Dictionaries | References

सोळा शृंगार

   
Script: Devanagari

सोळा शृंगार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sōḷā śṛṅgāra or -शिंगार m pl vulgar corruption of सोळा संस्कार, and used in the figurative sense of that word.

सोळा शृंगार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सोळा पद्धतींनी केला जाणारा विवाहित स्त्रीचा संपूर्ण शृंगार   Ex. नृत्यांगनाने सोळा शृंगार केला होता.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सोळा शृंगार

    ( अ )
  1. मज्जन
  2. वस्त्र
  3. अलत्तक
  4. केशपाश
  5. सौगंध्य
  6. भूषण
  7. मुखसुवास
  8. कज्जल,
  9. भाषण
  10. हास्य
  11. चातुर्य
  12. चालन,१
  13. पातिब्रत्य
  14. गान
  15. कटाक्ष
  16. क्रोडा
( आ)
  1. तैलाभ्यंगस्नान
  2. चीर
  3. कंचुकी
  4. कुंकुम
  5. काजळ
  6. कुंदलें
  7. हार
  8. मोतीं
  9. केश
  10. नूपुरें
  11. चंदन
  12. कंबरपटटा
  13. तोडे
  14. तांबूल
  15. बांगडया
  16. चतुरता
( इ )  चार चतुष्पद, चार खगपद, चार फल, फुल चार, राधाजीके बदनपर ये सोळा सिनगार ll ( दोहर )
चतुष्पद-
  1. तुरंगवत् घुंगट,
  2. कुरंगवत् नेत्र,
  3. गजगती चालणें,
  4. सिंहाप्रमाणें कंबर.
खगपद-
  1. कोकिळा स्वर,
  2. भ्रमराकृति भोवया,
  3. शुकचंचुवत नाक,
  4. मीनखंजनाक्षवत चंचलता. ( मीनवत् अक्ष)
फळें-
  1. कपित्थवत् कुच,
  2. दाळिंबबीजवत् दंत,
  3. आम्रबीजवत् हनुवटी,
  4. प्रवाळापरी अधर.
फुलें-
  1. चंपकवत् कांती,
  2. केतकीवत् सुगंध,
  3. कमलाकृती नाभि,
  4. गुलाबापरी गाल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP