Dictionaries | References

शृंगार

   
Script: Devanagari

शृंगार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  स्त्रियों का गहने, कपड़े आदि से अपने आपको सजाने की क्रिया   Ex. कुछ स्त्रियों का अधिकांश समय शृंगार में व्यतीत होता है ।
ONTOLOGY:
इत्यादि (PHSCLACT)">शारीरिक कार्य (Physical)इत्यादि (ACT)">कार्य (Action)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
   see : शृंगार रस

शृंगार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : साज, शृंगार रस

शृंगार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of love by fond caresses, blandishments, and tendernesses; using wanton or soft gestures or airs. 4 The commerce of the sexes.

शृंगार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  dress and decoration. love, the amorous sentiment as a subject of poetical description. exhibition of love (on the part of the female) by blandishments &c.

शृंगार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्त्रियांचे नटणे, सजणे   Ex. नववधूने छान शृंगार केला होता
HYPONYMY:
ONTOLOGY:
इत्यादि (PHSCLACT)">शारीरिक कार्य (Physical)इत्यादि (ACT)">कार्य (Action)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
 noun  नवरसांपैकी एक रस   Ex. शृंगार हा रसराज मानला जातो.
HYPONYMY:
संयोग शृंगार रस
ONTOLOGY:
इत्यादि (PROPT)">गुणधर्म (property)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
SYNONYM:
शृंगार रस
Wordnet:
hinशृंगार रस
kokशृंगार रस
urdشرنگاررس , جنسی لذت سے متعلق رس

शृंगार

  पु. 
  1. नवरसापैकी एक रस . ( प्रेम , कामभावना वगैरेचे वर्णन करणारा ). देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगारातें जिणे । - ज्ञा १० . ४२ . ( समासांत ) शृंगार - लीला - रस - सुख - विनोद - शास्त्र - गृह - प्रिय - भाव - संभाषण - मत्सर इत्यादि
  2. अलंकार ; भूषण ; शोभा ; थाट . अगा बालका लेवविजे लेणेतया शृंगारा बाळे काई जाणे । - ज्ञा १० . ५८ . 
  3. ( स्त्रियांनी केलेले ) प्रेमदर्शक हावभाव , आविर्भाव ; लज्जादि प्रदर्शन ; नखरा , चाळे वगैरे .  
  4. स्त्रीपुरुषांचा कामुक व्यवहार . [ सं . ]

०कलह  पु. प्रेमकलह ; प्रेमाचे लटके भांडण .
०गळेसरी  स्त्री. एक गळ्यांतील भूषण , दागिना .
०चेष्टा  स्त्री. १ ( स्त्रियांनी केलेल्या ) कामुक चेष्टा , चाळा ; प्रेमविषयक हावभाव , खेळ . २ स्त्रियांचा नखरा ; प्रेमप्रदर्शन ; प्रेमविलास .
०पटटी  स्त्री. घराच्या पुढील दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस गणेशपट्टीच्या वर बसविलेली कोरीव कामे केलेली पट्टी
०पण  न. शोभा . मगचालते कळंकेवीण । शशिबिंब जैसे परिपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे । - ज्ञा १७ . २३० .
०पेटी  स्त्री. स्त्रियांची फणी - करंडयाची सुंदर पेटी . ' तुम्ही माईला तेवढी शृंगारपेटी आणालीत । - बहकलेली तरुणी १९ .
०मराळिका, मराळी  स्त्री .  सुंदर स्त्री ; रूपवती . [ शृंगार + मराळिका = हंसी ]
०मुरड  पु. शृंगारोपभोग . शृंगार मुरड उत्तम जनतेथे भोग भोगितसे । - नव ११ . ६४ .
०लज्जा  स्त्री. प्रेमविषक वरवर . दिसून येणारी लाज , विनय ; ओढूनताणून आणलेला बुजरेपणा , नखरा ; कामुक लज्जेचा आविर्भाव .
०लालन  न. ( स्त्रियांनी केलेले ) कामुक चाळे , चेष्टा ; प्रेमयुक्त लाड , कौतुक , हावभाव .
०साज  पु. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना
शृंगारणी  स्त्री . सजवणूक ; आरास ; शोभा ; साज 
शृंगारणे  स्त्री .  सुशोभित करणे ; सजविणे ; नटविणे ; शोभविणे ; भूषवणे .  
शृंगारिक , शृंघारिक  वि .  
  1. शृंगारासंबंधी . 
  2. शृंगारी ; शृंगाराचा भोक्ता . शृंघारिक नवरसिक । यामध्ये सांडावे येक । - दा १४ . ५ . २१ .  

शृंगारित  वि .   सजविलेला ; नटाविलेला ; भूषविलेला ; शोभायमान ; सुशोभित .  
शृंगारी , शृंगारीक वि .  
  1. शृंगारशास्त्रांत निपुण
  2. कामुक ; वैषयिक ; प्रेमासक्त ; कामी
  3. शृंगारासंबंधी ; प्रेमविषयक . 
  4. ( कों . ) घराच्या बांधणीचा एक प्रकार आहे त्या प्रकारचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP