Dictionaries | References अं अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं Script: Devanagari Meaning Related Words अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व) (अ) अंगावर सोन्याचे अलंकार घालणें मोठें जोंखमीचें काम आहे. ते अलंकार संभाळण्यासाठी भयंकर चिंता वाहावी लागते व तकलीफ सहन करावी लागते. अंगाला दोनं म्ह. जळतीं लांकडें अथवा अग्नि लागल्यापासून जितकी तकलीफ होते तितकी सोन्याच्या दागिन्यापासून होतें. (आ) बायकोच्या अंगावर खूप सोन्याचे दागिने घातले आहेत पण तिला एकसारखा छळ सहन करावा ला़गतो आहे, तर त्या अंगावर सोनें घालण्याचा तिला काय उपयोग? अंगाला ढोणं लावणें म्हणजे जाळणें. विस्तव लावणें.“ मुलीला सासर श्रीमंत सांपडलें खरंदागदागिने लागतील तेवढे आहेत, पण सासुखास भयंकर आहे. काय करतां श्रीमंती? अंगावर घातलं सोनं नी अंगाला लावलं ढोणं! एकपरी गरीबी बरी!” Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP