Dictionaries | References ध धावणे Script: Devanagari See also: धांवणे Meaning Related Words धावणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. धूम ठोकणे , पलायन करणे , पळणे . धावणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb अतिशय वेगाने चालणे Ex. आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला CAUSATIVE:पळवणे HYPERNYMY:चालणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:पळणेWordnet:asmদৌৰা gujદોડવું hinदौड़ना kanಓಡು kasدورُن kokधांवप malഓടുക nepकुद्नु tamவேகமாகஓடு telపరిగెత్తు urdدوڑنا , بھاگنا , لپکنا , جھپٹنا , اچکنا verb एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे Ex. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:पळणेWordnet:benতত্পর হওয়া gujદોડ લગાવવી kanವೇಗವಾಗಿ ಸಾಗು malവളരെ വേഗംപ്രവർത്തിക്കുക oriଦୌଡ଼ ଲଗାଇବା panਦੌੜ ਲਗਾਉਣਾ tamஓடிக்கொண்டிரு telకృషిచేయు urdجدوجہدکرنا , کوشش کرنا , سعی کرنا , دوڑلگانا See : चालणे, धावण्याची स्पर्धा, धावपळ करणे धावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ अतिशय वेगाने चालणे ; पळणे ; २ रक्षण करण्यास , मदतीस जाणे ; धांवून येणे . वधिला कर्ण , समक्षचि कोण्हीही धांवले न तन्मरणी । - मोकर्ण ४५ . २१ . [ सं . धावन ]१ धरण्यासाठी किंवा रक्षणासाठी पाठलाग करणारी फौज , लोक . रक्षण करण्यासाठी , मदतीसाठी धांवणारा , शिपाई , दूत ; रक्षक . ( क्रि० लावणे , धाडणे ) की चोरी मारितां अरण्यांत । एकाएकी धांवणे धांवत । त्याच्या सुखासी नाही अंत । - ह ११ . १७४ . २ धांवा ; मदतीकरितां विनंति ; प्रार्थना . परते सारुन वैभव । भक्तांच्या धांवण्या धांवे देव । कै कृपा करसी नेणे मज धावणे । ३ स्वारी ; दौड ; मोहीम , सवेचि मागधे धांवणे केले । मथुरेवरी पूर्ववत । - ह २२ . १२९ . ४ गति ; धांव . पै द्विजसेवेपरौते । धांवणे नाही शूद्राते । - ज्ञा १८ . ८८४ . ५ रक्षण ; मदतीसाठी धांवणे ; पाठलाग . सुभद्रा हरुनि नेली पार्थे । वेगी निघा धावणीयाते । - मुआदि ४७ . १०५ . तया वेळी नाही केले कुणी धांवणे . ०स्त्रीगीत . [ सं . धाव - धावन ] धावण्यास येणे - पोहोचणे - पावणे - धावणे - १ साह्य करण्यास धांवत जाणे ; एकदम सरसावणे ; पुढे येणे . धांवधांव धांवण्यास म्हणती विनवुन सांबाला । - ऐपो ३०७ . २ पळणारास गांठणे , धरण्यासाठी मागे लागणे .०धुपणे अक्रि . १ धावण्याचे श्रम सोसणे . २ गर्दीने , घाईने धांवत जाणे ; निष्फळ हेलपाटे मारणे . धावणीधुवणी पहा . [ म . धावणे . द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP