संत तुकाराम - कामधाम आम्ही वाहिलें व...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


कामधाम आम्ही वाहिलें विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥

आतां कोण पाहे माघारा फिरोनी । गेलों विसरोनी दहभाव ॥२॥

रिद्धि सिद्धि सुखा हाणितल्या लाता । प्राकृत तें आतां कोण पाहे ॥३॥

तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करुनी ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥४॥

N/A


References : N/A
Last Updated : March 17, 2008