मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
आनंद ! कोठें आहे येथें ?

दिवाकर - आनंद ! कोठें आहे येथें ?

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''.... देवानें शेवटी माझी अशी निराशा केली ! हाय ! स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ? जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें ! भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ? अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे ! तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं ! देवा ! तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ? मग कोठें आहे रे तो आनंद ? हाय ? नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ? - नको ! अरे काळोखा ! असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस ! - माझ्या जिवाला आग लागली ! मला तडफडून मारुं नका रे ! - आ ! माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा ! नाहीं ! मी पुनः येथें येणार नाहीं ! अरेरे ! माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना ! काय ? येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ? चला ! आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! .... ''

२ नोव्हेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP