Dictionaries | References

ठाय

   
Script: Devanagari

ठाय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, adagio. 4 m R A common term for the two products of a cow after calving--the पेजें & the जावपें the calf and the milk.
Ex. अपेश आलें दो ठायीं ॥ म्हणोनि जीवीं झुरतसे ॥.

ठाय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A place.
ठायीं घालणें   To give a place to, to set, lay, or hold fixedly.
ठायीं ठायीं   Here and there.
ठायीं पडणें   (Poetry.) To be discovered. To agree with; to be salutary or suitable to.

ठाय     

 पु. १ ठाव ; ठिकाण ; स्थान ; आश्रय ; आसन . २ अन्न वाढवण्यासाठीं ठेवलेलें पान , पत्रावळ यावरून . ३ ( ल ) जेवण्याचें ताट ; भोजनपात्र ; पत्रावळ . - स्त्री . ४ ( वादन ) मंदताल ( ध्रुपद म्हणतांना , पखवाज वाजवितांना ) सावकाश वाजविण्याचा किंवा म्हणण्याचा प्रकार ; विलंबित ; मध्यलयीच्या एका आवर्तनास लागणारा वेळ . ५ ( राजा . ) व्यालेल्या गाईचें दूध व वासरूं या दोहोस म्हणतात . पेजें ( दूध ) व जावपें ( वासरूं ). ६ प्रकार . - शर . ७ गुरें ; भांडीं इ० मोजतांना संख्यादर्शक म्हणून हें क्रियाविशेषण लावितात . उदा० दोन ठाय , तीन ठाय . [ सं . स्थान ] ठायीं घालणें - ठिकाणीं नेमणें ; ठेवणें ; कायमचें धरणें . नको माझे कांहीं । गुणदोष घालूं ठायीं । ठायीं करणें - सिध्द करणें . आत्मा अविकारी पाही । येणें निरूपणें केलें ठायीं । - एभा २८ . ४९६ . ठायीं ठायीं - ठिकठिकाणीं ; जिकडे तिकडे . ठायीं पडणें - १ पत्ता लागणें ; सांपडणें ; आढळणें ; उघडकीस येणें . ठायीं न पडे कै गेली । - मुरंशु ३३३ . २ मेळ असणें ; यथायोग्य मणें ; अनुकूल होणें ; स्वभाव जमणें . औषध ठाई पडिलें देव पडना . ठायींचा - वि . मूळचा . ठायक - वि . ( व . ) नेमका . तेथें ठायक जा .
०चूक वि.  १ चुकलेला ; भलत्याजागीं ठेवलेला ; भलताचे ; विपरीत . २ हरवलेली वस्तु कोठें ठेविली त्याचें भान नसणारा अथवा ती वस्तु . ३ स्वत : स भटक्या समजणारा .
०ठिकाण   ठिकाणा - नपु . जागाजुगा ; घरदार ; वसति .
०ठिकें वि.  स्थिर ; दृढ . तेथ राहोनि ठायठिकें । - ज्ञा १० . ७४ .
०दुगण   दुगन दुगूण दुगून - स्त्री . ध्रुपद इ० सावकाश म्हणण्याचा ते ध्रपद इ० दोन वळ म्हणणें किंवा मृदंगादि वाजविणें .
०पालट  पु. राहत घर बदलणें ; थारेपालट .
०बसल्या   क्रिवि . बसल्या बसल्या ; बसल्याजागीं ; घरबसल्या ; एके ठिकाणीं बसून ; आरामशीर ( चाकरी , रोजगार , धंदा , व्यापार , पगार , दरमहा , जेवण , गुजराण इ० शब्दाबरोबर योजतात ).
०वरी   क्रिवि . येथपर्यंत . कर्मी हा ठायवरी । - ज्ञा १८ . ६८ . ठायींठाव , ठायेठाव , ठायेंठाव - अ . जेथल्यातेथें ; नेमका . त ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं । - ज्ञा ६ . २०४ . पूर्ण . तैं ठायेठावो विळुचि होये । - ज्ञा ८ . १५६ . जसा हवा तसा . तेव्हां ये वासनागर्भे । ठायेठावो । - ज्ञा १४ . ९४ . ठायेंठिकें - अ . ठाकठीक .

ठाय     

ठायी करणें
सिद्ध करणें
तयार करणें
उपयुक्त करणें
प्रवृत्त करणें
योग्‍य करणें. ‘आत्‍मा अधिकारी पाही। येणें निरूपणें केलें ठायी।’ -एभा २८.४९६.

Related Words

ठाय   मनांत ठाय आस जाल्यार मचव्यांतून ठाय आसे   दे माय! धरणी ठाय   जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय   ज्याचा जो व्यापार तो त्यांनींच करावा   एकेठंय   डोंड   थाउ   एकठय   एकठावण   एकठे   ठावकां   ठावकें   ठावलां   ठावलें   उपाध्येपणाचें कान ब्राह्मणाला, लढाईचे काम क्षत्रियाला   ठायदुगण   ठायदुगन   घाउस   घाऊस   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   लांडगेतोड चालविणें   वलाठी   अठायीं   खालाट   खालाटी   खालाठी   प्रोष्ठ   ठावका   वलाटी   अनाठायीं   एकठांय   वलाट   ठाव   उपणणें   त्राहित्राहि   था   धरणी   संसर   मध   मूत   देणे   रास   गुरु   दुर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP