मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
आली तरी आस । झालों ऐकोनि ...

संत तुकाराम - आली तरी आस । झालों ऐकोनि ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आली तरी आस । झालों ऐकोनि उदास ॥१॥

आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरि ॥२॥

भलते ठायीं पडो । देह तुझे पायीं जडो ॥३॥

तुमचें तुम्हांपाशीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥४॥

गेला मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥५॥

तुका म्हणे चित्त । खंती नाहीं वागवीत ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP