नागनाथ माहात्म्य - नमस्कार

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


भुजंगा तुझे नाम घेता तरावे ।

ऐसे ब्रीद तुझे त्वा खरे करावे ।

भवसंकटी त्वा मला सोडवावे ।

समस्ते सघोषे भुजंगा भजावे ॥१॥

अहो नागनाथा मला अंगिकारी ।

तुम्हा कारणे झालो मी हो भिकारी ।

आता नेऊनि बैसवी परमार्थ पायरी ।

जगावरली जडमूढासी तारी ॥३॥

भुजंगावरी आसन नाथजींचे ।

कसे शोभते सावळे रूप त्यांचे ।

कशी शोभती सावळी दिव्य गंगा ।

नमस्कार माझा गुरु नागलिंगा ॥३॥

सेवा करावी गुरुराज यांची ।

चिंता हरावी सकळिकामनांची ।

सांभाळ माझा बरवा करावा ।

आनंदमुर्ती मनी आठवावा ॥४॥

उभा देहुडा देऊनी देवराणा ।

तया वर्णिते वेदशास्त्रे पुराणा ।

स्वये शेष मौनावला स्थिर राहे ।

मना ध्यायतो नागलिंगासी पाहे ॥५॥

आणिके कसा भासतो एक पाहे ।

परि कर्म हे कर्म पाहत्यासी नाही ।

नसोडी जगी वर्तली सर्व सत्ता ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥६॥

प्रतापे बळे भिंत ही चालविली ।

ऐसी कीर्तित्रय मंडळा मिरविली ।

महाराज तो योगिथा नीजदाता ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥७॥

वडवाळ क्षेत्री अधिष्ठाण ज्याचे ।

सदा पावुले ध्यातसे पूर्ण ज्याचे ।

ज्यानी ठेविला अभयहस्त माथा ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥८॥

विधी शिणला पाहता मस्तकाते ।

हरि भागला शोधिता पादुकांचे ।

स्वयं ज्योतितो साक्ष कैवल्यदाता ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥९॥

वडवाळक्षेत्री वसे सिद्धराजा ।

अक्षराक्षरा धेतु ब्रह्मादिकाचा ।

ध्वनि न पुरे निर्जरा गुणगाता ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥१०॥

वडवाळक्षेत्री महासिद्धयोगी ।

भजावे तया सद्‍गुरु नाथ योगी ।

ऐसा त्रैलोक्या माझी समर्था ।

नमस्कार माझा गुरु नागनाथा ॥११॥

चरित्रे विचित्र बहुता प्रकारे ।

श्रुति शास्त्र मौनावली वेद चारी ।

सुखे शंकरा लाविले मोक्षपंथा ।

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP