दिवाकरांचा जन्म राजेवाडीला १८ जानेवारी १८८९ साली झाला. त्यांना द्त्तक दिले गेले पण त्यांना ते मान्य नव्हते, म्हणून ते आयुष्यभर दिवाकर हेच नांव लावत होते. खरे तर शंकर काशीनाथ गर्गे हे त्यांचे दत्तक नांव. त्यांचा समज होता दत्तक घराणे निपुत्रिक असते, आणि तो समज त्यांच्या बाबतीत खरा ठरला, त्याची पत्नी आणि तिन्ही मुले निवर्तली. त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. ते १ ऑक्टोबर १९३१ रोजी कालवश झाले. " Gods finger touches him and he slept."