Dictionaries | References

खोंच

   
Script: Devanagari
See also:  खोच

खोंच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also an insinuation or innuendo.
Of low price, cheap.

खोंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A dint; a notch. A loss. Offence.
  Of low price.

खोंच     

 स्त्री. १ ठोका ; घाव ; खोंक ; बोंच . २ खंड ; खांच . ३ पुढें आलेलें टोंक ; कांटा ; अणकुची ; खोचाटा . ४ ( ल .) व्यापारांतील तोटा ; नुकसान ; धक्का ; ५ रोष ; असंतोष . ' मज विषयीं त्याचें मनांत खोंच आली .' ६ गाण्यांतील स्वरभेद खुबी . ' त्या ख्यालामध्यें त्यानें दहा खोंची घेतल्या ' ७ खुबी ; मर्म ; तात्पर्य , रस ( गोष्ट , बनाव , प्रसंग , भाषण यांतील ). ' त्याच्या बोलण्याची खोंच माझ्या लक्षांत आली .' ८ व्यंगोक्ति ; व्यजोक्ति ; उपरोध . ९ बाणांचा टप्पा . पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभे राहिले . - इमं २८९ . ( सं . कुच ) वाप्र .
वि.  ( नंदभाषा ) हलक्या किंमतीचा ; स्वस्त .
 स्त्री. लाठी फरीगदगा , भाला , पट्टा वगैरे मध्यें पुढेंक टोंचण्याकरितां प्रतिपक्षावर करावयाचा वार ; आणी . - व्याज्ञा ४ . ४५९ . ( खोंचणें )
०मारणें   मर्मभेदक टीका करणें . ' मोठ्यामोठ्या इंग्रेजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत कीती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच ' ०नि ९ . सामशब्द -
०कील वि.  संकुचित ; अडचणीचें ; कोंदट .
०खांच  स्त्री. खांचखोंच ( वर्णव्यत्यास ) पहा .

खोंच     

खोंच मारणें
मर्मभेदक टीका करणें. ‘मोठमोठ्या इंग्रजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हे ठाऊक असेलच.’-नि ९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP