|
न. कणसें एकदां तुडवून काढलेलें गोंडासहित धान्य ; दाणे व भूस ह्यांचें मिश्रण . ह्याला पहिलें मदन असेंहि म्हणतात . दुसर्यांदा तुडवून निघालेल्या धान्यास दुसरें किंवा आकणाचें मदन म्हणतात व तिसर्यांदा कणसें तुडवून निघालेल्या धान्यास तिसरें किंवा निकणाचें मदन म्हणतात . परंतु कांहीं प्रांतांत वेगवेगळ्या तुडवणीवरुन धान्याचे रास , आकण , निकण , व मणी किंवा रास , कांडें , मातेरें , फंजट किंवा वरळें असेंहि प्रकार करतात . हे शब्द ( त्यांच्या अनुक्रमाप्रमाणें ) पहा . [ सं . मर्दन ; प्रा . मद्दन ] म्ह० पहिली रास , दुसरें आकण , तिसरें निकण , चौथा मणी त्यास बलुता धणी . पु. पु. गुर्हाळांत गुळ करतांना आटत असलेला रस . - ज्ञाको . ऊ २८ . कामदेव . काम ; संभोगाविषयींची इच्छा ; विषयविकार . [ सं . ] ( मुखावरुन , तोंडावरुन , स्वरुपावरुन ). ०ओंवाळून , ओवाळणें - एखाद्या मनुष्याचें सौंदर्य मदनापेक्षांहि अधिक आहे असें दाखविण्यासाठीं योजितात . कामेश्वर - पु . एक कामोद्दीपक रासायनिक औषध . टाकणें , ओवाळणें - एखाद्या मनुष्याचें सौंदर्य मदनापेक्षांहि अधिक आहे असें दाखविण्यासाठीं योजितात . कामेश्वर - पु . एक कामोद्दीपक रासायनिक औषध . ०तात पु कृष्ण . मदनतात मनमोहन मुरली वाजवी कुंजवनीं । ०फळ न. गेळफळ . ०बाण पु. मदनाचे बाण , आयुधें . हे पांच आहेत ; ( अ ) ( फुलें ) अरविंद , अशोक , चूत , नवमल्लिका व नीलोत्पल . ( आ ) ( विकार ) उन्मादन , तापन , शोषण , स्तंभन , व संमोहन . बाधि मदन बाण घे प्राणदान दे दावि हरी वदना । - देप ७४ . एक फुलझाड ; जाईची एक जात . तिनें एक मदनबाणाचें पुष्प खोंविलें । - चंद्र ५४१ . ०मस्त वि. कामविकारानें बेफाम , उन्मत्त झालेला . ०मूर्ति स्त्री. कामदेव . सुंदर , सुस्वरुप मनुष्य ; मदनाचा पुतळा . मदनाचा पुतळा - पु . अत्यंत सुंदर मनुष्य . पाहीन ना आतां कसला मदनाचा पुतळा हिला नवरा मिळतो तो ! - पकोघे . मदनाची छडी - स्त्री . अत्यंत सुंदर स्त्री . तूं कशी सुरेख मदनाची छडी आहेस . - मृ ९ . मदनांतक , मदनारी - पु . शिव ; शंकर . अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । - ज्ञा १० . २२५ . [ सं . मदन + अंतक , अरि ]
|