ग्रहलाघव - स्थूलग्रहणद्वयसाधनाधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


अथवाऽयं तिथिपत्रतोऽवगम्यः पर्वान्तश्र्च रविस्तमस्तिथेर्वा ॥

भस्येतैष्यघटीयुतिद्युमानं तेभ्योऽथ ग्रहणद्वयं प्रवच्मि ॥१॥

अर्थ -

पंचांगांतून पर्वांत घटिका , प्रातःकालीन रवि , प्रातःकालीन राहु , नक्षत्राच्या गतैष्य घटिकांचा योग आणि दिनमान ही घ्यावीं . नंतर रवि आणि राहु ह्यांस पर्वांत घटिकांचे चालन द्यावें , आणि विराव्हर्क आणावा . इतक्या वरून स्थूल मानानें सूर्यचंद्र ग्रहणाचें गणित करण्याची रीती सांगतो .

उदाहरण .

शके १५३४ वैशाख शुद्ध १५ सोमवार , गतघटी २ पलें ३३ सूर्योदयापासून एष्य घटी ५४ पलें १० , गतैष्य घटिकांचा योग ५६ घटी ४३प .; अनुराधा नक्षत्राच्या गतघटी २० पलें ४ , एष्यघटी ३८ पलें ३३ गतैष्य संयोग घटी ५८ पलें ३७ दिनमान ३३ घटी ६ पलें ; पर्वांत कालीन रवि १रा . ६अं . ३४क . ३७ विकला . आणि पर्वांत कालीन राहु १ रा . १४अं . १८क . ११ विकला . विराव्हर्क ११ रा . २२अं . १६ कला २६ विकला .

चंद्रग्रास .

ताराषड्व्यगतिथियातगम्यनाडीयोगाप्ता व्यगुरविदोर्लवोनितास्ते ॥

संयुक्ता निजदलभूपभागकाभ्यां छन्नं वाऽङ्गुलवदनं भवेत्सुधांशोः ॥२॥

अर्थ -

पर्वाच्या गतैष्य योग घटिकांत ७ वजा करून जी बाकी राहील तिनें ६२७ यांस भागून जो अंशादि भागाकार येईल त्यांतून विराव्हर्काचे भुजांश कमी करून जी बाकी राहील तिला २५ नीं गुणून १६ नीं भागावें . किंवा त्या बाकींत तिचें अर्ध व १ / १६ मिळवावा म्हणजे अंगुलादि चंद्र होतो .

उदाहरण

पर्वगतैष्य घटि योग ५६ घटी ४३ पलें - वजा ७ घटी = ४९ घटी ४३ पलें याचा ६२७ ने भाग दिला तेव्हा बाकी आली

१२ अं . ३६ क . ४१ विकला .- वजा व्यगुभुज ७ अं . ४३ क . ३४ विकला = ४ अं . ५३ क . ७ विकला X२५ =१२२ अं . ७ क . ३५ विकला ÷ १६ =७ अं . ३८ प्रतिअंगुले चंद्रग्रास .

चंद्रबिंब आणि भूभाबिंब .

अङ्गयुक्तिथिघटीत्दृतबाणाङ्कर्त्तवोऽङ्गुलमुखं विधुबिम्बम् ॥

दिग्वियुक्तिथिघटीत्दृतदृग्दृक्रीन्दवोऽङ्गुलमुखा क्षितिभा स्यात् ॥३॥

रुद्रभूपनखभूपरुद्रखव्यंगुलैर्विरहिता युता क्रमात् ॥

षड्गृहे सति रवौ धटात्क्रियान्नाडिकोद्भवकुभा स्फुटा भवेत् ॥४॥

अर्थ -

पर्वाच्या गतैष्य योग घटिकांत ६ मिळवून जी बेरीज येईल तिणें ६९५ यांस भागून जो भागाकार येईल तें अंगुलादि चंद्रबिंब होते . आणि पर्वाच्या गतैष्य योग घटिकांतून १० वजा करून जी बाकी राहील तिणें १३२२ यांस भागावें म्हणजे अंगुलादि भूभा बिंब होते . मग त्याच्या प्रति अंगुलांत जर सूर्य मेष राशीपासून तूल राशीपर्यंत आहे तर ज्या राशीस असेल त्या राशीचे खालीं दिलेले अंक मिळवावे आणि जर सूर्य तूल राशीपासून मेष राशीपर्यंत आहे तर ज्या राशीस असेल त्या राशीचे खालीं दिलेले अंक वजा करावे म्हणजे भूभाबिंब होतें .

मे .

वृष .

मि .

क .

सिं

कन .

तु

वृ

ध .

म .

कुं .

मीन

नाम

११

१६

२०

१६

११

११

१६

२०

१६

११

प्रतिअंगुल

उदाहरण .

३९५ ÷ पर्वगतैष्ययोग घटी ५६ पलें ४३ + ६घटी = ६२घटी ४३ पलें = ११ अंगुलें ४ प्रति अंगुलें हें चंद्रबिंब झालें . तसेंच १३२२ ÷ ( पर्वग तैष्य योग घटी ५३ पलें ४३ - १० =) ४६ घटी ४३ पले = २८ अंगुलें १७ प्रति अंगुलें हें मध्यम भूभा बिंब झालें आणि सूर्य वृषभ राशीला आहे म्हणून वृषभ राश्यंक अंक १६ प्रति अंगुलें मिळविल्यानें २८ अंगुलें ३३ प्रति अंगुलें हें भूभा बिंब झालें .

नक्षत्रापासून चंद्रग्राससाधन .

विदशोडुघटीयुताः खभूषड्व्यगुभास्वद्भुजभागवर्जितास्ते ॥

शितिकण्ठहतास्तुरङ्गभक्ताः स्थगितं चांगुलपूर्वकं विधोः स्यात् ॥५॥

अर्थ -

नक्षत्राच्या गतैष्प योग घटिकांतून १० वजा करून जी बाकी राहील तिनें ६१० यांस भागून जो अंशादि भागाकार येईल त्यांतून व्यगूचे भुजांश कमी करून जी बकी राहील तिला ११ नीं गुणून ७ नीं भागावें म्हणजे अंगुलादिक चंद्राचा ग्रास होतो .

उदाहरण .

६१० ÷ ( नक्षत्राच्या गतैष्य यौग घटी ५८ पलें ३६ - १० घटी = ) ४८ घटी ३६ पलें = १२अं . ३३क . ५ विकला यांतून व्यगूचा भक्तज ७अं . ४३क . ३४ विकला वजा करून बाकी ४अं . ४९क . ३१ विकला  ११ ( = ५३अं . ४ कला ४१ विकला ) ÷ ७ = ७ अंगुलें ३४ प्रति अंगुलें हा चंद्राचा ग्रास झाला .

नक्षत्रापासून चंद्रभूभाबिंब साधन .

भगतागतनाडिकैक्यभक्ता नववेदर्त्तव इन्दुबिम्बमुक्तम् ॥

विमनूडुघटीत्दृताः शराक्षद्विभुवः स्यात्क्षितिभांगुलादिका वा ॥६॥

अर्थ -

नक्षत्राच्या गतैष्प योग घटिकांनीं ६४९ यांस भागावें म्हणजे अंगुलादि चंद्रबिंब येते . तसेंच नक्षत्राच्या गतैष्य योग घटिकांत १४ वजाकरून जी बाकी राहील तिणें १२५५ यांस भागून जो भागाकार येईल तें अंगुलादि मध्यम भूभाबिंब येते . यांत पर्वापासून भूभाबिंब आणते वेळेस जो संस्कार सांगितला आहे तो करावा . म्हणजे भूभाबिंब होते .

उदाहरण .

६४९ ÷ नक्षत्राच्या गतैष्य योगघटी ५८ पलें ३६ = ११ अंगुलें ४ प्रति अंगुलें हें चंद्रबिंब झालें . तसेंच १२५५ ÷ ( नक्षत्राच्या गतैष्य घटी ५८ पलें ३६ - १४ घटी = ) ४४ घटी ३६ पलें = २८ अंगुलें ८ प्र . अंगु ., हें मध्यम भूभाबिंब झालें . यांत सूर्य वृषभ राशीस आहे म्हणून १६ प्रति अंगुलें मिळवल्यानें २८ अंगुलें हें भूभाबिंब झालें .

सूर्यग्रास साधन .

खात्यष्टयत्तिथिघटीवित्दृताः सवेदा वाथोडुनाडित्दृतदेवयमाः सरामाः ॥

हीना व्यगुस्फुटलवैर्भवसंगुणास्ते शैलोद्धृताः खररुचः स्थगितांगुलानि ॥७॥

अर्थ -

पर्वाच्या गतैष्य घटिकांनी १७० यांस भागून जो भागाकार येईल , तो अंशादि त्यांत ४ अंश मिळवून जी बेरीज येईल तींतून स्पष्ट नतांश वजा करून जी बाकी राहील तिला ११ नीं गुणून ७ नीं भागावें म्हणजे अंगुलादि सूर्याचा ग्रास होतो . अथवा नक्षत्राच्या गतैष्य योग घटिकांनी २३३ यांस भागून भागाकार अंशादि येईल त्यांत ३ अंश मिळवून त्यांतून स्पष्ट नतांश वजा करावे ; जी बाकी राहील तिला ११ नीं गुणून ७ नीं भागावें . म्हणजे अंगुलादि सूर्याचा ग्रास होतो . (उदाहरण पुढें दिलें आहे .)

उदाहरण

शके १५३० मार्गशीर्ष वद्य ३० बुधवार ; गतघटी ५१ पलें ५० व एष्य घटी १२ पलें ५९ ; गतैष्यघटिकांचा योग ६४ घटी ४९ पलें मूळ नक्षत्राच्या घटी ५३ पलें ५४ व एष्यघटी १२ पलें २ ; गतैष्यघटी योग ६५ पटी ५६ पलें ; दिनमान २६ घटी ४ पलें ; दर्शांतीं सूर्य ८ रा . ५अं . २६क . २० विकला . राहु २ रा . ११अं . ४१क . १८विक . व्यगु ५ रा . २३अं . ४५क . २विक .

दर्शांतींचें पूर्वनत ० घटी ३ पलें ÷ ४ = ० राशि ० अं . २२क . ३०विक ., हा भागाकार पूर्वनत आहे म्हणून रवींतून ८रा . ५अं . ३क . ५०विक .; ही पासून आणलेली क्रांति दक्षिण २३अं . ४३क . ४०विक . + अक्षांश दक्षिण २५अं . २६क . ४२विक . = ४९ अंश १० कला २२ विकला हे नतांश झाले .

हे नतांश ÷ ६ = ८अं . ११क . ४३ विकला , हा भागाकार नतांश दक्षिण आहेत म्हणून दक्षिण ; आणि व्यगु उत्तर गोली आहे म्हणून व्यगूचे भक्त जांश ६अं . १४क . ५८ विकला उत्तर आहेत . म्हणून नतांश ८अं . ११क . ४३ विकला - व्यगुभक्तजांश ६अं . १४क . ५८ विकला = १अं . ५६क . ४५ विकला , हे नतांश होत .

आतां , १७० ÷ दर्शाच्या गतैष्य घटिका ६४ पलें ४९ = २अं . ३७क . २२ विकला + ४ अं . = ६ अं . ३७ क . २२ वि .- वजा स्पष्ट नतांश १ अं . ५६ क . ४५ वि . = ४ अं . ४० क . ३७ वि . X ११ विकला = ५२ अं . २६ क . ४७ विकला . ÷ ७ = ७ अंगुले २० प्रति अंगुले सूर्यग्रास .

अथवा

नक्षत्र गणैक्य घटी ६५ पलें ५६ ÷ २३३ = ३ अं . ३२ क . १ विकला .+ ३अंश = ६ अं . ३२ क . १ विकला . होईल . यातून स्पष्ट नतांश १ अं . ५६ क . ४५ वि . वजा केल्यास ४ अं . ३५ क . १६ विकला मिळतात . या ४ अं . ३५ क . १६ विकला ला ११ ने गुणाकार करा तेव्हा उत्तर येते ५० अं . २७ क . ५६ विकला याला ७ ने भागल्यास सूर्यग्रास ७ अंगुले १४ प्रतिअंघूले मिळतात .

सूर्यबिंबसाधन .

रविलवयुतभानोर्दोलवत्र्यंशतुल्यौर्विरसलवम हेशा व्यंगुलैर्हीनयुक्तः ॥

अजधटरसभेऽर्के बिम्बमस्यांगुलाद्यं स्थितिमुखमवशिष्टं पूर्ववच्छेषमत्र ॥८॥

अर्थ -

स्पष्ट रवींत १२ अंश मिळवून त्याचे भक्तजांश करावे . आणि त्या भुजांशांस ३ नीं भागून जो भागाकार येईल तीं प्रति अंगुलें , रवि मेषादि षड्भांत आहे तर १० अंगुलें ५० प्रति . अं यांत मिळवावी म्हणजे अंगुलादि सूर्यबिंब होते .

उदाहरण

पुनः स्पष्ट रवि ८ रा . ५ अं . २६ क . २० विकला + १२ अं .= ८ रा . १७ अं . २६ क . २० विकला . याचे भुजांश झाले ७७ अं . २६ क . २० विकला . याला ३ ने भागल्यास २५ प्रतिअंगुले मिळतात आता सूर्य ६ राशींवर आहे म्हणून १० अंगु . ५० प्रतिअंगुले या २५ प्रतिअंगुलेत मिळवावीत म्हणजे ११ अंगुले १५ प्रतिअंगुले सूर्यबिंब ल्जाले .

स्थूलग्रहणाद्वयसाधनाधिकार समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP