Dictionaries | References ध धणी Script: Devanagari See also: धणीगोसामी , धणीजोग , धणीण Meaning Related Words धणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhaṇī, dhaṇīgōsāmī, dhaṇījōga, dhaṇīṇa Properly धनी &c.Desire, craving, earnest longing. v पुर, पुरव. Ex. रूप पाहतां लोचनीं ॥ न पुरे धणी मनाची ॥. 2 Explained by teachers by the word तृप्ति in the sense Satiety or satedness; but probably the sense Desire or craving abides still. Ex. माझिये जातीचा मज भेटो कोणी ॥ फेडावया धणी आवडीची ॥ तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा ॥ गावूं या गोपाळा धणी भरी ॥. धणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Properly धनी &c. f (Poetry.) Desire, craving;न पुरे धणी मनाची Satiety. धणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आशा , इच्छा ;ना. तृप्ती , समाधान ;ना. ठेवा , लाभ ;ना. रेलचेल , विपुलता , समृद्धी . धणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ इच्छा ; आशा ; हौस . ( क्रि० पुरणे ; पुरविणे ). तरि तुझी पुरवीलचि तो धणी । - वामन नृसिंहदर्पण ९८ . मुक्ताफळ सुपाणी । वायसा लागली खाणी । तयासी सांडुनि धणी । घेती अमेद्याचि । - दावि २८५ . २ तृप्ति ; समाधान . देवा तुजऐसा निजगुरु । आजि आती धणी कां न करुं । - ज्ञा ३ . २१ . धर्म म्हणे माझी धणी । पुरली नामाची आयणी । - वेसीस्व ११ . ८९ . माझिये जातीचा मज भेटो कोणी । फेडावयाची धणी आवडीची । ३ धन्यता . जलधि - मध्य पुरीत तिचा धणी । वधुनि दे मज आत्मसुखे धणी । - वामन - लोपामुद्रासंवाद २८ . ४ ठेवा ; अपूर्व , अकल्पित लाभ ; धण . परमसुखाची हे लाधलीसी धणी । - निगा ६ . ५ विपुलता ; समृद्धि . [ सं . ध्राणि ; प्रा . धणि = तृप्ति , संतोष ] धणीचा - वि . पुरेसा ; पोटभर ; येथेष्ट . दृश्य देखतां शिणले नयन । धणीचे घ्यावया कृष्णदर्शन । - एरुस्व ७ . २२ . पु. १ मालक ; धनी ; यजमान . धनी पहा . तुका म्हणे एक । धणी विठ्ठ्ल मी सेवक । - तुगा ८२४ . २ नेता ; पुढारी ; अधिपति . हे सत्य परि प्रबळहि बळ दुर्बळ जरि रणी धणी दूर । - मोसंशयरत्नमाला १४ . ( नवनीत पृ . ३५० . ) [ सं . धनी ; गुज . धणी = मालक ; नवरा ]०गोसावी जोग पु . धनी गोसावी इ० पहा .०भर वरी क्रिवि .( काव्य ) पोटभर ; यथेच्छ ; तृप्ति होईपर्यंत ; मनसोक्त ; धनभर . पाहीन धणिभरी चरण झाडीन केशी । - रामाचाधावा भक्तिमार्ग - प्रदीप ४८ . श्यामकर्ण नेऊन देई । धणीवरी पाहे श्रीकृष्णा । - जै १५ . १४५ . स्मरूं , बाहूं , पाहूं धणिवरि उभा राहिल कधी । - र ५८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP