श्री स्वामी समर्थ - चरणी लोटांगण
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
चरणी लोटांगण घालितो
समर्था, लोटांगण घालितो
सरले मीपण देवा माझे
कशास वाहू माथी ओझे
मुक्त होतसे, नाम स्मरणी
रंगुनिया जातो
चरणी लोटांगण घालितो
जन्म मृत्युचे काय प्रयोजन
अवघे जीवन तुला समर्पण
भजनानंदी आत्मसुखाच्या
अमृतात नाहतो
चरणी लोटांगण घालितो
करुणाकर तू त्रिभुवन सुंदर
नयनांमधले भाव शुभंकर
तुझ्या कृपेच्या छायेखाली
भक्त सुखे नांदतो
चरणी लोटांगण घालितो
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2022
TOP