Dictionaries | References क कोंडा Script: Devanagari Meaning Related Words कोंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōṇḍā m Bran, husk of corn gen. 2 fig. Miliary scab, scurf. 3 fig. Rash, any efflorescence on the body. 4 A small kind of bamboo. 5 Commonly कोंयंडा. कोंड्याचा मांडा करणें To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials. कोंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Bran, husk of corn gen. Fig. Rash, any efflorescence on the body.कोंड्याचा मांडा करणें To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials. कोंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun डोक्यात होणारा एक भुश्यासारखा पदार्थ Ex. कोंडा कमी करायला केसात दही, लिंबू, अंडे इत्यादी लावतात. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউফি bdखफि benরূসী gujખોડો hinरूसी kanತಲೆಹೊಟ್ಟು kasکُپھ malതാരന് mniꯂꯨꯄꯧ nepचाया oriରୁପି panਸਿਕਰੀ sanदारुणा tamபொடுகு telచుండ్రు urdروسی , ڈینڈرف कोंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धान्याचें भूस . सालपट , तूस इ० ' देवा कळणा अथवा कोंडा । ' तुकाराम ( नवनीत पृ . ४४८ .) ' कार्ष्णि म्हणे वायुपुडें जरि काय टिकत असेल कोंडा या । ' - मोभीष्म १० . ४४ . २ ( ल .). ताप निघाल्यानंतर अंगावरील निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ , सालें , मळ . ३ खपली ; पापुद्रा . ४ चिवा ; एक लहान प्रकारचा बांबू . ( का . कोंडे - गोंडा . तुरा ?) - ड्याचा मांडा करणें - १ अगदीं निकृष्ट परिस्थितींतूहि चांगलें कार्यं करुन दाखविणें ; साध्या गोष्टीच्या मदतीनेंहि चांगल्या गोष्टी करणें . २ ( ल .) अडून न बसणें ; गोड करून घेणे ; समाधानी राहाणें . ३ सुग्रणपणा अंगीं असणें .१ कोयंडा ( दाराचा ) पहा . २ ( तंजा ) मल्याळी तर्हेंची वेणी व तिचा साज . ( ता .)०पाऊस पु. पावसाची बुरबुर , रिपरिप . केवळ तुषारयुक्त पाऊस पडणें .०पाणी न. अन्नपाणी . ' नका देऊं तिळमात्र कोडंपाणी । ' - ऐपो २३५ .०भोंडा पु. १ कोंडा . भूस इ० पदार्थ . २ ( ल .) कोरडें , नीरस , वाळलेलें अन्न ; कदन्न . कोंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोंडा कांडणेंकोंडा कितीहि कांडला तरी त्यातून धान्य थोडेच बाहेर पडणार आहे. निष्फळ खटपटकाथ्याकूट. ‘कां कोंडा कांडितां सुभटा। कण जोडे।।’-ज्ञानदेवी (अध्याय ९). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP