Dictionaries | References क कीर्ती Script: Devanagari See also: कीर्ति Meaning Related Words कीर्ती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ख्याती , नाव , नावलौकिक , प्रतिष्ठा , प्रसिद्धी , लौकिक . कीर्ती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : यश कीर्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लौकिक ; ख्याति ; उत्तम प्रसिद्धि ; नांव . ' हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि परत्रिकासि अपभ्रंशु । ' - ज्ञा २ . २० . ' कीर्ति प्रगतली दूरच्या दूर । प्रतिष्ठा थोर वाढली । ( सं . कृत - वर्णन करणें ) कीर्तित - वि . प्रख्यांत ; विख्यांत ; वाखाणलेला ; प्रशंसिलेला . ( सं .) कीर्तिमान् - वान - वंत - वि . प्रख्यात ; विख्यात ( सं .)०मुख १ देवळांच्या उंबरठ्यावर , दोन शिंगे असलेल्या राक्षसाचेम कोरलेलें मस्तक , प्रथम याचें दर्शन घेऊन मग देवळांत जाण्याची रीत आहे . ' तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । ' - ज्ञा १५ . ५२६ . २ वरील आकाराचा दंडावर बांधावयाचा एक दागिना , अलंकार ' बाहुदंडी कीर्तिमुखें । हस्तकंकणें दिव्य सुरेखें । ' - ह ३ . १६२ .०स्तंभ पु. जय वगैरे मिळाल्यावर त्याच्या स्मरणार्थ बांधलेला मनोरा . ' मदनाचे कीर्तास्तंभ पाण्हैले । ' - शिशु ६१७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP