Dictionaries | References ज जळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जळणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 6 At cards. To become worthless or powerless--a card, it having been kept in hand when it should have been played. 7 fig. To be fermenting, working, boiling--pride, rage &c. Ex. त्याचे अंगीं किती मस्ती जळती आहे. जळो or जळो जळो burn thee! burn it! used in expression of anger or scorn. Ex. जळो जळो तयाचा जप ॥ व्यर्थ काय कोरडा प्रताप ॥ गुरुस्वरूप नावडे जया ॥. जळत भाकर खावी पळत हाटांत जावें To make all haste and speed under great sense of urgency. नजळणें not to burn, i. e. not to be destroyable even by fire; to be inexhaustibly plentiful--crops, possessions, money. Rate this meaning Thank you! 👍 जळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i burn, be on fire. burn, blaze -fire. be scorched. be inflamed (with anger &c.).जळो,जळो, जळो burn thee! burn it! used in expression of anger or scorn. Rate this meaning Thank you! 👍 जळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ पेटणें ; अग्निसंयोगानें दग्ध होणें . २ ज्वाला येणें , निघणें ; प्रज्वलित होणें ( आग , दिवा ). रात्रीस चारी प्रहर दिवा जळत होता . ३ होरपळणें ; करपणें ; नष्ट होणें ( कडक थंडीनें अथवा उन्हानें पीक ). ४ आग होणें ( अंगाची ); जळफळणें ; दाह होणें ( ताप , पित्त इ० च्या वेळी ). तो तापानें कसा जळतो आहे . ६ ( पत्त्यांचा खेळ ) खर्ची होणें ; निरुपयोगी होणें ( वास्तविक पत्ता टाकावयाचा असतां टाकला नाही म्हणून , किंवा मोठया पानाबरोबर , किंवा दुसर्या रंगाच्या हातांत , टाकल्यानें ). ७ ( ल . ) संतापणें ; जळफळणें ; तडफडणें ( त्वेष , राग इ० नीं ). त्याच्या अंगीं किती मस्ती जळती आहे . [ सं . ज्वल , ज्वलन , प्रा . जळण हिं . जलना ] ( वाप्र . ) जळो , जळोजळो , जळ्ळें - जाळ तें ! मरूंदे ! ( रागानें किंवा तिरस्कारानें काढलेला उद्गार ). जळोजळो तयाचा जप । व्यर्थ काय कोरडा प्रताप । नजळणें - आगीनेसुध्दां जळण्यासारखें नसणें ; अतिशय समृध्द भरपूर असणें ( पीक , पैसा , मालमत्ता ). म्ह० १ जळत घर भाडयानें कोण घेतो . २ कोरडयाबरोबर ओलें जळतें . ३ जळत भाकर खावी पळत हाटांत जावें = अतिशय जरूरीच्या वेळीं होईल तितकी घाई करणें . Rate this meaning Thank you! 👍 जळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जळत खांब खांद्यावर घेणें (ल.) दुसर्याचे बिनफायद्याचे काम अंगावर घेणें विकत श्राद्ध घेणें लष्कराच्या भाकरी भाजणें नसते विघ्न घरात आणणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP