|
पु. १ दीप ; तेल व वात यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन ; अलीकडे वीज , धूर यांच्या साहाय्यानेहि हे प्रकाश साधन होते . २ दिवली अर्थ २ पहा . टांगण्याचा दिवा , लांबणदिवा , ओलाणदिवा . हे दिव्याचे आकारावरुन प्रकार पडतात . ३ लग्नांतील कणकेचा केलेला दीप . ४ वैशाख महिन्यांतील अश्विनी आदि करुन पांच नक्षत्रांनी युक्त असे दिवस ( दिवेपंचक ). ५ दिवसे पहा . ६ ( ल . ) मूर्ख ; अज्ञानी . [ सं . दीप , दीपक ; प्रा . दीवओ , अप . दीवड ; हिं . बं दिया ; पं . दीवा सिं . डिओ ] क्रि.वि. दिवसां ; उजेडी . दिवा लग्न , दिवा मुहूर्त . [ सं . ] ०लागत - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ). ०लागत - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ). ०कीर्ति पु. १ ( ल . ) न्हावी ; नापित . २ खालच्या वर्गाचा माणूस ; ज्याचे नांव रात्री घेऊ नये असा . दिवांध पु . घुबड ; दिवाभीत मनुष्य . न पाहती जाले दिवांध । - यथादी १ . ९० . नाही - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ). नाही - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ). ०लावणे वाईट कृत्यांनी प्रसिद्धीस येणे ; अपकीर्ति करणे . ०सरसा करणे - वात पुढे सारणे किंव तिचा कोळी झाडणे . ( वाप्र . ) दिवे ओवाळणे - ( उप . ) कुचकिमतीचा समजणे ; क्षुद्र लेखणे ; तिरस्कार दाखविणे . अहाहा ! दिवे ओवाळावे त्या प्रीतीवर . - त्राटिका . दिव्याने दिवस काढणे - उजेडणे - रात्रभर जागणे . दिव्याने रात्र , दिवस काढणे - लोटणे - रात्र जागून काढणे ; अतिशय आजारी असणे . दिव्यावातीने शोधणे - प्रत्येक कानाकोपरा बारकाईने शोधणे . दिव्यास निरोप - पदर - फूल - देणे - दिवा मालविणे . म्ह ० १ घरांत दिवा तर देवळांत दिवा = आधी पोटोबा मग विठोबा या अर्थी . २ दिव्याखाली अंधार = प्रत्येक चांगल्यागोष्टीत कांही तरी दोष असतो या अर्थी . सामाशब्द - दिवारात्री - क्रिवि . ( काव्य ) अहोरात्र . दिवालावू - लाव्या - वि . ( ल . ) कुप्रसिद्ध ; ज्याच्याबद्दल फार बोभाटा झाला आहे असा . ( साधित शब्द ) दिवे , दिवेपंचक - पु . दिवा अर्थ ४ पहा . [ दिवा ] दिवेओवाळ्या - ळा - वि . दिवे ओवाळण्यास योग्य ; मूर्ख ; दिवटा . दिवेल - न . २ दिव्यांतील तेल . २ ( गु . ) एरंडीचे तेल ; एरंडेल . पूर्वी एरंड्ल दिव्यांना वापरीत . दिवेलागण , दिवेलावण , दिवेलागणी - स्त्री . १ दिवे लागण्याची , संध्याकाळची वेळ . २ दिवे लावणे ; उजेड करणे ; प्रकाश पाडणे . महामोह सांजवेळेचा वेळी । प्रबोधाची दिवेलावनी केली । - शिशु ६ . दिवे लवणी - स्त्री . ( ल . ) उजाड ; प्रांतात , गांवांत वस्ती करणे ; गांव वसविणे . दिवे लावणीच कौल - उजाड प्रांतांत , गांवांत वस्ती करतांना काही काळपर्यंत कर वसूल न करण्याबद्दलचे सरकारी आज्ञापत्र , हमी , कौल . दिवेलावणे - न . ( तांब्याचा ) लहान दिवा . दिवे सलामी - स्त्री . दिवटीजोहार पहा . संध्याकाळी , दिवे लावणीच्या वेळी बारगीर , मानकरी इ० लोक राजादिकंस जो मुजरा करतात तो . दिवेसळई - सळी - स्त्री . गंधक लावलेली तागाची काडी ; आगकाडी . दिवसलई पहा . दिव्या उजेडी - ज्योती - क्रिवि . दिव्याच्या उजेडाने . दिव्या उजेडीचा - वि . दिव्याचा उजेड असल्यावेळचा . दिव्याची आंवस - अमावस्या - स्त्री . आषाढी अमावस्या . या दिवशी दिव्यांची पूजा करतात . व दिव्याच्या आकाराचे पक्वान्न करुन नैवेद्य दाखवितात व खातात .
|