|
स्त्री. हरणवेल ; जीवंत ; जीवन ; जीवा ; मधुश्रवा ; एक वनस्पती . - मसाप ४५ . ४ . स्त्री. १ तोड ; युक्ति . डागदार बघती नाडी दवा देती तोडी चालवी जरी बाधा नाही जडली । - ऐपो ४३७ . २ ( गो . ) पानाचा , फळाचा देंठ . उदा० दोडक्याची तोडी . [ तोडणे ] स्त्री. मोठया पोटाची व लहान तोंडाची बांबूची करंडी - बदलापूर १३३ . स्त्री. ( संगीत ) एक राग . ह्या रांगांत षड्ज , कोमल , ऋषभ , कोमल गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत व तीव्र निषाद हे स्वर लागतात . वादी धैवत , संवादी गांधार . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर . ह्याचे गुजरी तोडी विलासखानी तोडी ; बहादुरी तोडी इ० प्रकार आहेत . महादेव कविराज पुण्यामध्ये रहाती । त्याचे छंद ऐकोनी गुणीजन गाती । बदलुन अंतरी मग उलटे वाहती । तोडीमधे छानपछान करती । - सला ४ . [ सं . त्रोटकी ; प्रा . तोडइ ] स्त्री. ( तंजावरी ) लहान घागर ; कळशी . [ ता . तोंडी , तोंडु = शेंदणे ] ०थाट पु. ( संगीत ) एका थाटाचे नांव . ह्या थाटांत शुद्ध षड्ज , कोमल ऋषभ , कोमल गांधार , तीव्र मध्यम , शुद्ध पंचम , कोमल धैवत व शुद्ध निषाद असे सात स्वर असतात . [ तोडी + थाट ]
|