Dictionaries | References ग गोकर्ण केलश्या बोड Script: Devanagari Meaning Related Words गोकर्ण केलश्या बोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) गोकर्णक्षेत्रीच्या न्हाव्याने केलेले क्षौर. असे सांगतात की, गोकर्णातले न्हावी यात्रेकरू क्षौर करायला आले की त्यांच्या डोक्याचा एकेक पाट काढून ठेवीत. एकाने डोक्याला वस्तरा लावून ठेवलेला असला, की दुसर्या न्हाव्यानें त्याची हजामत करावयाची नाही, हा न्हावी लोकांतला अलिखित कायदा असल्यामुळे जेवढ्याचे म्हणून पाट काढले असतील तेवढ्या सगळ्या यात्रेकरूंना त्याच न्हाव्याजवळ तिष्ठत बसावे लागे. एखाद्याने कोणतेहि काम अर्धवट करून सोडून दिले की त्याबद्दल वरील म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP