|
वि. १ पर्युषित ; बासा ; पारोसा ; जुना ; निःसत्त्व . २ ( कों . ) थंड ; निवालेला . ३ ( ल . ) थंडा ; ढिला ; मंद ( कारभार , व्यवहार , धंदा , स्वभाव ). [ सं . शीतल ] शिळया कढीला ऊत आणणें , शिळया कढीला ऊत येणें - विसरलेली , जुनी झालेली गोष्ट उकरून काढणें ; मागाहून अवसान आणणें . स्त्री. शिला ; मोठा सपाट दगड ; पाटा . शिळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली । - तुगा ३८८ . [ सं . शिला ] ०पाका वि. उरलेसुरलेलें ; आदल्या दिवशींचें ; जुना ; बेचव . म्ह० शिळेंपाकें खाल तुम्हीं बांगडीसे व्हाल . ०चुंबी पु. लोहचुंबक . ०छाप पु. कागदावर लिहिलेला मजकूर शिलेवर उठवून छापण्याची पध्दति . ०पाडवा पु. पाडव्याचा सण झाल्यानंतर दुसर्या दिवशीं उरलेलें सणाचें पक्वान्न खाणें . ०धार धारा - वि . शिळणधार पहा . ०बाजार पु. मुख्य बाजाराचा दिवस होऊन गेल्यावर नंतर जीं एखाद दुसरीं दुकानें राहतात तीं ; ( मोडजत्रेप्रमाणें ). ०बिब्बा पु. एखाद्या कामांत पडला असतां तें काम लवकर संपवावयाचा नाहीं व सोडावयाचा नाहीं व कोणी बोललें तरी रागवावयाचा नाहीं असा फारच धिमा , मंद , चेंगट मनुष्य . शिळवड , शिळवट , शिळावट , शिळवण , शिळवरें - न . ( राजा . ) शिळे पदार्थ ( भात , भाकरी वगैरे ). शिळवणें , शिळविणें - उक्रि . शिळें करणें ; दुसर्या दिवसाकरितां राखून ठेवणें ; ताजेपणा नाहींसा करणें , घालविणें . शिळावळ - स्त्री . शिळें अन्न खाणें ; शिळया पदार्थाचें भोजन . शिळी ओटी - स्त्री . गर्भाधान विधीनंतर दुसर्या दिवशीं सकाळीं मुलीची आई तिची ओटी निजावयाच्या खोलींत भरते ती . ०रस पु. शिलारस पहा . ०राशि पु. शिलाराशि पहा . ०श्वेत सेत - पु . १ दगडांचा सेतु , पूल . २ ( ल ) मजबूत , भरीव , घट्ट बांधणीचें पक्कें घर , यंत्र , काम , मसलत , घडण वगैरे ( क्रि० बांधणें ). [ सं . शिला + सेतु ] शिळोच्चय - पु . पर्वत . [ सं . शिलोच्चय ]
|