|
स्त्री. १ एकाचे नुकसान , नाश होऊन , प्रयत्न इ० विफळ होऊन दुसर्यास अकल्पित , अनायासे होणारा लाभ ; दुसर्याची झालेली चैन , भर . त्याने कपाळकूट करुन पैसा मिळविला पण शेवटी चोरांची धण झाली . २ समृद्धि ; संपन्नता . धन पहा . ३ इच्छा . ( क्रि० पुरणे ). धणी ( - स्त्री . ) पहा . [ सं . धन = द्रव्य , धणी पहा . ] ( वाप्र . ) ०करणे होणे आपसांतील दुहीमुळे तिसर्याचा विनाकारण लाभ , फायदा होणे . ०घेणे मनसोक्त , पोटभर खाणे ; ( खाद्य इ० कांचा ) समाचार घेणे . एकाने मोठमोठे लाडवांचे तुकडे करुन गट्ट केले , दुसर्याने चटण्या , सांभारी यांची धण घेतली . - बाळ . ०पुरणे इच्छा तृप्त होणे ; संतोष , समाधान होणे . ०पुरविणे ( एखाद्याची ) इच्छा तृप्त करणे ; एखाद्यास संतोषविणे . ०पुरस्तुर क्रिवि . तृप्ति होईपर्यंत ; मनसोक्त ; पोटभर . [ धण + पुरणे + तोंवर ]
|