|
न. विधिपूर्वक धर्मकृत्य , कर्म यांचें आचरण . म्ह० यथा अनुष्ठान तथा सिध्दि . म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहींच नाहीं । - ज्ञा ३ . ८३ . देवाप्रीत्यर्थ अभिषेक , पूजा , पाठ , होम , हवन , दानधर्म वगैरे कर्म . ( ल . ) मोठ्या परिश्रमाचें काम ; महत्कार्य , अवघड कृत्य . ( सामान्यत : ) संपादणी ; आचरण ; करणें ; पार पाडणें . ( क्रि० करणें , चालविणें , बजावणें , मांडणें ). ०पध्दति स्त्री. ( ख्री . ) धार्मिक विधि यथासांग करण्याची पध्दति . ( इं . ) आर्डर ऑफ अँडमिनिस्ट्रेशन . प्रभूचें भोजन म्हणजे पवित्र सहभागिता इची अनुष्ठान पध्दति . । - साप्रा ९० . ९८ . १०५ . १२४ . ०प्रसंग पु. अनुष्ठानकर्म . या गांवांत कोणाच्याहि घरीं अनुष्ठानप्रसंग झाला असतां दीक्षितांस आमंत्रण येतें [ अनु + स्था ]
|