाकार , मंदकेंद्र कर्कादि आहे म्हणून धन ; यांत मध्यम गति ३१ कला २६ विकला मिळवून ३७ कला २ विकला ही मंगळाची मं .स्प .ग . झाली .
बुधाचें मांदांकांतर १२ ÷५ /२ =१२ २ /५ =४ कला ४८ वकला . हा भागाकार मंदकेंद्र कर्कादि आहे म्हणून धन ; यांत मध्यमगति ५९ कला ८ विकला मिळवून ६३ कला ५६ विकला , ही बुधाची मंदस्पष्ट गति झाली .
गुरूचे मांदांकांतर ९ ÷३० =० कला १८ विकला . हा भागाकार , मंदकेंद्र मकरादि आहे म्हणून ऋण . आतां मध्यम गति ५ कला ० विकला -भागाकार ० कला १८ विकला =४ कला ४२ विकला ही गुरूची मंदस्पष्टगति झाली .
शुक्राचें मांदांकांतर २ ÷५ /२ =२ २ /५ =० कला ४८ विकला . हा भागाकार , मंदकेंद्र मकरादि म्हणून ऋण . आतां , मध्यमगति ५९ कला ८ विकला —भागाकार ० कला ४८ विकला = ५८ कला २० विकला ही शुक्राची मंदस्पष्ट गति झाली .
शनीचें मांदांकांतर ४ ÷७५ =० कला ३ विकला ; हा भागाकार , मंद केंद्र कर्कादि आहे म्हणून धन . यांत मध्यम गति २ कला ० विकला मिळवून २ कला ३ विकला ही शनीची मंदस्पष्ट गति झाली .
पंचग्रहांच्या स्पष्टगति
भौमाच्चलाङ्कविवरं शरत्दृत्स्वबाणांशाढ्यं त्रित्दृत्कृतत्दृतं द्विगुणाक्षभक्तम् ॥
तद्धीनयुक्क्षयचये तु मृदुस्फुटा स्यात्स्पष्टाऽथ चेद्बहु ऋणात्पतिता तु वक्रा ॥१३॥
अर्थ -
द्वितीय शीघ्रफल करतेवेळस जें शीघ्रांकांचे अंतर आलें असेल , त्यास अभीष्ट ग्रहाचे खालीं दिलेले आकड्यानें भागून , जों भागाकार कलादि येईल तो प्रथम शीघ्रांक पुढील शीघ्रांकांहून अधिक असल्यास धन जाणावा . नंतर तो भागाकार मंदस्पष्ट गतीस धन ऋण करावा , म्हणजे स्पष्ट गति होते . जेव्हां भागाकार ऋण असून मंदस्पष्ट गतींतून वजा होत नाही तेव्हां त्या भागाकारांतून मंद स्पष्ट गति वजा करावी , जी बाकी राहील ती त्या ग्रहाची वक्रगति असें जाणावें .
हे शीघ्रांकांतरांचे भाज्यकांक
मंगलका |
बुधका |
गुरूका |
शुक्रका |
शनिका |
५ |
५ /६
|
३ |
४ |
५ /२ |
उदाहरण
मंगळाचे शीघ्रांकांतर ४० ÷५ =८ कला ० विकला . हा भागाकार शीघ्रांकांतर वाढतें आहे म्हणून धन ; म्हणून मंदस्पष्टगति ३७ कला २ विकला + ८ कला ० विकला = ४५ कला २ विकला . ही मंगळाची स्पष्ट गति झाली .
बुधाचें शीघ्रांकांतर ३३ ÷५ /६ = (३३ ६ = )१९८ ÷५ =३९ कला ३६ विकला हा भागाकार , शीघ्रांकांतर वाढतें आहे म्हणून धन . यांत मंद स्पष्टगति ६३ कला ५६ विकला मिळवून १०३ कला ३२ विकला ; ही बुधाची स्पष्ट गति झाली .
गुरूचे शीघ्रांकांतर २ ÷३ =० कला ४० विकला हा भागाकार शीघ्रांकांतर वाढते आहे म्हणून धन . यांत मंदस्पष्ट गति ४ कला ४२ विकला मिळवून ५ कला २२ विकला ही गुरूची स्पष्ट गति झाली . शुक्राचें शीघ्रांकांतर ४८ ÷४ =१२ कला ० विकला हा भागाकार शीघ्रांकांतर वाढते म्हणून धन . यांत मंदस्पष्ट गति ५८ कला २० विकला मिळवून ७० कला २० विकला ही शुक्राची स्पष्ट गति झाली .
शनीचें शीघ्रांकांतर ६ ÷५ /२ = (६ २ = ) १२ ÷५ =२ कला २४ विकला हा भागाकार शीघ्रांकांतर वाढते आहे म्हणून धन . यांत मंदस्पष्टगति २ कला ३ विकला मिळवून ४ कला २७ विकला ही शनीची स्पष्टगति झाली .
मंगळ बुध आणि शुक्र यांचे गतींस विशेष संस्कार .
कुजबुधभृगुजानां चेच्चलाङ्कोऽन्तिमः स्याद् दशहतपरिशेषांशा नगाद्र्य़ग्निभक्ताः ॥
फलमिषुदहनैर्युक्सप्तगोभिस्त्रिबाणैर्भवति गतिफलं तत्स्यात्तदा नैव पूर्वम् ॥१४॥
अर्थ -
द्वितीय शीघ्रफल आणते वेळेस जर भागाकारानें शीघ्रांक अंत्य म्हणजे शेवटचा आला तर मंगळ , बुध आणि शुक्र त्यांच्या मंदस्पष्ट गतींत जो शीघ्रांकांतराचा संस्कार सांगितला आहे तो नकरितां दुसराच एक संस्कार करावा लागतो तो असा आहे की , षड् भाल्प द्वितीय शीघ्र केंद्रास १५ नीं भागून जी अंशादि बाकी राहिली असेल तीस १० नीं गुणून क्रमानें ७ ,७ आणि ३ त्यांनी भागावें . जे कलादि भागाकार येतील त्यांत अनुक्रमानें ३५ , ९७ आणि ५३ हे मिळवावे ; ज्या बेरजा येतील त्या शीघ्रफलाप्रमाणेंच मंदस्पष्ट गतीस धनऋण कराव्या म्हणजे मंगळ बुध आणि शुक्र याच्या स्पष्टगति होतात .
ग्रहांचे वक्रीभवन आणि मार्गीभवन
त्रिनृपैः शरजिष्णुभिः शरार्र्कैं र्नगभूपैस्त्रिभवैः क्रमात्कुजाद्याः ।
चलकेन्द्रलवैः प्रयान्ति वक्रं भगणात्तैः पतितैर्व्रजन्ति मार्गम् ॥१५॥
अर्थ -
द्वितीय शीघ्र केंद्राचे अंश अनुक्रमानें मंगळाचे १६३ , बुधाचे १४५ , गुरूचे १२५ , शुक्राचे १६७ आणि शनीचे ११३ इतके झाले म्हणजे ते अनुक्रमाने वक्री होतात , म्हणजे त्यांची गति उलट होते . आणि अनुक्रमानें १९७ , २१५ , २३५ , १९३ आणि २४७ इतके द्वितीय शीघ्र केंद्राचे अंश झाले म्हणजे अनुक्रमानें ते मार्गी होतात , म्हणजे पुढें चालू लागतात .
मंगळ , गुरू आणि शनि यांचे उदयास्त .
क्षितिजोऽष्टयमैरुदेति पूर्वे गुरुरिन्द्र रविजस्तु सप्तचन्द्रैः ।
स्वस्वोदयभागसंविहीनैर्भगणांशैरपरत्र यांति चास्तम् ॥१६॥
अर्थ -
द्वितीय शीघ्र केंद्राचे अंश अनुक्रमानें मंगळाचे २८ , गुरूचे १४ आणि शनीचे १७ इतके झाले म्हणजे मंगळ , गुरू आणि शनि त्यांचा पूर्वेस उदय होतो . आणि द्वितीय शीघ्रकेंद्राचे अंश अनुक्रमानें ३३२ ,३४६ आणि ३४३ इतके झाले म्हणजे मंगळगुरू आणि शनि यांचा पश्र्चिमस अस्त होतो .
बुध आणि शुक्र यांचे उदयास्त
खशरैश्र्च जिनैः परे ज्ञभृग्वोरुदयोऽस्तोऽक्षदिनैर्नगाद्रिभूभिः ॥
उदयोऽक्षनखस्त्र्यहीन्दुभिः प्रागस्तो दिग्दहनैश्र्च षट्सुरैः स्यात् ॥१७॥
अर्थ -
द्वितीय शीघ्रकेंद्राचे अंश , बुधाचे ५० आणि शुक्राचे २४ इतके झाले म्हणजे बुधाचा आणि शुक्राचा पश्र्चिमेस उदय होतो आणि द्वितीय शीघ्रकेंद्राचे अंश अनुक्रमानें १५५ इतके झाले म्हणजे बुध आणि शुक्र त्यांचा पूर्वेस उदय होतो . आणि ते अंश अनुक्रमानें ३१० आणि ३३६ इतके झालें . म्हणजे बुध आणि शुक्र ह्यांचा पूर्वदिशेस अस्त होतो .
ग्रहांची वक्रगति , उदय अस्त आणि सरलगति याचे दिवस .
वक्रोदयदिगदितांशकतोऽधिकाल्पाः केन्द्रांशकाः क्षितिसुताद्द्विगुणास्त्रिभक्ताः ।
सांकांशका दशहतांगत्दृताः कुभक्ता वक्राद्यमाप्तदिवसैः क्रमशौ गतैष्यम् ॥१८॥
अर्थ -
ग्रहांचे वक्रगति ,, उदय अस्त आणि मार्गगति ह्यांचे जे द्वितीय शीघ्र केंद्रांश सांगितले आहेत ते आणि अभीष्ट शीघ्र केंद्रांश ह्यांचे अंत करून त्यास अनुक्रमानें , मंगळाचा १ /२ , बुधाचे ३ गुरूचा ९ /१० शुक्राचा ६ /१० आणि शनीचा १ ह्या आंकड्यानें भागावें ; जो भागाकार येईल ते दिवस झालें . नंतर सांगितलेल्या शीघ्र केंद्रांशांपेक्षा अभीष्ट शीघ्र केंद्रांश जर अधिक आहेत तर वक्र , उदय , अस्त आणि मार्ग हे होऊन इतके दिवस झाले असें समजावें आणि जर उक्त शीघ्र केंद्रांशांपेक्षां अभीष्ट शीघ्र केंद्रांश कमी आहेत तर वक्र उदय , अस्त आणि मार्ग हे होण्यास अजून इतके दिवस लागतील असे समजावें .
बुध आणि शुक्र ह्यांची वक्रगति , उदय अस्त आणि मार्ग गति होण्याचा सुमार
पूर्वास्तादुदयः परेऽनृजुगतिस्तोयास्तमैन्द्र्य़ुद्रमो मार्गोऽस्तोऽत्र च दन्तदन्तदहनाष्ट्याज्याशदन्तैर्दिनैः ॥
चान्द्रेस्तत्परतत्परं त्वथ भृगोस्तद्वद्द्विमाः स्यात्ततोऽष्टाभिर्व्यंघ्रिभुवांघ्रिणा विचरणैकेनाष्टमासैः क्रमात् ॥१९॥
अर्थ -
बुधाचा पूर्वेस अस्त झाल्या पासून ३२ दिवसांनी पश्र्चिमेस उदय होतो ; उदय झाल्यापासून ३२ दिवसांनी वक्रगति होत्ये ; वक्रगति झाल्यापासून ३ दिवसांनी पश्र्चिमेस अस्त होतो ; अस्त झाल्यापासून १६ दिवसांनी पूर्वेस उदय होतो ; उदय झाल्या पासून ३ दिवसांनी मार्गी होतो , मार्गी झाल्यापासून पुनः ३२ दिवसांनी पूर्वेस अस्त होतो , याप्रमाणें पुनः पुनः होते .
शुक्राचा पूर्वेस अस्त झाल्यापासून ६० दिवसांनी म्हणजे २ महिन्यांनीं पश्र्चिमेस उदय होतो ; उदय झाल्यापासून २४० दिवसांनी म्हणजे ८ महिन्यांनी वक्री होतो . वक्री झाल्यापासून २२ दिवसांनी म्हणजे ३ /४ महिन्यानें पश्र्चिमेस अस्त होतो ; अस्त झाल्यापासून 8 दिवसांनी म्हणजे १ /४ महिन्याने मार्गी होतो ; मार्गी झाल्यापासून पुनः २४० दिवसांनी म्हणजे ८ महिन्यांनी पूर्वेस अस्त होतो . या प्रमाणे पुनः पुनः होते .
मंगळ गुरू आणि शनि यांचे वक्रीभवन , उदय , अस्त आणि मार्गी भवन
भौमस्यास्तादुदयकुटिलर्जुत्वमौढ्यं क्रमात्स्यान्मासैर्वेदैरथ दशमितैर्लोचनाभ्यां च दिग्भिः ॥
जीवस्योर्व्या सचरणयुगैः सागरैः सांघ्रिवेदैः साङ्घ्रयेकेन त्रियुगदहनैरर्धयुक्तैस्तथाऽऽर्केः ॥२०॥
अर्थ -
मंगळाचा पश्र्चिमेस अस्त झाल्यापासून १२० दिवसांनी पूर्वेस उदय होतो ; उदय झाल्यापासून ३०० दिवसांनी वक्री होतो ; वक्री झाल्यापासून ६० दिवसांनी मार्गी होतो ; मार्गी झाल्यापासून ३०० दिवसांनी पश्र्चिमेस अस्त होतो . याप्रमाणें वारंवार होते .
गुरूचा पश्र्चिमेस अस्त झाल्यापासून ३० दिवसांनी पूर्वेस उदय होतो ; उदय झाल्यापासून १२८ दिवसांनी वक्री होतो ; वक्री झाल्यापासून १२० दिवसांनी मार्गी होतो ; मार्गी झाल्यापासून १२८ दिवसांनी पश्र्चिमेस अस्त होतो . याप्रमाणें पुनःपुनः होते .
शनीचा अस्त पश्र्चिमेस झाल्यापासून ३८ दिवसांनी म्हणजे १ १ /४ मासानें पूर्वेस उदय होतो ; उदय झाल्यापासून १०५ दिवसांनी म्हणजे ३ १ /२ मांसांनीं वक्री होतो ; वक्री झाल्या पासून १३५ दिवसांनी म्हणजे ४ १ /२ मासांनीं मार्गी होतो ; मार्गी झाल्यापासून १०५ दिवसांनी म्हणजे ३ १ /२ मासांनी मार्गी होतो ; मार्गी झाल्यापासून १०५ दिवसांनी म्हणजे ३ १ /२ मासांनी पश्र्चिमेस अस्त होतो . याप्रमाणे पुनः पुनः होते .
पंचताराधिकार समाप्त