मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
जेथें तेथें तूं सर्वां घट...

संत तुकाराम - जेथें तेथें तूं सर्वां घट...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


जेथें तेथें तूं सर्वां घटीं व्यापक । नाहीं ठाव एक रिता कोठें ॥१॥

ऐसा असोनियां माझिया संचिता । डोळां कां अनंता न पडसी ॥२॥

आग लागो माझ्या ऐसिया अदृष्टा । धिक मी करंटा जन्मा आलों ॥३॥

तुका म्हणे काय करावें न कळे । हृदय माझें जळे भेटीसाठीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP