|
वि. इतका मोठा ; इतक्या आकाराचा , परिमाणाचा . इतका पहा . ( एवढा , जेवढा , तेवढा , केवढा , वगैरे शब्दांचा वर्ग आणि इतका , जितका , तितका , कितका वगैरे शब्दांचा वर्ग यांत फरक असा कीं पहिला आकार , गुण , परिमाण दाखवितो , तर दुसरा संख्यापरिमाण दर्शवितो . तथापि बोलण्यांत इतर शब्दांप्रमाणें या संबंधांतहि शैथिल्यानें हा भेद पाळला जात नाही . ) ( वाप्र . ) एवढ्याचें एवढें करुन सांगणें = फुगवून , तिखटमीठ लावून सांगणें . एवढ्यानदां = इतक्या मोठ्यानें , जोरानें किंवा मोठा आवाज करुन ; दणदिशी . [ सं . इयत ; प्रा . एवड ; सिं . उहडो ] ०वळ वेळ - क्रिवि . हा वेळ पावेतों ; हा सारा वेळ ; इतक्या उशीरां . [ एवढा + वेळ ]
|