हे हेगरस वंशातले होत. हे नागनाथ भक्त होते. यांनाही श्रीनागनाथांचा व अज्ञानसिद्धांचा सहवास लाभत असे. हे नेहमीच उन्मनी तुर्या अवस्थेत असत. हे सिद्धच होते. पुढे काही दिवसांनी नरंदे येते जाऊन श्री अज्ञानसिद्धांच्या समाधीपुढे उभे राहून त्यांचा प्रत्यक्ष प्रसाद मिळविला होता. हे मूळ येथे विमान टेकदीवर राहात असत. यांनी काही पदे केली आहेत.
१) आनंदलहरी २) वडवाळ क्षेत्री अधिष्ठान ज्याचे
उदाहरणार्थ एक पद -
माझे नागेशारे । तुझे ध्यान लागो मना रे ।
त्राहे त्राहे शंभो शिवा शेषशायी नारायण ॥ध्रु॥
नलगे धन संपदा कि न विषय न संतान ।
नलगे माया मोह मिथ्या प्रपंच बंधन ॥
नलगे स्वर्ग सुख नलगे अमर अमृतपान ॥
नलगे भुक्ती मुक्ती दे एक सत्य ब्रह्मज्ञान ॥१॥
माया हे मंदिर मन ममत्व निद्राकरी ।
आजी सावध करूनि ठेवी स्वरुपा माझारी ।
आजी देहत्रय निरसूनि घाली चैतन्य सागरी ।
भवार्णवी बुडालो आता तार तार गा श्रीहरी ॥२॥
दोराचे आजगर मी एक भयानक देखील ।
ब्रह्मा विष्णु रुद्र तिनी देवासी ग्रासील ।
इंद्र पाराशर रावणा तडकीयल ।
अद्यापि उतार नाही तयासी काय नवल ॥३॥
माझे मी पणा कि बापा ठकले थोर थोर ।
ब्रह्मा ही विस्मरीत झाला संसार ।
गर्वेचि नाडीले कौरव पांडव अपार ।
सर्वाभूती तूचि तू निर्वीकार रे ॥४॥
जागृती स्वप्न सुषुप्ती आवरली ।
तुर्या आठविता नागनाथ नित्य काळी ।
सद्गुरु समर्थ सनकादिकाची मावूली ।
सिद्धलिंग म्हणे सिद्ध वस्तु कोंदाटली ॥५॥