मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
तुज आठवितां तोचि लाभ झाला...

संत तुकाराम - तुज आठवितां तोचि लाभ झाला...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तुज आठवितां तोचि लाभ झाला । नाठवितां गेला काळ वायां ॥१॥

ते माझी शिदोरी पुरवावी मज । नामकीर्ती भोज देईं सदां ॥२॥

वाहिली हे वाचा तुज ऐसें करीं । एक क्षणभरी न विसरें ॥३॥

तुका म्हणे तुझी दया भक्तावरी । तरी देईं हरी ध्यान तुझें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP