मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
करुनि चिंतन उच्चारीन नाम ...

संत तुकाराम - करुनि चिंतन उच्चारीन नाम ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


करुनि चिंतन उच्चारीन नाम । अखंडित प्रेम सर्व काळ ॥१॥

हेंचि विष्णूचिया दासांसी भूषण । कांपे तया भेणें कळिकाळ ॥२॥

आशा भय द्वेष लज्जा अहंकार । ऐसियांसी दूर सांडियेलें ॥३॥

तुका ह्मणे ऐसें समर्थाचें बळ । तेणें हें सकळ गोड झालें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP