नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग सातवा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गुरु नागनाथाय नमः । जय जय उदार फळदानी ।

भक्ता लागी निज शिरोमणी ।

घेवोनी उभा शूळपाणी ।

घाली वदना बालकाच्या ॥१॥

तहान भूक जाणे माता । घरी असलीया पुरवी अर्था ।

हा तव ऋद्धीसिद्धीचा दाता ।

अर्चित असे पूर्वीच ॥२॥

हे संकटहरणी समर्थ ।

जो पठण करील भावनायुक्त तया इच्छिले फळ देत ।

उदार हस्ते दानशूर ॥३॥

दृढ करावे श्रवण मनन । निकट निदिध्यासन ।

तात्काळ संकट हरण । गौरीरमण स्वये करी ॥४॥

आवडी व्हावी मोठी । जैसी कृपण धन गाठी ।

तैसी श्रद्धा लाठी । प्रीती मोठी दिन पठणी ॥५॥

एकांत बैसोनिया भावे । स्वइच्छे ऐसे फळ घ्यावे ।

फुका मुक्त मेघ अंगणी पडावे ।

मग कासया जावे समुद्रा ॥६॥

घरी आसलीया परीस । लोखंड लावणे आळस ।

करील तया अभाग्या सरीस ।

जाण अपैस दैवहीना ॥७॥

दैवहीना संचीतहीना । पुण्य पापी चांडाळणा ।

दरिद्री भाग्यवंतना । पुत्रहीना संतान होय ॥८॥

कोडिया महारोगिया । नाना संकट नामीया ।

वस्त्रहीना दुशालया ।

अन्न न मिळे खावया ऋद्धीसिद्धि नामी दुभे ॥९॥

देवता पडीणीया । भूत पिशाच लागलीया ।

वेताळ भैरव समंधीया । चंडमुंडी पठण हरा ॥१०॥

चोरट इच्छा मनिया । चुबुक व्यभिचारणीया ।

हे घात पात हरावया । शिव दया करील ॥११॥

मुष्टि मंत्रु शत्रु कात्रु काया ।

पचाकार फणी उतरावया ।

झोटिंग आसरा लागलीस । शिव दया करील ॥१२॥

संसार न्यास तुटावया । देणे घेणे भाजा पीडणीया ।

चुकलो मी स्वामी दया ।

दीन श्रीमंत व्हावया । एक छत्रीयणीव करावया ।

सर्वार्थी शिवदया । अनुभवीया पठण हरा ॥१४॥

बहुत काय सांगू गूढ । पुढे पठण करावे दृढ ।

तरी हरी संकट वेड ।

सिद्ध साकडे उगवी नामी ॥१५॥

ऐसे असोनी फळ निर्फळ ।

आळस का मुखी वरपडा काळ ।

भक्ति सगुण न मिळे वेल्हाळ ।

मी बुद्धिवंत की डोळे झाकणा ॥१६॥

अज्ञान सज्ञान विज्ञान । भोळे भाविक सज्जन । नरनारी अबला मिळोन ।

उमारमण हरा धरा ॥१७॥

मी वेद जाणिता पोटी । परब्रम्ह जाणिव लोटी ।

जव आळवू बैसे शिवपीठी ।

तव नेति पोटी हरी ध्यान ॥१८॥

श्रुति स्मृति करिता पठण । अव अश्रुत पडले कान ।

सफोट निघोट शिवध्यान ।

आठवा मन आमन हरा ॥१९॥

दर्शन स्पर्शन तोंड पिटी । तया मौन मुद्रा लाटी ।

अखंड मायेश्वरी मिठी । पडे गाठी शिवनादी ॥२०॥

एवं आता मीचि अपुला । संकट पडले होते मला ।

हर हरणी हरीला ।

मज अनाथा केले सनाथ शिवे ॥२१॥

सर्वांग डोळा जाण । पाहाता मी कर्महीन ।

चांडाळ परनारी लुब्धक मन ।

पीडिली होतो भवदुःखाने ।

रोगहरण शिवराज वैद्य ॥२२॥

माझिया मनीचे जे हरपले । ते सध्या उघडे दाविले ।

संतमूर्ति प्रत्यक्ष केले । हाती दिधले स्वामीया ॥२३॥

संकटहरणी शिव ग्रंथ सकळ कार्यार्थ उचित ।

योगी ऋषि मुनि वांछित ।

मागे पुढे सर्व स्वयं ज्योत । उभा अलक्ष लक्षी ॥२४॥

अज्ञानसिद्ध स्वामी ज्ञान । श्रोतया विनवी सावधान ।

सादर सद्गुरु पठणे कान ।

शिवस्वामी नाममाळा धरून ।

कंठी माळा अखंड रूळे ॥२५॥

शके तेराशे तेरा । मार्गशीर्ष शुद्ध नवमी गुरुवारा ।

प्रगटला नागेश फणीवरा । भक्तशिरी डुल्लत ॥२६॥

स्वानंद आदिनाथ । दत्तात्रय महासमर्थ ।

श्री नागनाथ वरदे ग्रंथ । अज्ञान भावे अर्पिला ॥२७॥

इति श्री संकट हरणी शिव ग्रंथ ।

भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावध चित्त । प्रसंग वडवाळसिद्धनागेश । श्रीगुरुनागनाथार्पणमस्तु ।

। श्रीसद्गुरुवडवाळसिद्धनागनाथमहाराजकी जय ।

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP