नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग दुसरा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गुरु नागनाथाय नमः । जय जय संकट हरणा गिरजाधवा का शिणविसी माझीया जीवा ।

सांगेन तरी ऐकसी बा । करीन धावा आपुला ॥१॥

उत्तम योनी मानव देहे । तेथे एक संकट आहे ।

परधन कामिनी सोये । गोविले माये दृढ ममते ॥२॥

सुख इच्छू जाता अधिक । दुःखचि वाढे देख ।

क्षणमात्र विश्रांती एक । निमिष सुख मिळेना ॥३॥

सदा धावणे अर्थालागी । न लिंपे कदापि लेश संगी ।

नाना संकट शिवयोगी । तरी वियोग जाहला माझा ॥४॥

आम्हा कळोनी भुलवण । पांथिका गोविसी जाण ।

तयाचे सुख घेता मन । दुःख यातना क्षोमती ॥५॥

जयाचे तयासारिखे व्हावया । मागितले पदार्थ द्यावया ।

धन गाठी नाही माया । कुबेर राखा राखण ॥६॥

म्हणोनी भाजा भाजित । माय बाप बंधु छळित ।

देणे घेणे मज पीडित । दाणा पाणी ॥७॥

घर तरी नाही धड । मेळवोनी पाच पंचवीस लाकड ।

कवाडावीण उघड । याव जाव ॥८॥

धान्य नाही मुष्टीभरी । सदा किरकिर ती घरी ।

घोगडा देखोनी नारी । तोही जीर्णू जाहला ॥९॥

बाळे भुकेली खाऊ खाऊ । तयासी अन्न नाही महादेवू ॥

अन्नपूर्णा तुझे नावू । तरी तू भिकारी ॥१०॥

आता या संकटा परते । बरवे विचारावे नागनाथे ।

मी चुकलिया सावध करी ते । नामी हरा ॥११॥

तुज काही मागावे जरी । तरी तू जोगी ना घरभरी ।

अखंड लोळसी राखेवरी । भिकेदारी कुटके खासी ॥१२॥

ऐसाही तू माझा । स्मशानी भूत राजा ।

पशू बैसना वोजा । स्वैच्छा रमणा ॥१३॥

हे संकट हरणी निरोपिले । या भेणे योगी पळाले ।

ते पुढलिया प्रसंगी बोलिले । तुम्हा नामी ॥१४॥

इति श्री संकट हरणी शिव पंथ ।

भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावध चित्त ।

प्रसंग वडवाळसिद्ध नागेश

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP