|
न. ( कों ) एक प्रकारचे गवत ; बेर . पु. १ लागणारें सामान ; साहित्य ; साधनें ; सरंजाम ; कार्याला लागणार्या सर्व गोष्टी ( समुच्च्यार्थी ). २ नाचणारणी , गाणारणी , पोवाडेवाले , तमाशेवाले , जादूगार इ० मंडळीना लागणारी हत्यारे पातारें , साहित्य ; उपकरणी . साज सारंगी देत आणून । म्हणे नवरसे कुशलत्वपण । कळा दावी कुशळ कोणती । - नव १९ . ३८ . ३ गाण्यानाचण्याच्या वेळी पायांत घुंगरांचा चाळ बांधतात तो . ४ पोषाख ; जामानिमा ; शृंगार ( कलावंतीण , नट , शिपाई इ० चा ). ५ सज्ज , तयार होणें ; पोषाख घालणें . ६ ( सामा . ) नटण्यासजण्यासाठी लागणारा पोषाख , वस्त्रें , इ० ७ थाटमाट ; शृंगारमंडण ; नटणें . बहु दिवसी पति येतां करि बहु मिथिला पतिव्रता साज । - मोकृष्ण ८७ . १५ .. ८ पखवाज . ९ गळ्यांतील एक दागिना . [ सं . सज्ज ; फा . साझ् ] ०करी पु. वाजंत्री , गवई , तमासगीर , गोंधळी इ० च्या ताफ्यांतील इसम . ०भारा , साजारा - न . साज गवताचा भारा , ओझे . साजाची - वि . खार जमिनीचा एक प्रकार . हीत साजाचें किंवा बेराचें गवत उगवतें . ०संजोगी वि. साज , साजकारी . साजसंयोगी थोर प्रवीण । - दावि ३८१ . ०सरंजाम पु. एखाद्या कार्याला लागणारे साहित्य , सामानसुमान . ०सामान न. साधनें ; साहित्य . साज अर्थ १ पहा . साज सामान कूल लुटून नेले . - ऐच २४ . साजणें - उक्रि . १ शोभणें ; योग्य दिसणें . ब्रह्मगोळकंचिया माळा । साजती जियेच्या गळां । - शिशु ८७ . २ चांगले , योग्य समावणें . [ सं . सज्ज ] म्ह० साजेल ते बोलावें आणि पचेल तें खावें . साजरा , साजिरा - वि . १ सुशोभित ; शोभिवंत ; अलंकृत - एभा १८ . तरी तो मदन तूं तेंच वरी । तेणें तूं साजिरी । जगामाजी । - कथा १ . ३ . १४० . २ सुंदर ; गोजिरवाणा ; छान . कंठी हार साजिरा । - भूपाळी गणपतीची म्ह० १ पुणतांब्याच्या म्हशी आणि टोणगांव साजरा . २ फुटका डोळा काजळानें साजरा . साजरागोजरा , साजिरागोजरा - वि . देखणा ; सुंदर ; पद्मवीण तळें , निरक्षर मुखी जो साजिरा गोजिरा । - वामन स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १३३ ). साजरेपण , साजिरेपण - न . सौंदर्य ; शोभा . ऐक्याचें मुदल न ढळे । आणि साजरेपणाचा लाभ मिळे । - अमृ १ . ५९ . साजविणें - क्रि . शोभविणें . उद्धरुनि पतितरामप्रभु - कीर्तिहुनी स्वकीर्ति साजविली । - मो स्फुट आर्या ( नवनीत पृ २५५ ). साजावणें - क्रि . शोभिवंत दिसणें ; खुलणें . परि तो पूर्णमेसीच पूर्णत्वासी ये । आणि कळंके साजावला होय । - स्वानु ६ . १ . ३२ .
|