Dictionaries | References

२८

   { अठ्ठावीस }
Script: Devanagari

२८     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अठाईस, अठाईस

२८     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अठ्ठावीस, अठ्ठावीस, अठ्ठावीस

२८     

Sanket Kosh | Marathi  Marathi
अठ्ठावीस नक्षत्राधिपति   
१ दस्त्र (अश्चिनीकुमार), २ यम, ३ अग्नि, ४ ब्रह्मा, ५ चंद्र, ६ शिव, ७ अदिति, ८ गुर, ९ सर्प, १० पितर, ११ मग, १२ अर्यमा, १३ सूर्य, १४ विश्वकर्मा, १५ वायु, १६ अग्नि, १७ मित्र, १८ इंद्र, १९ राक्षस, २० जल, २१ विश्वेदेव, २२ विष्णु, २३ वसु, २४ वरुण २५ अजैकपाद, २६ अहिर्बुघ्न्य आणि २८ पूषा, हे अठ्ठवीस नक्षत्रांचे अधिपति होत.
अठ्ठावीस योगेश्वर   
१ श्वेत, २ सुतार, ३ मदन, ४ सुहोत्र, ५ कंकण, ६ लोगाक्षि, ७ जैगीषव्य, ८ दधिवादन, ९ ऋषभ, १० मुनि, ११ उग्र, १२ अत्रि, १३ सुबलाक, १४ गौतम, १५ वेदशीर्ष, १६ गोकर्ण, १७ गुप्तपासी, १८ शिखंडमृत, १९ जटामाली, २० अट्टाहास, २१ दारुक, २२ लांगली, २३ महाकाय मुनि, २४ शूली, २५ मुंडिश्वर, २६ सहिष्णु, २७ सोमशर्मा आणि २८ नकुलीश.
सहिष्णुः सोमशर्मा च नकुलीश्वर एव च।
अष्टाविंशतिसंख्याका योगाचार्या युगक्रमात् ॥ ([शिवमहापुराण वायवीय संहिता])
अठ्ठावीस व्यास   
१ ब्रह्मदेव, २ मनु, ३ उशना, ४ वृहस्पति, ५ सूर्य, ६ मृत्यु, ७ इन्द्र, ८ वसिष्ठ, ९ सारस्वत, १० त्रिधामा, ११ त्रिवृषा, १२ भरद्वाज, १३ अन्तरिक्ष, १४ वप्री, १५ त्रय्यारुण, १६ धनंजय, १७ कृतञ्जय, १८ क्रणज्य, १९ भारद्वाज, २० गौतम, २१ उत्तम (हर्यात्मा), २२ वेनराजस्त्रव, २३ तृणबिंदु, २४ भार्गवऋक्ष, २५ शक्ति, २६ पराशर, २७ जातुकर्ण व २८ कृष्णद्वैपायन. असे अठ्ठावीस व्यास होऊन गेले.
अष्टविंशतिरित्येते वेदव्यासाः पुरातनाः। ([विष्णु अंश ३ अ. ३])
अठ्ठावीस शुभाशुभ योग   
१ आनंद, २ कालदंड, ३ धूम्र, ४ धाता, ५ सौम्य, ६ ध्वांक्ष, ७ ध्वज, ८ श्रीवत्स, ९ वज्र, १० मुद्गर, ११ छत्र, १२ मित्र, १३ मानस, १४ परम, १५ लंबक, १६ उत्पात, १७ मृत्यु, १८ कोण, १९ सिद्धि, २० शुभ, २१ अमृत, २२ मुसल, २३ गद, २४ मातंग (कुंजर) २५ राक्षस, २६ चर, २७ स्थिर आणि २८ वर्धमान.
"स्थिरः प्रवर्धमानश्च योगाष्टाविंशतिक्रमात"([ज्योतिष])
अठ्ठावीस शैवागम   
श्रीशिवाच्या पांच मुखापासून आविर्भूत झालेले शैवधर्माचे सिद्धांतग्रंथ, यांस शैवागम म्हणतात, ते असे -
१ सद्योजात - १ कायिक, २ योगज, ३ चिन्त्य, ४ कारण व ५ अजित.
२ वामदेव - ६ दीप्त, ७ सूक्ष्म, ८ सहस्त्र, ९ अंशुमान् व १० सुप्रमेद,
३अघोर - ११ विजय, १२ निःश्वास, १३ स्वायम्भुव, १४ अनंत व १५ वीर.
४ तत्पुरुष - १६ रौरव, १७ मुगुट, १८ विमल, १९ चन्द्रज्ञान, २० बिम्ब, व
५ ईशान - २१ प्रोद्नीत, २२ ललित, २३ सिद्ध, २४ सन्तान, २५ सर्वोत्तर, २६ परमेश्वर, २७ किरण आणि २८ बातुल.
([भारतीय वास्तुशास्त्र प्रतिमा - विज्ञान])
अठ्ठावीस साधूचीं लक्षणें   
१ दयालुत्व, २ अद्रोह, ३ तितिक्षा (सहनशीलता), ४ सत्य, ५ अनघ (पवित्र), ६ समबुद्धि, ७ परोपकार, ८ अकामता, ९ बाह्मेंद्रियनिग्रह, १० कनवाळुपणा, ११ स्वकर्माचरण, १२ अकिंचनता, १३ निरिच्छ, १४ मितभोजन, १५ शांति, १६ स्थिरता, १७ परमेश्वराला शरण जाणें, १८ मननशीलता, १९ सावधानता, २० गांभीर्य, २१ धैर्य, २२ षड्‌‍विकारांवर जय, २३ निरभिमानता. २४ प्राणिमात्राविषयीं सद्‌‍भाव, २५ परबोधकता, २६ निष्कपटता २७ कारुणिकता आणि २८ वेदशास्त्ररहस्यांचें ज्ञान.
कवि या पदाचे व्याख्यानें। झाली अठ्ठावीस लक्षणें।
उरलीं जे अति गहनें। तें दो श्लोकी कृष्णें आदरिलें सांगो ॥ ([ए. भा. ११-१०५०])

२८     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अट्ठाइस, अट्ठाइस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP