Dictionaries | References
त्र

त्राहित्राहि

   
Script: Devanagari

त्राहित्राहि     

उद्गा . रक्षण कर ! रक्ष ! रक्ष ! या अर्थाचे भ्यालेल्याचे उद्गार . त्राहे त्राहे ; त्राय त्राय ; त्राह्य त्राह्य अशीहि या शब्दाची अपभ्रष्ट रुपे रुढ आहेत . नंद - नंदना त्राहित्राहि मजसी । सुसु १९ . [ सं . त्रा = रक्षण करणे या धातूचे आज्ञार्थाचे द्वितीयपुरुषी एकवचन , द्वि . ]
०त्रासणे   अक्रि . अतिशय कंटाळणे ; जिकीरीस येणे ; त्रस्त होणे ; बेजार होणे ; जर्जर होणे . त्राहि भगवान उद्गा . परमेश्वरा ! या संकटांतून सोडीव माझे रक्षण कर ! या अर्थाचे भ्यायलेल्याचे उद्गार . [ सं . त्राही = रक्षण कर + भगवान = ईश्वरा ] त्राहि भगवन करणे , करुन सोडणे ( एखाद्यास ) त्याच्या तोंडून . ईश्वरा , मला या त्रासातून - संकटातून सोडीव . असे उद्गार निघण्याइतके सतावून , त्रासवून सोडणे ; जर्जर करणे . दे माय धरणी ठाय करुन सोडणे . त्राहेत्राहे उद्गा . त्राहित्राहि पहा . म्हणे भरत हा राम । त्राहे त्राहे मेघश्याम । - वामन भरतभाव २६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP