Dictionaries | References

नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा

   
Script: Devanagari

नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा

   वास्तविक जीनघोडा मोलाच्या जिनसा व नाल अगदींच थोडया किंमतीचा व सहज मिळणार. पण या म्हणींत उलट नाल तर मिळाला आतां काय जीनघोडा सहज मिळवूं असें म्हटलें आहे. बिन किमतीच्या वस्तूला महत्त्व देतो पण मौल्यवान वस्तूला महत्त्वाची समजत नाहीं असा प्रकार घडल्यास ही म्हण लावतात. ‘आम्हाला न्घर बांधावयाचं आहे. त्यासाठीं आज लांकडें तर घेतलीं. आतां पैसा, जागा, माल मसाला, याची सोय झाली कीं घर तयार.’ ‘वा! तुम्ही तर कमाल केली. कशास कांहीं ठिकाण नाहीं नी म्हणता कीं घर तयार, नाल तो मील गया इ० प्रमाणें गत झाली.’"

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP