ज्योतिः प्रबोधजननी परिशोध्य चित्तं तत्सूक्तकर्म्मचरणैर्गहनार्थपूर्णा ॥
स्वल्पाक्षरपि च तदंशकृतैरुपार्घ्यक्तीकृता जयति केशववाक्छ्रुतिश्र्च ॥ १ ॥
अर्थ - स्नान , दान , जप , होमादि सत्कर्माचरणानें चित्ताची शुध्दि करून मुमुक्षुंस जे ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान उत्पन्न करतात व थोडे वर्ण असून गंभीरअर्थानें परिपूर्ण व रावणादिकांनी भाष्यें करून ज्यांची दुर्ज्ञेयता घालवून सुबोध केले असे भागवंताच्या मुखापासून निर्माण झालेले वेद सर्वोत्कर्षे करून वर्ततात म्हणजे आहेत . अथवा वेदां प्रमाणें मान्य असे केशव नामक पित्यानें केलेले ग्रहकौतुकादिक ग्रंथ आहेत ; त्यांत ग्रह साधनादिक कर्में संक्षिप्त रीतीनें सांगितलीं आहेत . त्यांवरून ग्रह नक्षत्रादिकांचे ज्ञान थोडक्यांत चांगले होते . वते लहान असून विपुल अर्थानें भरले आहेत , शिष्यांनी त्यांवर टीका करून त्यांचें काठिन्य दूर केले आहे . ॥१॥
परिभग्नसमौर्विकेशचापं दृढगुणहारलसत्सुवृत्तबाहुम् ॥
सुफलप्रदमात्तनृप्रभं तत्स्मर रामं करणं च विष्णुरूपम् ॥२॥
अर्थ - हे शिष्य , ग्रंथारंभी शंकर धनुष्य मोडणारा , मौक्तिकांच्या हाराने शोभायमान , व भक्तांस मोक्षादिफल देणारा , मनुष्य देह धारण करणारा , व सक्तलक्षण वाहु , असा जो रामरूप विष्णु त्याचें स्मरण कर -अथवा हे गणक , ज्यांत ज्या आणि चाप यांचा त्याग केला आहे , व ज्यांतील गुणक आणि भाजक अति संक्षेप रुपाचे आहेत , ज्यामध्ये चंद्राचें मंदकेंद्र आणि भुज हे चांगल्या रीतीने साधले आहेत , ज्याच्या योगानें ग्रहणादिकांचे स्पष्ट ज्ञान होते , ज्यांत शंकु छायेचेही साधन केले आहे , व जें नाना प्रकारच्या छंदवृत्तांनी मनोरम आहे अशा या करण रूप ग्रंथाचें स्मरण कर . ॥२॥
यद्यप्यकार्पुरुरवः करणानि धीरास्तेषु ज्यकाधनुरपास्य न सिद्धिरस्मात् ॥
ज्याचापकर्म्मरहितं सुलघुप्रकारं कर्तुं ग्रहप्रकरणं स्फुट मुद्यतोऽस्मि ॥३॥
अर्थ - पूर्वी गर्गादि गर्गादि ऋषि , भास्कराचार्य , इत्यादिकांनी जरी करण ग्रंथ केले तरी त्या ग्रंथीं ज्या व चाप त्द्यां वांचून चालत नाही , वास्तव मी गणेश दैवज्ञ ज्या चापक्रिया नसून संक्षिप्त असे स्पष्ट ग्रहकरण करण्याविषयीं उद्युक्त आहे . ॥३॥
द्वय धीन्द्रोनितशक ईशत्दृत्फलं स्याच्चक्राख्यं रविहतशेषकं तु युक्तम् ॥
चैत्राद्यैः पृथगमुतः सदृग्घ्नचक्राद्दिग्युक्तादमरफलाधिमासयुक्तम् ॥४॥
खत्रिघ्नं गततिथियुङ्निरग्रचक्राङ्गांशाढ्यं पृथगमुतोऽब्धिषट्कलब्धैः ॥
ऊनाहैर्वियुतमहर्गणो भवेद्वै वारःस्याच्छरहतचक्रयुग्गणोऽब्जात् ॥५॥
अर्थ - शालिवाहन शकांतून १४४२ वजा करावे , जी बाकी राहील तिला ११ नीं भागून जो भागाकार येईल त्यास चक्र म्हणावें . आणि बाकी राहील तिला १२ नीं गुणून तीन चैत्रादिमास ( चैत्रमासापासून इष्टकाला पर्यंत मास गेले असतीलने ) मिळवावे म्हणजे मध्यम मासगण (सक्तमारानें महिन्यांची संख्या ) येते . त्या मासगणांत चक्राची दुप्पट आणि १० हे मिळवून त्या बेरजेला ३३ नीं भागावें म्हणजे अधिकमास येतात , ते मध्यम मासगणांत मिळविल्यानें मासगण येतो . त्या मासगणास ३० नीं गुणून त्यात गततिथि ( शुद्ध प्रतिपदेच्या आरंभापासून इष्ट दिवसापर्यंत ज्या तिथि गेल्या असतील त्या ) मिळवाव्या , आणि त्यांत चक्रास ६ नीं भागून जो भागाकार येईल तो मात्र मिळवावा म्हणजे मध्यम अहर्गण होतो . त्यास ६४ नीं भागून जो भागाकार येईल ते क्षयदिवस मध्यम अहर्गणांतून वजा करावे म्हणजे अहर्गण (दिवसांची संख्या ) येतो .
चक्रास ५ नीं गुणून त्यांत अहर्गण मिळवावा , आणि त्या बेरजेस ७ नीं भागून बाकी मात्र घ्यावी ; ती बाकी ० राहील तर सोमवार , १ राहील तर मंगळवार , इत्यादि जाणावें ; या रीतीनें जो वार येईल तो आणि इष्ट वार हे बरोबर मिळतील . कदाचित् न मिळतील तर अहर्गणांत एक अधिक किंवा उणा करून इष्टवार आणि अहर्गणोत्पन्न वार हे बरोबर मिळतील असें करावें म्हणजे स्पष्ट अहर्गण होतो .॥४॥५॥
उदाहरण .
शके १५३४ वैशाख शुद्ध १५ सोमवार , घटी ५४ पलें १० विशाखा नक्षत्र घटी ३९ पळें ५५ , वरीयान योग घटी ० पलें ९ , त्यादिवशीं चंद्रग्रहणाचें पर्व किती आहे हें पाहण्याकरितां अहर्गण साधतो .
शके १५३४ वैशाख शुद्ध
शके १५३४ मधून १४४२ वजा करा . बाकी आली ९२ .
बाकी ९२ ला ११ ने भाग दिल्यास भागाकार ८ येईल यास चक्र म्हणावे .
बाकी ४ राहील यास १२ ने गुणल्यास उत्तर ४८ मिळेल . यात चैत्रादि मास १ मिळवावा .
म्हणजे मध्यम मास गण ४९ मिळेल .
या मासगणात चक्राची दुप्पट ८ x २ = १६ आणि १० असे २६ मिळवावत म्हणले उत्तर ७५ मिळेल .
या ७५ ला ३३ ने भाग दिल्यास उत्तर २ येईल ते अधिक मास मिळतात . हे २ अधिक मास ४९ मध्यम मास गणात मिळविल्यास ५१ मास गण मिळतात .
या ५१ मासगणास ३० ने गुणल्यास गुणाकार १५३० येईल यातून गततिथी १४ आणि चक्र ८ ला ६ ने भागल्यास भागाकार १ येतो तो असे एकूण १५ मिळविल्यास १५४५ हे मध्यम अहर्गण मिळेल . यास ६४ ने भागल्यास जो भागाकार २४ येईल ते क्षय दिवस असतील आणि ते २४ क्षयदिवस १५४५ या मध्यम अहर्गण मधून वजा केल्यास जे १५२१ उत्तर येईल तो अहर्गण ( दिवसांची संख्या ) येईल .
आता चक्रास ५ ने गुणून म्हणजे ८ x ५ = ४० हे १५२१ अहर्गणात मिळवावे म्हणजे १५२१ + ४० = १५६१ मिळेल . यास ७ ने भागून बाकी मात्र घ्यावी .
यात बाकी ० राहते .
बाकी शून्य म्हणून सोमवार अतएव १५२१ अहर्गण बराबर आहे .
बाकी ० - सोमवार
बाकी १ - मंगळवार
बाकी २ - बुधवार
बाकी ३ - गुरूवार
बाकी ४ - शुक्रवार
बाकी ५ - शनिवार
बाकी ६ - रविवार
टीप - ज्या वर्षी अद्गिक मास पडतो त्या वर्षी अधिक मासाच्या पूर्वी किंवा नंतर अहर्गण करणे झाल्यास जो महिना अधिक पडतो त्या महिन्यापूर्वी अहर्गण करणे असेल तर मागील वर्षातल्या पेक्षा अधिक मास जास्त आला तर तो घेऊ नये , मागील वर्षातल्या प्रमाणे अधिक मास घेऊन अहर्गण साधावा , आणि जो मास अधिक पडतो त्या महिन्यानंतर अहर्गण करणे तर मागील वर्षाप्रमाणेच अधिक मास घ्यावा . नंतर अहर्गण साधावा .
१५५५ - १४४२ = ११३
११३ / ११ = भागाकार १० चक्र , बाकी ३ .
३ x १२ = ३६ मध्यम मासगण
३६ + १ अधिकमास = ३७ मासगण
३७ x ३० = १११०
१११० + ० गततिथी + १ ( १० चक्र / ६ = बाकी १ ) = ११११ मध्यम अहर्गण
आता
३६ ( मध्यम मास गण ) + २० ( चक्र १० x २ ) + १० = ६६ .
६६ / ३३ = २ अधिकमास हे मागील वर्षातील अधिक मासा पेक्षा अधिक आहेत मागील वर्षातला अधिक महिना घेऊन
११११ / ६४ = भागाकार १७ क्षयदिवस
११११ - १७ ( क्षयदिवस ) = १०९४ अहर्गण यापासून वार आणल्यास गुरूवार येतो म्हणून
१०९४ + १ = १०९५ अहर्गण .
उदाहरण २ रे
शके १५३० या वर्षी भाद्रपद अधिक मास आहे , म्हणून कार्तिक शुद्ध १ शनिवार , त्या दिवशी अहर्गणा साधतो .
शक १५३० - १४४२ = ८८
८८ / ११ = ८ चक्र . आणि बाकी ० ( शून्य )
बाकी ० x १२ = ०
० + ७ = ७ मध्यम मास गण
७ + २ = ९ मासगण .
९ x ३० = २७०
२७० + ० ( गतविधी ) + १ ( चक्रांक ८ / ६ = १ बाकी ) = २७१ मध्यम अहर्गण .
२७१ / ६४ = ४ भागाकार .
२७१ - ४ ( भाकाकार )= २६७ अहर्गण . यापासून वार आणल्यास रविवार येतो म्हणूम २६६ हा खरा अहर्गण आहे .
आता ७ मध्यम मास गण + १६ ( चक्र ८ x २ = १६ ) + १० = ३३
३३ / ३३ = १ अधिक मास आता हा अधिक मास मागील वर्षातल्या प्रमाणेच आहे , म्हणजे चक्र बदलले नाही असे मानून
बाकी ११ x १२ = १३२
१३२ + ७ ( गतमास ) = १३९
१३९ + १४ ( चक्र ७ x २ = १४ ) + १० = १६३
१६३ / ३३ = भागाकार ४ अधिक मास , हे मागील वर्षातील बराबर आहेत म्हणून वरील अधिक मासांत १ मिळवला .
ग्रहांचे राश्यादि ध्रुवांक .
खविधुतानभवास्तरणेर्ध्रुवः खमनला रसवार्द्धय ईश्र्वराः ॥
सितरुचो भमुखोऽथ खगा यमौ शरकृता गदितोविधुतुङ्गजः ॥६॥
शैलाद्वौ खशरा अगोः क्षितिभुवो भूतत्वदन्ता विदः केन्द्रस्याब्धिगुणोडवः सुरगुरोः खं षड्यमावस्विलाः ॥
द्राक्केन्द्रस्य भृगोः कुशक्रयमला राश्यादिकोऽथो शनेः शैलाः पञ्चभुवो यमाब्धय इमेऽथ क्षेपकः कथ्यते ॥७॥
राश्यादि धृवांक कोष्टक
नाम |
रवि |
चंद्र |
मन्दोच्च |
राहू |
मंगळ |
बुधके |
गुरू |
शुक्रके |
शनि |
राशि |
० |
० |
९ |
७ |
१ |
४ |
० |
१ |
७ |
अंश |
१ |
३ |
२ |
२ |
२५ |
३ |
२६ |
१४ |
१५ |
कला |
४९ |
४६ |
४५ |
५० |
३० |
२७ |
१८ |
२ |
४२ |
विकला |
११ |
११ |
० |
० |
० |
० |
० |
० |
० |
ग्रहांचे राश्यादि क्षेपकांक
रुद्रा गोऽब्जाः कुवेदास्तपन इह विधौशूलिनोगोभुवः षट् तुङ्गेऽक्षात्यष्टिदेवास्तमसि खमुडवोऽष्टाग्नयोऽथो महीजे ॥
दिक्छैलाष्टौ ज्ञकेन्द्रे विभकलनवभं पूजितेऽद्र्य़श्र्विभूपाःशौक्रे केन्द्रे गृहाद्योऽद्रिनखनव शनौ गोतिथिसवर्ग तुल्यः ॥८॥
राश्यादि क्षेपकांक कोष्टक
नाम |
रवि |
चंद्र |
चन्द्रोच्च |
राहू |
मंगळ |
बुधके |
गुरू |
शुक्रके |
शनि |
राशि |
११ |
११ |
५ |
० |
१० |
८ |
७ |
७ |
९ |
अंश |
१९ |
१९ |
१७ |
२७ |
७ |
२९ |
२ |
२० |
१५ |
कला |
४१ |
६ |
३३ |
३८ |
८ |
३३ |
१६ |
९ |
२१ |
विकला |
० |
० |
० |
० |
० |
० |
० |
० |
० |
मध्यम ग्रह
दिनगणभवखेटश्र्चक्रनिघ्नध्रुवोनो दिवसकृदुदये स्वक्षेपयुङ् मध्यमः स्यात् ॥
निजनिजपुररेखान्तः स्थिताद्योजनौघाद्रसलवमितालिप्ताः स्वर्णमिन्दौ परे प्राक् ॥९॥
अर्थ -
पुढें सांगितलेल्या रीतीप्रमाणें अहर्गणापासून आणलेल्या ग्रहांतून चक्रानें गुणून जो गुणाकार येईल , तो वजा करावा ; आणि त्या बाकीत त्या ग्रहाचा क्षेपक मिळवावा म्हणजे सूर्योदयकालीं मध्यम ग्रह होतो .
वरील रीतीवरून हें ध्यानांत येईल की , अहर्गणोत्पन्न ग्रहांत क्षेपक मिळवून त्यांतून चक्रानें गुणलेला ध्रुवक वजा करून बाकी आणून ठेवतात . आणि तो अहर्गणोत्पन्न ग्रहांस मिळवितात . या बाकीस ध्रुवोनक्षेपक म्हणतात .
उदाहरण
रवीचे ध्रुवांक . रा . १ अं . ४९ क . ११ वि . चक्र ८ = ० रा . १४ अं . ३३ कला . २८ वि ., हे क्षेपकां ( ११ रा . १९ अं . ४१ क . वि .) कांतून वजा करून बाकी ११ रा . ५ अं . ७ क . ३२ वि . हा रवीचा ध्रुवोनक्षेपक झाला . या प्रमाणे सर्व ग्रहांचे ध्रुवोनक्षेपक करून ते खाली लिहिले आहेत .
नाम |
रवि |
चंद्र |
चन्द्रोच्च |
राहू |
मंगळ |
बुधके |
गुरू |
शुक्रके |
शनि |
राशि |
११ |
१० |
४ |
४ |
७ |
० |
० |
७ |
९ |
अंश |
५ |
१८ |
२५ |
४ |
१२ |
१ |
१ |
२७ |
९ |
कला |
७ |
५६ |
३३ |
५८ |
५२ |
५७ |
५२ |
५३ |
४५ |
विकला |
३२ |
३२ |
० |
० |
० |
० |
० |
० |
० |
उत्तरार्धाचा अर्थ चंद्रास त्रिफल संस्कार देते वेळी लिहिला आहे .
मध्यम रवि .
स्वखनगलवहीनो द्युव्रजोऽर्कज्ञशुक्राः
खतिथित्दृतगणोनो लिप्तिकास्वंशकाद्याः ॥ऽऽ॥
अर्थ -
अहर्गणास ७० नीं भागून भागाकार अंशादि येईल तो , अहर्गण अंशात्मक असें समजून त्यांतून वजा करावा ; आणि त्या बाकींतून अहर्गणास १५० नीं भागून भागाकार कलादि येईल तो वजा करावा म्हणजे अहर्गणोत्पन्न रवि होतो ; त्यांत रवीचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा , जी बेरीज येईल तो मध्यम रवी होतो . मध्यम बुध आणि मध्यम शुक्र हे मध्यम रवी बरोबर असतात .
उदाहरण .
अहर्गण १५२१ ÷ ७० = २१ अंश ४३ क . ४२ वि ; हा भागाकार अहर्गणांतून ( १५२१ अंश ) वजा करून बाकी १४९९ अं . १६ क . १८ वि . ही बाकी ( अहर्गण १५२१ ÷ १५० = ) १० क . ८ वि . = १४९९ अं . ६ क . विक . यांतील अंशास ३० नीं भागून भागाकार राशि , त्यांस १२ नीं भागून बाकी राशि १ आहे , म्हणून १ रा . २९ अं . ६ क . १० वि ; हा अहर्गणोत्पन्न रवि +रवीचा ध्रुवोनक्षेपक ११ रा . ५ अं . ७ क . ३२ वि . = १ रा . ४ अं . १३ क . ४२ वि . हा म .र . झाला .
मध्यमचंद्र .
गणमनुहतिरिन्दुः स्वाद्रिभूभागहीनः
खमनुत्दृतगणोनो लिप्तिकास्वंशपूर्वः ॥१०॥
अर्थ -
अहर्गणास १४ नीं गुणून जो गुणाकार येईल तो अंशादि , त्यास १७ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो त्याच गुणाकारांतून वजा करावा ; आणि जी बाकी राहील तींतून अहर्गणांस १४ नीं भागून भागाकार कलादि तो वजा करावा ; म्हणजे अहर्गणोत्पन्न चंद्र होतो . मग त्यांत चंद्राचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा म्हणजे मध्यम चंद्र होतो .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ १४ = ) २१२९४ अंशादि ÷ १७ = १२ ५२ अं . ३५ क . १७ वि . हा भागाकार त्याच गुणाकारांतून वजा करून बाकी २००४१ अं . २४ क . ४३ वि ; ही बाकी -( अहर्गण १५२१ ÷ १४० = ) १०क . ५१वि . = २००४१ अं . १३ क . ५२वि . = ८ राशि १ अंश १३ क . ५२ वि . हा अहर्गणोत्पन्न चंद्र + चंद्राचा ध्रुवोनक्षेपक १० राशि १८ अं . ५६ क . ३२ वि . = ६ राशि २० अं . १० क . २४ वि . हा मध्यम चंद्र झाला .
चंद्रोच्च .
नवत्दृतदिनसंघश्र्चन्द्रतुङ्गंलवाद्यं भवति खनगभक्तद्युव्रजोपेतालिप्तम् ॥ऽऽ॥
अर्थ -
अहर्गणास ९ नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांत अहर्गणास ७० नीं भागून भागाकार कलादि तो मिळवावा म्हणजे अहर्गणोत्पन्न चंद्रोच्च होते . त्यांत चंद्रोच्चाचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा म्हणजे चंद्राच्च होते .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ÷ ९ = ) १६९ अं . क . वि +( अहर्गण १५२१ ÷ ७० = ) २१ कला ४३ विकला = १६९ अंश २१ कला ४३ विकला = ५ राशि १९ अंश २१ कला ४३ विकला , हें अहर्गणोत्पन्न चंद्रोच्च + उच्चाचा ध्रुवोनक्षेपक ४ राशि २५ अंश ३३ कला ० विकला = १० राशि १४ अंश ५४ कला ४३ विकला , हें चंद्रोच्च झालें .
राहु .
नवकुभिरिषुवेदैर्घस्रसघाद्दिधाप्तात् फललवकलिकैक्यं स्यादगुश्र्चक्रशुद्धः ॥ ११ ॥
अर्थ -
अहर्गणास १९ नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांत , अहर्गणास पुनः ४५ नीं भागून भागाकार कलादि येईल , तो मिळवावा ; आणि जी बेरीज येईल ती , १२ राशींतून वजा करावी , म्हणजे अहर्गणोत्पन्न राहु होईल , त्यांत राहूचा धु्रवोनक्षेपक मिळवून जी बेरीज येईल तो राहू होतो .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ÷ १९ = ) ८० अंश ३ कला ९ विकला +( अहर्गण १५२१ ÷ ४५ = ) ३३ कला ४८ विकला = ८० अंश ३६ कला ५७ विकला = २ राशि २० अंश ३६ कला ५७ विकला , हे बारा राशीतून वजा करून बाकी ९ राशि ९ अंश २३ कला ३ विकला ; हा अहर्गणोत्पन्न राहू + राहूचा ध्रुवोनक्षेपक ४ राशि ४ अंश ५८ कला ० विकला = १ राशि १४ अंश २१ कला ३ विकला , हा राहु झाला .
मध्यममंगळ .
दिग्घ्नो द्विधा दिनगणोऽङ्ककुभिस्त्रिशैलैर्भक्तः फलांशककलाविवरं कुजः स्यात् ॥ऽऽ॥
अर्थ -
अहर्गणास १० नीं गुणून गुणाकार येईल त्यास १९ नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांतून , त्याच गुणाकारास ७३ नीं भागून भागाकार कलादि येईल तो वजा करावा , म्हणजे अहर्गणोत्पन्न मंगळ होतो , त्यांत मंगळाचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा जी बेरीज येईल तो मध्यम मंगळ होतो .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ १० = ) १५२१० ÷ १९ ( = ८०० अंश ३१ कला ३४ विकला ) - गुणाकार १५२१० ÷ ७३ ( = २०८ कला २१ विकला ) = ३ अंश २८ कला २१ विकला = ७९७ अंश ३ कला १३ विकला = २ राशि १७ अंश ३ कला १३ विकला . हा अहर्गणोत्पन्न मंगळ + मंगळाचा ध्रुवोनक्षेपक ७ राशि १२ अंश ५२ कला ० विकला = ९ राशि २९ अंश ५५ कला १३ विकला , हा मध्यम मंगळ झाला .
बुधकेंद्र .
त्रिघ्नो गणः स्ववसुदृग्लवयुग्ज्ञशीघ्रकेन्द्र लवाद्यहिगुणाप्तगणोनलिप्तम् ॥ १२ ॥
अर्थ -
अहर्गणास ३ नीं गुणून गुणाकार अंशादि येईल त्यास २८ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो त्या गुणाकारांत मिळवावा , आणि त्यांतून अहर्गणास ३८ नीं भागून भागाकार कलादि येईल तो वजा करावा म्हणजे अहर्गणोत्पन्न बुध केंद्रे होतें , त्यांत बुध केंद्राचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा म्हणजे बुध केंद्र होते .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ३ = ) ४५६३ अंश ÷ २८ = १६२ अंश ५७ कला ५१ विकला , हे त्याच गुणाकारांत मिळवून ४७२५ अंश ५७ कला ५१ विकला . ( अहर्गण १५२१ ÷ ३८ = ) ४० कला १ विकला = ४७२५ अंश १७ कला ५० विकला = १ राशि १५ अंश १७ कला ५० विकला . हें अहर्गणोत्पन्न बुधकेंद्र + बुधकेंद्राचा ध्रुवोनक्षेपक ० राशि १ अंश ५७ कला ० विकला = १ राशि १७ अंश १४ कला ५० विकला , हें बुधकेंद्र झालें .
मध्यमगुरु .
द्युपिण्डोऽर्कभक्तो लवाद्यो गुरुः स्याद् द्युपिण्डात्खशैलाप्तलिप्ताविहीनः ॥ऽऽ॥
अर्कभक्तः , द्युपिण्डः , द्युपिण्डात् खशैलाप्तलिप्ताविहीनः , लवाद्यः , गुरुः , स्यात् ॥ऽऽ॥
अर्थ -
अहर्गणास १२ नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांतून अहर्गणास पुनः ७० नीं भागून भागाकार कलादि येईल , तो वजा करावा म्हणजे अहर्गणोत्पन्न गुरु होतो . त्यांत गुरूचा ध्रुवोनक्षेपक मिळवून जी बेरीज येईल तो मध्यम गुरु होतो .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ÷ १२ = ) १२६ अंश ४५ कला . विकला ( अहर्गण १५२१ ÷ ७० = ) २१ कला ४३ विकला = १२६ अंश २३ कला १७ विकला ५४ रा . ६ अं . २३ क . १७ विक . हा अहर्गणोत्पन्न गुरु + गुरुचा ध्रुवोनक्षेपक ० राशि १ अंश ५२ कला ० विकला = ४ राशि ८ अंश १५ कला १७ विकला , हा मध्यम गुरु झाला .
शुक्रकेंद्र .
त्रिनिघ्नद्युपिण्डाद्दिधाऽक्षैः क्विभाब्जैरवाप्तांशयोगो भृगोराशुकेन्द्रम् ॥१३॥
अर्थ -
अहर्गणास ३ नीं गुणून जो गुणाकार येईल , त्यास ५ नीं भागून भागाकार अंशादि येईल त्यांत , त्याच गुणाकारास १८१ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो मिळवावा म्हणजे अहर्गणोत्पन्न शुक्र केंद्र होते , त्यांत शुक्रकेंद्राचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा , जी बेरीज येईल तें शुक्र केंद्र होतें .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ३ = ) ४५६३ ÷ ५ = ) ९१२ अंश ३६ कला ० विकला + ( गुणाकार ४५६३ ÷ १८१ = ) २५ अंश १२ कला ३५ विकला = ९३७ अंश ४८ कला ३५ विकला = ७ राशि ७ अंश ४८ कला ३५ विकला . हें अहर्गणोत्पन्न शुक्र केंद्र + शुक्रकेंद्राचा ध्रुवानक्षेपक ७ राशि २७ अंश ५३ कला ० विकला = ३ राशि ५ अंश ४१ कला ३५ विकला , हें शुक्र केंद्र झालें .
मध्यमशनि .
खाग्न्युद्धृतो दिनगणोंऽशमुखः शनिः स्यात् षट्पञ्चभूत्दृतगणात्फललिप्तिकाढ्यः ॥ऽऽ॥
अर्थ -
अहर्गणास ३० नीं भागून भागाकार अंशादि येईल , त्यांत अहर्गणास पुनः १५६ नीं भागून भागाकार कलादि येईल तो मिळवावा , म्हणजे अहर्गणोत्पन्न शनि होतो . त्यांत शनीचा ध्रुवोनक्षेपक मिळवावा जी बेरीज येईल तो मध्यम शनि होतो .
उदाहरण .
( अहर्गण १५२१ ÷ ३० = ) ५० अंश ४२ कला ० विकला + ( अहर्गण १५२१ ÷ १५६ = ) ९ कला ४५ विकला = ५० अंश ५१ कला ४५ विकला = १ राशि २० अंश ५१ क . ४५ विक . हा अहर्गणोत्पन्न शनि + शनीचा ध्रुवोनक्षेपक ९ राशि ९ अंश ४५ कला ० विकला = ११ राशि ० अंश ३६ कला ४५ विकला , हा मध्यम शनि झाला .
ग्रहांच्या कलात्मक मध्यमगति .
गोऽक्षा गजा रविगतिः शशिनोऽभ्रगोश्र्वाः पञ्चाग्नयोऽथ षडिलाब्धय उच्चभुक्तिः ॥ १४ ॥
राहोस्त्रयं कुशशिनोऽसृज इन्दुरामास्तर्काश्र्विनो ज्ञचलकेन्द्रजवोऽर्यहिक्ष्माः ॥
लिप्ता जिना विकलिकाश्र्च गुरोः शराः खं शुक्राशुकेन्द्रगतिरद्रिगुणाः शनेर्द्वे ॥ १५ ॥
म्हणजे
नाम |
रवि |
चंद्र |
चन्द्रोच्च |
राहु |
मंगळ |
बुधके० |
गुरू |
शुक्रके० |
श० |
कला |
९५ |
७९० |
६ |
३ |
३१ |
१८६ |
५ |
३७ |
२ |
विकला |
८ |
३५ |
४१ |
११ |
२६ |
२४ |
० |
० |
० |
कोणते ग्रह कोणत्या ग्रंथातून घेतले असतां वेधास मिळतात त्याविषयी
सौरोऽर्कोऽपि विधूच्चमङ्ककलिकोनाब्जो गुरुस्त्वार्य्यजोऽसृग्राहू च कजज्ञकेन्द्रकमथार्य्ये सेषुभागःशनिः ॥
शौक्रं केन्द्रमजार्य्यमध्यगमितीमे यान्ति दृक्तुल्यतां सिद्धैस्तैरिह पर्वधर्म्मनयसत्कार्यादिकं त्वादिशेत् ॥ १६ ॥
अर्थ -
रवि , चंद्रोच्च , नऊ कलांनी उणा चंद्र , हे सूर्य सिध्दांतांतून ; गुरु मंगळ आणि राहु , हे आर्य सिद्धांतांतून ; बुधकेंद्र ब्रह्मसिद्धांतांतून ; पांच अंशानीं अधिक शनि आर्य सिद्धांतांतून ; शुक्र केंद्र हें ब्रह्मसिद्धांतांत आणि आर्य सिद्धांत यांच्या मध्य प्रमाणानें ; घेतलें असतां वेधास मिळतात . म्हणून या वेधास मिळणार्या ग्रहांवरून गणित करून , ग्रहणादि पर्वें , व्रतादि धर्मकृत्यें , नीति कार्य , विवाहादि मंगळ कार्ये , इत्यादि सांगावी .
मध्यमाधिकार समाप्त