अथ मासगणात्सुलघुक्रियया ग्रहणद्वयसिद्धिकृतेऽभिदधे ॥
स्फुटसूर्यविपाततिथींश्र्च वपुर्ग्रसनादिविशेषचमत्कृतये ॥१॥
अर्थ -
लोकांस विशेष चमत्कार वाटावा व सक्तलभ रीतीनें मासगणापासूनच दोन्ही ग्रहणें आणतां यावीं म्हणून स्पष्टरवि , व्यग्वर्कतिथि बिंबें आणि ग्रास इत्यादि सांगतो .
भानोः खम्भूः खाब्धयोऽयं ध्रुवः स्याच्छैलाः क्वर्का राशिपूर्वो व्यगोः स्यात् ॥
वृत्तस्याङ्का भूरसाश्र्चाथ तिथ्या वाराद्यस्याक्षाःखगास्तर्करामाः ॥२॥
धृवांक कोष्टक
नाम |
रवि |
व्यगु |
वृत्त |
वारादि |
राशि |
० |
७ |
९ |
५ वार |
अंश |
१ |
१ |
१ |
९ घटी |
कला |
४० |
१२ |
६ |
३६ पल |
विकला |
० |
० |
० |
विप. |
क्षेपो भाद्यः खं कृता भूदृशोऽर्के रुद्राः शैला नागचन्द्रा विपाते ॥
वृत्ते शून्यं वज्रिणश्र्चन्द्रबाणा वाराद्ये द्वौ व्यङ्घ्रिन्दाब्धयः स्यात् ॥३॥
क्षेपकांक कोष्टक
नाम |
रवि |
व्यगु |
वृत्त |
वारादि |
राशि |
० |
११ |
० |
२ वार |
अंश |
४ |
७ |
१४ |
४८ घ . |
कला |
२१ |
१८ |
५१ |
४५ प . |
विकला |
७ |
० |
० |
० विप . |
रवीचा धृवोनक्षेपक , व्यगु , वृत्तआणि वारादि यांचे धृवयुक्त क्षेपक
मासगणाज्जनितो रविरूनश्र्चक्रहतध्रुवकेन निजेन ॥
सङ्कलिता इतरेऽथ च ते स्यिः क्षेपयुता निजमासि सितान्ते ॥४॥
अर्थ -
रविचा ध्रुवांक घेऊन त्यास चक्रानें गुणून तो गुणाकार रवीच्या क्षेपांकांकांतून वजा करावा म्हणजे रवीचा ध्रुवोनक्षेपक होतो . तो मासगणोत्पन्न रवींत मिळवावा . म्हणजे अभिष्ट मासाच्या पौर्णिमेच्या अंतीचा रवि होतो .
व्यगु , वृत्त आणि वारादि यांचा ध्रुव युक्त क्षेपक करावयाचा असेल तर त्यांचे ध्रुवांक चक्रानें गुणून गुणाकार राश्यादि येईल तो त्यांचे क्षेपकांत मिळवावा म्हणजे त्याचे अनुक्रमानें ध्रुवयुक्त क्षेपक होतात . ते मासगणोत्पन्न व्यग्र , वृत्त आणि वारादि यांत अनुक्रमें मिळवावे म्हणजे ते अभिष्ट मासाच्या पौर्णिमेच्या अंतींचे होतात .
उदाहरण .
शके १५३४ कार्तिक शुद्ध १५ गुरूवार , घटी ३२ पलें २३ भरणी नक्षत्र घटी २३ पलें १४ वज्रयोग घटी ४४ पलें ४४ , ह्यादिवशीं पंचांगांत चंद्रग्रहण लिहिलें आहे म्हणून पर्वकाल साधनार्थ गणित .
शके १५३४ -(वजा ) शके १४४२ =९२
९२ / (भागीले )११ =८ चक्र
आणि ४ बाकी
४ बाकी X (गुणिले ) १२ =४८ +७ =५५ मध्यम मासगण
चक्र ८ X २ = १६
आता ४७ +८ +१६ +१० =८१
८१ /३३ =२ भागाकार
म्हणजे ५५ +२ =५७ मासगण
आतां , रवीचा ध्रुव . रा . १अं . ४० कला चक्र ८ = ० रा . १३ अंश २०क . ० विकला ; हा गुणाकार रवीच्या क्षेपकांतून (०रा . ४अं . २१ कला ) वजा करून बाकी ११ रा . २१अं . १ कला ० विकला हा रवीचा ध्रुवोनक्षेपक झाला .
व्यग्रु ध्रुवांक -७ राशि १ अंश १२ कला ० विकला चक्र ८ =८ राशि ९ अंश ३६ कला ० विकला ; हा गुणाकार व्यगु क्षेपकांत (११ राशि ७ अंश १८ कला ० विकला ) मिळवून बेरीज ७ राशि १६ अंश ५४ कला ० विकला , हा व्यगूचा धु्रवयुक्त क्षेपक झाला .
वृत्त ध्रुवांक ९ राशि १ अंश ६ कला ० विकला चक्र ८ ( = ६ वा १६ घटी ४८ पलें ) + वारादीचा क्षेपकांक २ वार ४८ घटी ४५ पलें = २ वार ५ घटी ३३ पलें हा वारादीचा ध्रुवयुक्त क्षेपक झाला .
मध्यम रवि साधन .
मासौघतो द्विगुणितान्नगषड्भिराप्तराश्यादिना रहितमासगणो रविः स्यात् ॥ऽऽ॥
अर्थ -
मासगणास २ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यास ६७ नीं भागावें ; जो राश्यादि भागाकार येईल तो मासगण राश्यादि असें मानून त्यांतून वजा करावा . म्हणजे मासगणोत्पन्न रवि होतो . त्यांत रवीचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा जी बेरीज येईल तो मध्यम रवि होतो .
उदाहरण .
मासगण ५७ २ ( = ११४ ) ÷ ६७ =१ राशि २१ अंश २ कला ४१ विकला ; हा भागाकार मासगणांतून (५७ राशि ) वजा करून बाकी ७ राशि ८ अंश ५७ कला १९ विकला ; हा मासगणोत्पन्न रवि +रवीचा ध्रुवोनक्षेपक ११ राशि २१ अंश १ कला ० विकला = ६ राशि २९ अंश ५८ कला १९ विकला हा मध्यम रवि झाला .
व्यगुसाधन .
मासा गृहाणि विनिजत्रिलवाश्र्च तेंऽशा
मासाङ्घ्रितुल्यकलिकाः स्युरयं विपातः ॥५॥
अर्थ -
जो मासगण ते राशि , मासगणास ३ नीं भागून जो अंशादि भागाकार येईल तो मासगणांत वजा करून बाकी राहील ते अंश आणि मासगणास ४ नीं भागून भागाकार येईल त्या कला हीं एकत्र केल्यानें मासगणोत्पन्न राश्यादि व्यगु होतो . त्यांत व्यगूचा ध्रुव युक्त क्षेपक मिळवावा म्हणजे व्यगु होतो .
उदाहरण .
मासगण तुल्य राशि ५७ +(मासगण ५७ -मासगण ५७ ÷ ३ =१९ ) ३८ अंश + (मासगण ५७ ÷ ४ = ) १४ कला १५ विकला = १० राशि ८ अंश १४ कला १५ विकला हा मासगणोत्पन्न व्यगु + व्यगूचा ध्रुवयुक्तक्षेपक ७ राशि १६ अंश ५४ कला ० विकला = ५ राशि २५ अंश ८ कला १५ विकला . हा राश्यादि व्यगु झाला .
वृत्तसाधन .
स्वाद्र्य़ंशकेन रहिता मनुतष्टमामा
वृत्तं गणाभ्रकुलवाढ्यलवं गृहादि ॥ऽऽ॥
अर्थ -
मासगणास १४ नीं भागून जी बाकी राहील तिला ७ नीं भागावें आणि भागाकार राश्यादि येईल तो बाकी राश्यात्मक असें समजून तींतून वजा करावा . आणि त्यांत मासगणास १० नीं भागून भागाकार अंशादि येईल तो मिळवावा म्हणजे मासगणोत्पन्न वृत्त होतें . त्यांत वृत्ताचा ध्रुवयुक्त क्षेपक मिळवून जी बेरीज येईल तें वृत्त होतें .
उदाहरण .
५७ मासगणास १४ ने भागिले असता भागाकार ४ आणि बाकी १ उरते .
म्हणजे ५७ /१४ =४ बाकी १
१ बाकीला ७ ने भागले असता उत्तर =
० रा . ४ अं . १७ क . ८ विकला .
_______________________
२५ अं . ४२ क . ५२ विकला + ५अं . ४२ क . ० विकला .( हा आकडा आला ५७ला भागिले १० करून )
यांची बेरीज येते १ रा . १ अं . २४ क . ५२ विकला हे झाले मसगणोत्पन्न वृत्त .
यात आता ० रा . २३ अं . ३९ क . ० विकला ( धृवयुक्त क्षेपक ) मिळविल्यास उत्तर येते
१ रा . २५ अं . ३ क . ५२ विकला . वृत्त
वारादिसाधन .
स्वार्धान्विता दिनमुखं मनुतष्टमासा
मासौघतो दशगुणाद्भगुणाप्तियुक्तम् ॥६॥
अर्थ -
मासगणास १४ नीं भागून जी बाकी राहील तिला ३ नीं गुणून २ नीं भागावे जो वारादि भागाकार येईल तो , आणि मासगणाच्या दसपटीस ३२७ नीं भागून जो वारादि भागाकार येईल तो ह्यांची बेरीज घ्यावी . म्हणजे मासगणोत्पन्न वारादि होते . व त्यांत वारादीचा ध्रुवयुक्त क्षेपक मिळवल्यानें वारादि होते .
उदाहरण -
५७ मासगण / भागिले १४ =४ भागाकार आणि बाकी १
१ X३ =३ ÷२ = १ वार . ३० घटी . ० पल .
आता यात १ वार . ४४ घटी . ३५ पले . ( हा आकडा आला ५७ X१० /३२७ करून ) मिळवावीत .
उत्तर मिळेल ३ वार . १४ घ . ३५ पले . मासगणोत्पन्न वारादि
यात २ वार . ५ घ . ३३ पले धृवयुक्तक्षेपक मिळविल्यास
= उत्तर येते ५ वा . २० घ . ८ पले . वारादि
पाक्षिकचालन .
रवौ पाक्षिकं चालनं खेन्द्रदेवा विपाते नभोबाणचन्द्रा नखाश्र्च ॥
षडर्का युगाक्षा गृहाद्यं च वृत्ते दिनाद्येनभोक्षाब्धयो बाणबाणाः ॥७॥
पाक्षिकचालन
नाम |
रवि |
व्यगु |
वृत्त |
वारादि |
राशि |
० |
० |
६ |
० |
अंश |
१४ |
१५ |
१२ |
० वार |
कला |
३३ |
२० |
५४ |
४५ घटी |
विकला |
० |
० |
० |
५५ प . |
शरा वेदपक्षा भुजङ्गाग्नयोऽर्के व्यगौ षट् कृताः कुश्र्च षाण्मासिकं स्यात् ॥
शरा वार्धयस्त्रीषवो भादि वृत्ते दिनाद्ये तिथेद्वौ भवा भूर्दिनाद्यम् ॥८॥
षाण्मासिकचालन
नाम |
रवि |
व्यगु |
वृत्त |
वारादि |
राशि |
५ |
६ |
५ |
० |
अंश |
२४ |
४ |
४ |
२ वार |
कला |
३८ |
१ |
५३ |
११ घटी |
विकला |
० |
० |
० |
१ प . |
षाण्मासिक चालन .
आतां , वर जे पाक्षिक म्हणजे १५ दिवसांचे चालन दिलें आहे , त्याचा उपयोग इतकाच आहे की , रवि , व्यगु , वृत्त आणि वारादि हे सर्व अभीष्ट मासाच्या दर्शांतींचे करावयाचे आहेत तर ह्या सर्वांस पाक्षिक चालन मिळवावें आणि हे सर्व अभीष्ट मासाच्या मागील दर्शांतीचे करावयाचे आहेत तर त्या सर्वांतून त्यांचें त्यांचे पाक्षिक चालन वजा करावें म्हणजे झालें . षाण्मासिक म्हणजे सहा महिन्याचे चालनाचा ही उपयोग असाच जाणावा .
तिथ्यंतीं वारादि , रवि आणि वृत्त .
अभिंमततिथिसिद्ध्य़ै प्राक्परे यास्तु तिथ्यः
स्वयुगरसलवोनाश्र्चालनं स्याद् दिनाद्ये ॥
स्वयुगगुणलवोनाः स्याल्लवाद्ये दिनेशे स्वगुणनवलवोनाः विश्र्वनिघ्नाश्र्च वृत्ते ॥९॥
अर्थ -
इष्ट तिथि आणि अभीष्ट मासाची पौर्णिमा ह्यांच्या मध्ये ज्या अंतरित तिथि असतील त्यांस ६४ नीं भागून भागाकार त्यांतूनच वजा करावा . आणि वारादि शेष पौर्णिमेच्या वारादींत धन ऋृण करावें म्हणजे इष्ट तिथ्यंतीं चें वारादि होतें .
अंतरित तिथींस ३४ नीं भागून भागाकार यांतूनच वजा करावा . आणि अंशादि बाकी मध्यम रवींत धन ऋण करावी . म्हणजे इष्ट तिथ्यंतीचा रवि होतो .
अंतरित तिथीस १३ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यास ९३ नीं भागून जो भागाकार अंशादि येईल तो त्याच गुणाकारांतून वजा करून जी अंशादि बाकी राहील ती वृत्तांत धन ऋण करावी . म्हणजे ते इष्ट तिथ्यंतींचे वृत्त होतें .
वृत्तफल आणि रविमंदफल .
अत्यष्ट्यष्टिवृषार्कगोशरदृशः खण्डानि तैर्वृत्तदोर्भागत्रीन्दुलवप्रमेक्यमगतघ्नोच्छिष्टविश्र्वांशयुक् ॥
प्राग्वत्स्यात्स्वमृणं फलं त्विति रवेः केन्दाद्यदन्यच्च तद् व्याप्तं स्वाङ्गलवोनितं कुरु तयोः कार्य्या पुनः संस्कृतिः ॥१०॥
अर्थ -
वृत्ताचे भक्तजांशांस १३ नीं भागून भागाकार परिमित खालीं दिलेले अंकांची बेरीज घ्यावी आणि त्या भागाकारांत १ मिळवून तत्परिमित अंक घेऊन त्याणें अंशादिक बाकीस गुणून गुणाकारास १३ नीं भागावें . जो भागाकार येईल त्यांत मागील अंकांची बेरीज मिळवावी म्हणजे अंशादि वृत्त फल होते . तें , वृत्त मेषादि षड्भांत आहे तर धन आणि तूलादि षड्भांत आहे तर ऋण असें जाणावें . तसेंच रविमंद केंद्राचे भक्तजांशा पासून वृत्त फलाप्रमाणें फल आणून त्यास ५ नीं गुणून १२ नीं भागावें जो अंशादि भागाकार येईल तें रवीचें मंदफल होतें . तें , रवि मंदकेंद्र मेषादि आहे तर धन आणि तुलादि आहे तर ऋृण असें जाणावें . नंतर वृत्तफल आणि रविमंद फल यांचा संस्कार करून त्यास फलद्वय संस्कृति असें म्हणावें .
फलांक
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
१७ |
१६ |
१४ |
१२ |
९ |
५ |
२ |
उदाहरण .
वृत्त १ राशि २५ अंश ३ कला ५२ विकला , याचे भक्तजांश ५५ .. ३क . ५२ विक ÷ १३ =४ भागाकार आणि बाकी ३अं . ३क . ५२वि . अंकाची बेरीज ५९ बाकी ३अं . ३क . ५२ विकला पांचवा फलांक ९ ( = २७ अंश ३४क . ४८ विकला ) ÷ १३ =२ अंश ७क . १७ विकला हें वृत्तफल , वृत्त मेषादि आहे म्हणून धन जाणावें . रवि मंदोच्च २रा . १८अं . क . ० विकला -मध्यमरवि ६ रा . २९ अंश ५८क . १९ विकला = रविमंदकेंद्र ७रा . १८अं . १क . ४१ विकला , याचे भुजांश ४८ ..१क . ४१ विकला ÷ १३ =३ भागाकार आणि बाकी ९ अंश १क . ४१ विकला आतां बाकी ९अं . १क . ४१ विकला चौथा फलांक १२ ( = १०८अं . २०क . १२ विकला ) ÷ १३ = ८अं . २०क . ० विकला ५ ( = २७६अं . ४०क . ० विकला ) ÷ १२ = २३अं . ३क . २० विकला ; हें रवि मंदफल रविमंद केंद्र तूलादि आहे म्हणून ऋण आहे .
वृत्त फलधन ६१अं . ७क . १७ विकला - रविमंद फल ऋण २३अं . ३क . २० विकला = ३८अं . ३क . ५७ विकला ही धन फलद्वय संस्कृति झाली .
हार साधन .
वृत्तैष्यदलाद्रसाप्तियुक्ता रहिताः कर्किमृगादिके च वृत्ते ॥
सगुणांशखवह्नयो हरः स्यादथ सूर्याच्चरमुक्तपूर्ववत्स्यात् ॥११॥
अर्थ -
मागे जो एकाधिक वृत्त फलांक घेतला असेल त्यास ६ नीं भागून भागाकार जर वृत्त कर्कादि म्हणजे ३ राशिंपासून ९ राशींपर्यंत आहे तर ३०अं . २०क . यांत मिळवावा आणि जर तें वृत्त मकरादि म्हणजे ९ राशींपासून ३ राशींपर्यंत आहेतर तो भागाकार यांतून वजा करावा म्हणजे हार होतो . नंतर सायन मध्यम रवीपासून चर साधावें .
उदाहरण .
एकाधिक वृत्त फलांक ९ ÷ ६ = १अं . ३०क ., हा भागाकार वृत्त मकरादि आहे म्हणून ३०अं . २० क . यांतून वजा करून बाकी २८ अंश ५० कला हा हार झाला . मध्यरवि ६ रा . २९अं . ५८क . १९ विकला अयनांश १८ .. १० कला = सायन रवि ७ रा . १८अं . ८क . १९ विकला यापासून आणलेलें चर ८४ विकला , सायनरवि तुलादि आहे म्हणून धन आहे .
स्पष्टतिथि साधन .
नाड्यः स्युः फलसंस्कृतिदर्शहता हारोद्धताऽथो चरं सायंलक्षणकं त्वथो विघटिकाः पश्र्चादृणं प्राग्धनम् ॥
स्वांघ्रयूनान्तरयोजनान्यथ तिथिःस्पष्टा त्रिभिः संस्कृता तत्संस्कारघटीसमाश्र्च कलिका देया व्यगौ चोष्णगौ ॥१२॥
अर्थ -
फलद्वय संस्कृतीस १० नीं गुणून हारानें भागावें आणि जो कलादि भागाकार येईल तो फलद्वय संस्कृति प्रमाणें धन ऋण जाणावा . प्रथमफल होय . वर आणलेल्या चरास ६० नीं भागून तें कलादि करावें ; व तें , चर ऋण असेल तर धन आणि चरधन असेल तर ऋण असें जाणावें . हें द्वितीय फल होय . आपल्या गावापासून दक्षिणोत्तर रेषा किती योजने आहे ते पाहून त्या योजनांस ३ नीं गुणून ४ नीं भागावें . जो भागाकार विकलादि येईल तो आपला गांव दक्षिणोत्तर रेषेचे पश्र्चिमेस आहे तर ऋण आणि पूर्वेस आहे तर धन असें जाणावें . हें तृतीय फल होय .
उदाहरण .
फलद्वय संस्कृति धन ३८ अं . ३क . ५७ विकला १० ( = ३८०अं . ३९क . ३० विकला ) ÷ हार २८अं . ५०क . = १३क . १२ विकला हें प्रथमफल . फलद्वय संस्कृति धन आहे म्हणून धन . चरधन विकला ८४ ÷ ६० = १ कला २४ विकला . हें द्वितीय फल चरधन आहे म्हणून ऋण .
देशांतर योजनें ६४ ३ ÷ ४ = ४८ विकला . हें तृतीय फल , आपला गांव याम्योत्तर रेषेचे पूर्वेस आहे , म्हणून धन . आतां प्रथम फलधन १३क . १२ विकला + तृतीय फलधन ० क . ४८ विकला ( = १४क . ० विकला ) - द्वितीय फल ऋण १ क . २४ विकला = १२क . ३६ विकला , हें एकीकरण धन म्हणून एकीकरण + तिथींचें वारादि ५ वार २० घटी ८ पलें = ५ वार ३२ घटी ४४ पलें म्हणजे गुरूवारीं खरी पौर्णिमा घटी ३२ पलें ४४ आहे . एकीकरण १२ क . ३६ विकला + मध्यमरवि ६रा . २९अं . ५८क . १९ विकला = ७रा . ०अं . १० कला ५५ विकला हा स्पष्ट तिथ्यंतींचा मध्यम रवि झाला . एकीकरण १२ कला ३६ विकला + व्यगु ५ रा . २५अं . ८क . १५ विकला = ५रा . २५ अंश २० कला ५१ विकला हा स्पष्ट तिथ्यंतींचा व्यगु झाला .
रवि आणि व्यगु यांचे स्पष्टीकरण
स्वस्वार्हल्लवमिनजं फलं युगघ्नं
लिप्तास्ताः कुरु च तयोः स्फुटौ च तौ स्तः ॥ऽऽ॥
अर्थ -
मंदफलास ४ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यास २४ नीं भागावें आणि भागाकार त्याच गुणाकारांत मिळवावा म्हणजे कलादि फल होते . ते , मंदफलाप्रमाणें मध्यमरवि आणि व्यगु यांत धन ऋण करावें म्हणजे रवि आणि व्यगु स्पष्ट होतात .
उदाहरण .
रवि मंदफल ऋण २३ अंश ३क . २० विकला ४ ( = ९२ कला १३ विकला ) ÷ २४ = ३क . ५० विकला ; हा भागाकार त्याच गुणाकारांत ( ९२ कला १३ विकला ) मिळवून बेरीज ९६ कला ३ विकला = १अं . ३६ कला ३ विकला ; हें फल , मंदफल ऋण आहे . म्हणून ऋण आहे . आतां , मध्यमरवि ७रा . ०अं . १०क . ५५ विकला - १अं . ३६क . ३ विकला = ६ राशि २८ अं . ३४ क . ५२ विकला हा स्पष्ट रवि झाला . तसेंच , व्यगु ५ राशि २५अं . २०क . ५१ विकला - १अं . ३६ कला ३ विकला = ५रा . २३अं . ४४क . ४४ विकला , हा स्पष्ट व्यगु झाला .
चंद्रबिंबसाधन .
वित्र्यंशद्वियुतहरः कृशानुभक्तश्र्चन्द्रस्य प्रभवति बिम्बमंगुलाद्यम् ॥१३॥
अर्थ -
हारांत १ अंश ४० कला मिळवून त्यास ३ नीं भागावें म्हणजे अंगुलादि चंद्रबिंब होतें . ( हार २८अं . ५०क . + १अं . ४०क . = ) ३० अंश ३० कला ÷ ३ = १० अंगुलें १० प्रति अंगुलें , हें चंद्रबिंब झालें .
( हार २८ अं ५० क . + १ अं . ४० क . = ) ३० अं . ३० क . ÷ ३ = १० अं. १० प्रतिअंगुले, हे चंद्रबिंब झाले.
सूर्यबिंब आणि भूभाबिंब यांचे साधन .
खाब्ध्याप्तार्कागतदलयुतोनाः स्वकेन्द्रे कुलीरनक्राद्ये स्याद्य्वरिलवभवा अंगुलाद्यर्कविम्बम् ॥
हारो वीषुः स्वतिथिलवयुक्स्यात्कुभाऽस्यां धनर्णं खाक्षाप्तार्कागतदलमथो नक्रकर्कादिकेंद्रे ॥१४॥
अर्थ -
रवीचे मंदफल आणते वेळेस जो एकाधिक मंद फलांक आला असेल त्यास ४० नीं भागून जो अंगुलादि भागाकार येईल तो , रविमंद केंद्र कर्कादि आहे तर १० अंगुलें ५० प्रति अंगुलें यांत मिळवावा , आणि जर रवि मंद केंद्र मकरादि आहे तर तो १० अंगुलें ५० प्रति अंगुलें यांतून वजा करावा म्हणजे अंगुलादि सूर्यबिंब होते .
हारांतून ५ अंश वजा करून जी बाकी राहील तींत तिचा १५ वा भाग मिळवावा आणि त्या बेरजेत रविमंद फलांकांचा ५० वा भाग रविमंद केंद्र कर्कादि आहे तर वजा करावा . आणि रविमंद केंद्र मकरादि आहे तर तो भाग मिळवावा म्हणजे अंगुलादि भूभा बिंब होते .
उदाहरण .
एकाधिक मंद फलांक १२ ÷ ४० = ४० अंगुलें १८ प्रति अंगुले , हा भागाकार रविमंद केंद्र कर्कादि आहे म्हणून धन म्हणून ० अं . १८ प्रतिअंगुलें + १०अं . ५० प्र . अं . = ११अं . ८ प्र . अं . हें सूर्यबिंब झालें . असेंच , हार २८अं . ५०क .- ५अं .= २३अं . ५०क ., आणि २३अं . ५०क . + २३अं . ५०क . ÷ १५ = २०अं . ५०क . + १अं . ३५क . = २५ अंगुलें २५ प्रति अंगुलें .
आतां , एकाधिक मंदफलांक १२ ÷ ५० = ० अंगुल १४ प्रतिअंगुलें . हा भागाकार रविमंद केंद्र कर्कादि आहे म्हणून ऋण . म्हणून २५ प्रति अंगुले - ० अंगु . १४ प्रति अंगु . = २५ अंगुलें ११ प्रति अंगुलें हें भूभा बिंब झालें .
ग्रहणसंभूति .
ज्ञत्वैवं तिथिपूर्वकं ग्रहणजं शेषं भवेत्पूर्ववत् षण्मासैरुत पक्षवर्जितयुतैः पक्षेऽथवालोकयेत् ॥
अर्केन्दुग्रहणं व्यगोर्भुजलवैस्तिथ्यल्पकैरुष्णगो र्याम्यैर्वस्वधरैर्द्युरात्रिगतिथौ चाहर्निशामाश्रिते ॥१५॥
अर्थ -
सूर्य आणि चंद्र यांची ग्रहणें झाल्यापासून ५ १ / २ महिन्यांनी किंवा ६ महिन्यांनी किंवा ६ १ / २ मासांनी किंवा १५ दिवसांनी ग्रहण संभूति आहे किंवा नाहीं हे पहावें . व्यग्वर्काचे भक्तजांश १५ अंशांपेक्षा कमी असतील तर सूर्य किंवा चंद्र यांचे ग्रहणाचा संभव असतो ; परंतु व्यग्वर्क दक्षिणगोली असून त्याच्या भक्तजांचे अंश १४ अंशांहून कमी आणि ८ अंशांपेक्षा अधिक असतील तर सूर्य ग्रहणाचा संभव नसतो . जर व्यग्वर्काचे भुजांश ८ अंशांपेक्षा कमी असतील तर मात्र सूर्यग्रहणाचा संभव असतो . ग्रहण संभव असून ही जर अमावास्या दिवसास असेल तर सूर्य ग्रहण दिसेल आणि पौर्णिमा रात्रीस असेल तर चंद्रग्रहण दिसेल . म्हणून इतक्या गोष्टी पाहिल्यावर ग्रहणाचे गणितास आरंभ करावा .
चंद्रग्रास साधन .
सत्र्यंशगुणोनितो हरोऽयं वेदघ्नोऽङ्कत्दृतो व्यगोर्भुजांशैः ॥
हीनो भवताडितोऽद्रित्दृत्स्याच्छन्नं शीतरुचोऽङ्गुलादिकं वा ॥१६॥
अर्थ -
हारांतून ३ अंश २० कला वजा करून जी बाकी राहील तिला चोहोंनी गुणून ९ नीं भागावें आणि जो भागाकार येईल त्यांतून व्यगूचे भुजांश वजा करून जी बाकी राहील तिला ११ नीं गुणून ७ नीं भागावें म्हणजे चंद्राचा अंगुलादि ग्रास येतो . जेव्हां भागाकारांतून व्यगूचे भक्तजांश वजा जात नाहींत तेव्हां चंद्रग्रहण होणार नाही असे समजावें .
उदाहरण
हार २८ अं . ५० कला . - ( वजा ) ३ अं . २० क . = २५ अं ३० कला .
२५ अं ३० कला . X ४ + १०२ अं . ० कला .
१०२ अं . ओ कला . ÷ ९ + ११ अं . २० कला . - (वजा ) ६ अं . १५ कला १२ विकला = भुज = ५ अं . ४ कला ४८ विकला X ११ = ५५ अं . ५२ कल . ४८ विकला
५५ अं . ५२ कल . ४८ विकला ÷ ७ = ७ अं . ५८ प्रति अंगुले चंद्रग्रास
( ६ अं. १५ कला १२ विकला कसे आले तर ६ रा. ० अं. ० क. ० वि. यातून ५ रा. २३ अं. ४४ क. ४८ विकला. वजा केल्या. )
सूर्यग्राससाधन
अमान्तनतनाडिकांघ्रिरहिताद्युतात्प्राक्परे गुहादिकरवेर्नतांशकरसांशसंस्कारिताः ॥
व्यगोर्भुजलवाः स्फुटाः स्युरथ सप्तशुद्धाश्र्च ते निजार्द्धसहिता रवेः स्थगितमंगुलाद्यं स्फुटम् ॥१७॥
अर्थ -
दर्शांतीं ज्या नत घटिका असतील त्यांस ४ नीं भागून जो राश्यादि भागाकार येईल तो , जर नत पूर्व आहे तर स्पष्ट सूर्यांतून वजा करावा आणि पश्र्चिम आहे तर स्पष्ट सूर्यांत मिळवावा . नंतर त्यापासून क्रांति आणून तिचा आणि अक्षांशाचा संस्कार करून नतांश आणावे आणि त्या नतांशांस ६ नीं भागून जो भागाकार येईल तो नतांशांचे दिशेचाच जाणावा . मग स्पष्ट व्यगूचा भक्तज करून त्याचे अंश करावे आणि ते व्यगु ज्या गोलीं असेल त्या गोलाच्या दिशेचे जाणावे . नंतर भागाकाराचा आणि व्यगु भक्तजांशाचा संस्कार करावा . म्हणजे स्पष्ट नतांश होतात . ते ७ अंशांतून वजा करून जी बाकी राहील तिला ३ नीं गुणून २ नीं भागावें म्हणजे सूर्याचा अंगुलादि ग्रास होतो . जेव्हा स्पष्ट नतांश ७ अंशांपेक्षां अधिक येतात तेव्हां सूर्यग्रहण नाहीं असे समजावें . याचें उदाहरण पुढें सूर्य ग्रहणाचें पर्व आणते वेळेस दिलें आहे .
स्पष्टचंद्र व चंद्रस्पष्टगति .
तिथिरविहतिरंशास्तद्युतोऽर्को विधुः स्यादथ जिनगुणहारो द्य्वङ्गयुक् तद्रतिः स्यात् ॥
खचरशरकलाः स्यात्सूर्यभुक्तिस्ततः स्युर्भयुतिजगतगम्या नाडिकास्तिथ्यपायात् ॥१८॥
अर्थ -
तिथीस १२ नीं गुणून जो गुणाकार येईल ते अंश स्पष्ट सूर्यांत मिळवावे म्हणजे स्पष्टचंद्र होतो . तसेंच , हारास २४ नीं गुणून गुणाकार कलादि येईल त्यांत ६२ कला मिळवाव्या . म्हणजे चंद्रस्पष्ट गति होते . नंतर स्पष्ट सूर्य , स्पष्ट चंद्र , स्पष्ट चंद्रगति आणि स्पष्ट सूर्य गति ( ५९ कला ) यांपासून नक्षत्र आणि योग यांच्या गतगम्य घटिका आणाव्या , त्या स्पष्ट तिथ्यंतीं होतात .
उदाहरण .
( तिथि १५ १२ = १८० अंश = ) ६रा . + स्पष्टरवि ६ रा . २८ अंश ३४क . ५२ विकला = ० रा . २८अं . ३४क . ५२ विकला . हा स्पष्ट चंद्र झाला . ( हार २८अं . ५०क . २४ = ) ६९२ क . ० विकला + ६२ कला = ७५४ कला ० विकला ही चंद्राची स्पष्टगति झाली . यापासून आणलेल्या कृत्तिका नक्षत्राचा गत घटिका ४६ पलें २८ आणि गम्य घटिका १२ पलें ३३ .
सूर्यग्रहणाचें उदाहरण .
शके १५३४ वैशाख वद्य ३० , बुधवार २६ घटी २८ पलें , रोहिणी नक्षत्र ३४ घटी ५७ पलें , धृतियोग ४९ घटी १९ पलें या दिवशीं पंचांगांत सूर्यग्रहण लिहिलें आहे ; म्हणून मासगणापासून पर्वकाल साधन .
शके १५३४ - १४४२ =९२
९२ ÷ ११ = ८ चक्र .
बाकी ४ X १२ = ४८ मास
४८ +१ गतमास =४९ मध्यम मासगण .
४९ + १६ ( चक्र ८ X२ ) + १० = ७५
७५ ÷ ३३ = २ अधिक मास
२ + ४९ मध्यम मासगण = ५१ मासगण यापासून आणलेले पौर्णिमा तींचे सूर्यादि .
-----------------------------------------
रवि १ रा . ५ अं . २० क . ४३ वि . + पाक्षि . ० रा . १४ अं . ३३ क . ० वि .=१ रा . १९ अं . ५३ क . ४३ वि .
१ रा . १९ अं . ५३ क . ४३ वि .
८रा . २० अं . १० क . ४३ वि . वृत्त
६रा . १२ अं . ५४ क .
__________________
३रा . ३ अं . ४ क . ४३ वि .
-------------------------------------------
त्याचप्रमाणे
व्यगु ११ रा . २१ अं . ६ क . ४५ विक . + पाक्षिक चालन १५ अं . २० क . = ० रा . ६ अं . २६ क . ४५ वि .
० रा . ६ अं . २६ क . ४५ वि .
आता
३ वा . ९ घ . ७ पलें वारादि + ० क . ४५ घ . ५५ पलें = ३ वा . ५५ घ . २ पलें .
चालन दिल्याने सूर्यादिक दर्शांतींचे झाले . आता स्पष्टीकरण
वृत्त फल घन ७४ अं . २२ क . २१ विक . + मंद फल घन १४ अं . ४१ क . ४० वि . = फलद्वय संस्कृति घन ८९ अं . ४ क . १ विकला .
रविमंदोच्च २ रा . १८ अं . ० क . ० विक . - ( वजा ) मध्यम रवि १ रा . १९ अं . ५३ क . ४३ विक . = रविकेंद्र ० रा . २८ अं . ६ क . ५३ विक .
एकाधिक वृत्त फलांक २ हार ३० अं . ४० क , चरऋण १०८ विकला .
फलद्वय संस्कृतिजन्य प्रथम फल घन २९ क . २ विकला .
फलद्वय संस्कृतिजन्य द्वितीय फल घन १ क . ४८ विकला .
फलद्वय संस्कृतिजन्य तृतीय फल घन ४८ विकला .
फलत्रयैक्य घनं ३१ क . ३८ विकला .
वारादि ३ वार ५५ घ . २ पलें
स्पष्टवारादि ४ वार २६ प . ४० पलें .
म्हणजे बुधवारी अमावस्या २६ घ . ४० पलें आहे , आणि
मध्यम रवि १ रा . १९ अं . ५३ क . ४३ वि . + फलत्रयैक्य ३१ क . ३८ वि .= स्पष्ट दर्शानीं म .र . १ रा . २० अं . २५ क . २१ वि .
रवि मंद फल घन १४ अं . ४१ क . ४० वि . X ४ = ५८ अं . ४६ क . ४० वि .
५८ अं . ४६ क . ४० वि . ÷ २४ = २अं . २६ क . ५७ वि .
घन ६१ कला १३ विकला + मध्यम रवि १ रा . २० अं . २५ क . २१ वि . = स्पष्ट रवि १ रा . २१ अं . २६ क . ३४ वि .
तिथि ३० X १२ =३६० अं . = ० राशि .
स्पष्ट चंद्र १ रा . २१ अं . २६ क . ३४ वि .
-------------------------------------------------
व्यगु ० रा . ६ अं . २६ क . ४५ वि . + फल त्रयैक्य घन ३१ क . ३८ वि . = स्पष्ट दर्शांनी व्यगु ० रा . ६ अं . ५८ क . २३ वि .
यास २५ ने गुणून ६ नी भागले तरे चालेल .
फल घन ६१ कला १३ विकला + व्यगु ० रा . ६ अं . ५८ क . २३ वि .= स्पष्ट व्यगु ० रा . ७ अं . ५९ क . ३६ वि .
हार ३० अं . ४० क . सूर्यगति ५९ क .
२४
७३६ कला
६२
७९८ कलाचंद्र स्पष्ट ग्रह
स्पष्ट रवि चंद्र व त्यांच्या गति यांपासून दर्शांनींचे नक्षत्र व योग
रोहिणी नक्षत्र गत घटिका ५१ पलें ५७ धृति योग गत घटि ४० पलें ७
रोहिणी नक्षत्र गम्य घटिका ०८ पलें ३१ धृति योग गम्य घटि १५ पलें ५२
चंद्रबिंब १० अंगुले ४६ प्र .अंगुले ; सूर्यबिंब १० अंगु . २१ प्र . अंगुले
आता सूर्य ग्रासायन
दर्शांत २६ घटि ४० पलें - ( वजा )दिनार्घ १६ घटि ४८ पलें (१५ घटि +चर १०० पलें )
= ९ घटि ५२ पलें ÷ ४ = २ रा. १४ अं. ० क. ० वि. + स्पष्ट रवि १ रा. २१ अं. २६ क. ३४ वि. = ४ रा. ५ अं. २६ क. ३४ वि.
क्रांति उत्तर १३ अं . ५२ क . २१ वि .
अक्षांशदक्षिण २५ अं . २६ क . ४२ वि .
६ ) नतांशदक्षिण ११ अं . ३४ क . २१ वि .
भागाकार दक्षिण १ अं . ५९ क . ४३ विकला .
स्पष्ट व्यगु भुज उत्तर ७ अं . ५९ क . ३६ वि . व्यगु उत्तरगोली आहे म्हणून
भागाकार दक्षिण १ अं . ५५ क . ४३ विकला यातून वजा केल्या असता उत्तर आहे
६ अं . ३ क . ५३ विकला . हे ७ अंशातून वजा केले असता बाकी
० अं . ५६ क . ७ विकला .X३ =२अं . ४८ख . २१ विकला
२अं . ४८ख . २१ विकला ÷२ =१ अंगुल २४ प्रतिअंगुले सूर्यग्रास .
---------------------------------------------------------------------------------
ग्रहणाचा स्वामी .
व्यगुमध्यपर्य्ययगणो द्विगुणो वणिगादिगे व्यगुगृहे कुयुतः ॥
स्मृत चक्रसंज्ञकयुतो विधितो गतपर्वपो मुनत्दृतोर्वरितः ॥१९॥
अर्थ -
मध्यम व्यगु आणते वेळेस जे भगण आले असतील त्यांस २ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यांत जर व्यगु तुलादि आहे तर एक मिळवून त्या बेरजेंत आणि जर व्यगु मेषादि आहे तर एक मिळवून त्या बेरजेंत आणि जर व्यगु मेषादि आहे तर त्याच गुणाकारांत चक्र संख्या मिळवावी आणि बेरजेस ७ नीं भागून बाकी मात्र घ्यावी . मग जर बाकी ० राहील तर ब्रह्मा , १ राहील तर चंद्र , २ राहतील तर इंद्र , ३ राहतील तर कुबेर , ४ राहतील वर वरुण , ५ राहतील तर अग्नि , आणि ६ राहतील तर यम , ग्रहणाचा स्वामी जाणावा . ज्योतिषी लोक या ग्रहण स्वामीवरून लोकांस शुभाशुभ फलें सांगतात .
उदाहरण
मासगणोत्पन्नव्यगु ५२ रा . ४ अं . १२ क . ४५ विकला + चक्रगुणितधृव ५६ रा . ९ अं . ३६ क . ० वि . + क्षेपक ११ रा . ७ अं . १८ क . ० वि . =
११९ रा . २१ अं . २ क . ४५ वि . ÷ १२ = भगण १० X२ =२०
व्यगुमेषी आहे म्हणून २० + चक्र ८ =२८
२८ ÷७ =बाकी ० म्हणून ग्रहण स्वामी ब्रह्म .
मासगणाधिकार समाप्त