Dictionaries | References

घरचा वैरी लंका ढाळें

   
Script: Devanagari

घरचा वैरी लंका ढाळें

   रामायणातील राम-बिभीषण-मैत्रीची कथा सार्‍यांना माहितच आहे. बिभीषण रावणाचा बंधु. पण रावणाच्या करणीची त्‍याला चीड आली. व तो रामचंद्राला जाऊन मिळाला. त्‍याने रामाला लंकेसारख्या दुर्भेद्य राष्‍ट्राचा भेद सांगितला, एवढेच नव्हे तर कालांतराने रामाचा विजय झाल्‍यावर त्‍याला व त्‍याच्या सैन्याला लंकेतील संपत्तिहि दिली. यावरून ही म्‍हण प्रचारात आली. घरभेदी माणसाला किंवा घरच्या लोकांवर उलटून परकीयांना साहाय्य करणार्‍या व्यक्तीला उद्देशून ही म्‍हण योजितात. पाठभेद घरभेदी लंकादहन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP