Dictionaries | References

बोड

   
Script: Devanagari
See also:  बोडकें , बोडसें

बोड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बुद्द

बोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To humble, to take the conceit or shine out of.

बोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A contemptuous term for the head.

बोड     

 न. ( कुत्सितार्थी ) डोकें ; टकलें ; टाळकें ; डोचकें ; डोसकें ; टकुरें ; बोडकें . [ सं . बुध्न ; का . बोठ्ठ ; तेलगु . बोळी , बोडी = हजामत केलेलें डोकें ] बोड करणें -
हजामत करणें .
खोड मोडणें ; नरम करणें . बोडका - वि .
डोक्यास कांहीं एक न घातलेला ; उघड्या डोक्याचा .
डोकीवरील केंस काढलेला . डोई बोडका शिखा नष्ट । - नव . १८ . ३३ .
ज्या योगानें एखाद्या पदार्थाच्या शिरोभागीं शोभा येतें तें नसलेला ; शेंड्यावर , शिखरावर , डोक्यावर कांहीं नसलेला . उदा० शेंड्यावांचून झाड ; शिंगावांचून गाय ; बोटाशिवाय हात , पाय ; डोक्यावर केंस नसलेली स्त्री ; झाडाशिवाय टेकडी ; छप्पर नसलेलें घर इ० ; त्याप्रमाणें ज्याची बायको मेली आहे असा ; विधुर . [ सं . बुध्न ; का . बोट्ट ] म्ह० हातीं धरल्यास रोडका , शेंडी धरल्यास बोडका .
०कांदा  पु. पाती नसलेला कांदा . याच्या उलट पातीचा कांदा .
०देवी  स्त्री. विधवा स्त्री .
०निवडुंग  पु. निवडुंगाच्या अनेक जातींपैकीं एक जात . बोडकाविणें सक्रि .
झाड इ० च्या फांद्या तोडून नुसता खुंट उभा ठेवणें ; झाड भुंडें करणें ; छाटणें .
सर्वस्वी लुटणें ; नागविणें .
हजामत करणें . बोडकी - स्त्री . केशवपन केलेली स्त्री ; विधवा स्त्री . म्ह० बोडकी आरशांत पाहे , सहदेव म्हणे कांहीं तरी आहे . बोडकूल , बोडकें - न .
( निंदार्थी ) डोचकें .
बोडकी . बोडकें भात , बोडका - नपु . एक प्रकारचें भात ; कोथिंबिरें भात बोडणें - सक्रि .
( निंयेदें ) हजामत करणें ; मुंडणें ; वपन करणें .
शेंडा छाटणें ; भुंडा करणें .
बुचाडणें ; नागविणें ; लुटणें .
खरडपट्टी काढणें ; भोसडणें ; फजीती करणें . सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनिया सोडी । - तुगा २८१९ . [ का . बोडिसु ] बोडणी - स्त्री .
हजामत .
लूट ; नागवण .
खरडपट्टी ; ताशेरा . झाली बोडणी विटंबना । - तुगा ७३० . बोडंती - स्त्री . बोडणी . बोडभद्र - न . ( गो . ) भद्राकारण ; हजामत . बोडविसुळणी - स्त्री . बोडणी . बोडसा , सें - पुन . ( निंदार्थी ) डोचकें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP