श्री स्वामी समर्थ - दिगंबरा, जय दिगंबरा

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!


दिगंबरा, जय दिगंबरा
स्वामि समर्था दिगंबरा
नाम स्मरणी दंग होऊनि
आत्मसुखाते वरा

दत्तरुप हे समर्थ असती
विश्वात्मक हे योगी दिसती
मायबाप सर्वांचे असती
शरणागत मग होता चरणी
सुखवैभव ये घरा
दिगंबरा, जय दिगंबरा

मुनिवर हा परमेश सुखाचा
दाता प्रेम, दया शांतीचा
मंत्रघोष तारक समतेचा
अनंत कोटी ब्रह्मांडाचा
नायक हृदयी धरा
दिगंबरा, जय दिगंबरा

अपत्यांवरी करितो माया
दीन अनाथांची ही छाया
भवपाशाते चुकवी सदया
संकटनाशन दत्त प्रभूला
अखंड तुम्ही स्मरा
दिगंबरा, जय दिगंबरा
स्वामि समर्था दिगंबरा

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP