श्री स्वामी समर्थ - वंदना
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
जनहितकारक साधुत्वाच्या
स्वामी जगदीशा
विनम्रभावे तुला वंदना
करितो परमेशा
ब्रह्मदेव तू, तू गीतार्णव
उदात्त मंगल तूच सत्यशिव
मानवतेचे समुचित वैभव
स्वर्ग नांदतो तव पद कमली
पुलकित दाहि दिशा
विनम्रभावे तुला वंदना
करितो परमेशा
तू विश्वात्मक, सर्वज्ञच तू
समभावाचा प्रेरक हेतू
बंधुत्वाचा अभेद्य सेतू
यशोदीप तू असशी समर्था
मुक्तीची आशा
विनम्रभावे तुला वंदना
करितो परमेशा
माय तात तू, तूच विसावा
हाच जीवनी अमोल ठेवा
सदा घडावी तुझीच सेवा
कृपादृष्टि तव नित्य असू दे
वत्सल करुणेशा
विनम्रभावे तुला वंदना
करितो परमेशा
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2022
TOP