Dictionaries | References

दुर्योधन कृष्णाच्या उशाशीं, आणि अर्जुन बसे पायापाशीं

   
Script: Devanagari

दुर्योधन कृष्णाच्या उशाशीं, आणि अर्जुन बसे पायापाशीं     

कौरवपांडवांचें युद्ध होण्याचें निश्चित झाल्यावर दुर्योधन व अर्जुन हे दोघेहि क्रुष्णाकडे त्याचें साहाय्य मागावयास गेले. त्या वेळीं दुर्योधन प्रथन गेला तेव्हां कृष्ण पलंगावर निजला होता. याकरितां तो त्याचेजवळ पण ऐटीनें उशाच्या बाजूला बसला. अर्जुन नंतर आला पण तो नम्रपणें त्याच्या पायथ्याशीं बसला. त्यामुळें कृष्ण उठल्यावर त्यास प्रथम अर्जुन दिसला व नंतर दुर्योधन दिसला. त्यामुळें अर्जुनाचें मागणें त्यानें त्यास प्रथम दिलें व नंतर दुर्योधनाचें म्हणणें ऐकलें. यांत अर्जुनानें पायांशीं बसण्यांत लीनता दाखविली व दुर्योधनानें पायाशीं न बसतां उशाशीं बसण्यांत आढयता दाखविली. यामुळें अर्जुनाचें काम चांगलें झालें तसें दुर्योधनाचें झालें नाहीं. याकरितां मनुष्यानें उद्धतपणाऐवजीं नम्रता धारण केल्यानें त्याचें हित होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP