मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
नेणें कांहीं शब्द उत्तम ब...

संत तुकाराम - नेणें कांहीं शब्द उत्तम ब...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


नेणें कांहीं शब्द उत्तम बोलातां । नायके सांगतां एक गोष्टी ॥१॥

खुणे दावी हातें सर्वज्ञा नेत्रांसी । तेव्हां होय त्यासी श्रुत भाषा ॥२॥

नाहीं तरी येर येरासी सारिखें । मूर्खासी पारिखें तेंचि होय ॥३॥

तुका म्हणे तैसें नको देऊं देवा । बोलुनियां जीवा निववावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP