|
स्त्री. १ प्रकार ; भेद ; जात . लढाई खूब तर्हेने जाली . - रा १० . १९२ . २ रीत ; पद्धति ; मार्ग . आमची पल्ल्याची तर्हे आपण कहाडतील , ती कांही दिसोन आली नाही . - रा १२ . १३५ . ३ ( ल . ) परिणाम ; शेवट . पण त्या दोघांच्या दोन तर्हा झाल्या . - इंप ५८ . [ अर . तर्ह ] ( वाप्र . ) तरतर्हा - तर्हातर्हा करणे - १ मनस्वी चेष्टा , चाळे , ढंग करणे . २ ( कर्माची षष्टी ) ( एखाद्यास ) अनेक प्रकारांनी छळणे , त्रास देणे ; ( एखाद्याची ) कुचेष्टा करणे . तर्हेस - तर्ही भरणे , तर्हेस पेटणे - भलत्याच गोष्टीच्या नादी लागणे ; हट्टास पेटणे ; हट्टाची लहार येणे . तर्हेभरोंच नये । सुचावे नाना उपाये । - दा ११ . ५ . ११ . हे पोर एकदां तर्ही भरले म्हणजे कोण्हाचे ऐकत नाही . तर्हेस जाणे - विक्षिप्त , चमत्कारिक बनणे ; स्वैरपणाने , विलक्षण रीतीने , स्वतःच्या लहरीने वागणे . - तर्हेस - तर्हे देणे - ( एखाद्यास ) बेफामपणाने , उच्छृंखलपणाने , स्वैरपणाने , चमत्कारिक रीतीने वागण्यास प्रवृत्त करणे . सामाशब्द - ०तर्ही वि. नाना तर्हेचा ; विविध ; निरनिराळ्या प्रकारांचा . वीस पंचवीस तोफानी तर्हातर्ही येणेप्रमाणे नबाबाने पाठवावे . - ख ८७५ . [ तर्हा द्वि . ] तर्हेचा , तरतर्हेचा , तर्हेदार वि . १ अपूर्व ; विलक्षण ; नव्या ; विशेष प्रकारचा ; नवलाईचा . हातांत जर्मनसिल्व्हरच्या झांकणाची तर्हेदार दौत घेतलेली आहे . - सुदे ३० . २ सुंदर ; सुरेख ; दिखाऊ ; देखणा . पान्दान चांगले तर्हेदार आहे . - रा ३ . ४८७ . तर्हेबाज , तर्हेखोर वि . १ तर्हेवाईक ; चमत्कारिक स्वभावाचा ( मनुष्य ). २ लहरी ; स्वच्छंदी ; छांदिष्ट . तर्हेबाज ती अधीच खिलाडू नवर्याच्या गोष्टी ऐकून । - पला ७८ . [ तर्हा + फा . बाज प्रत्यय ] तर्हेवाईक , तर्हेवार वि . १ विशिष्ट तर्हेचा . २ चमत्कारिक ; विलक्षण ; विचित्र ; विक्षिप्त ( व्यक्ति , वस्तु ). ३ अपूर्व ; अप्रतिम ; नवीन तर्हेचा . ४ ( ल . ) सुंदर ; दिखाऊ . तर्हेवार कापड . [ फा . ]
|