मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| कीर्तन महात्म्य ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक कीर्तन महात्म्य श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaykirtanmarathiकीर्तनज्ञानोदयभजनमराठी कीर्तन महात्म्य Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग - १श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--सकळ धर्माचे कारण ॥ नामस्मरण हरिकीर्तन ॥ दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥१॥निजधर्म हा चोखडा ॥ नाम उच्चारु घडघडा ॥ भक्तीमुक्तीचा संवगडा ॥ हा भवासिंधुतारक ॥धृ०॥लावण्य मान्यता विद्यावंत ॥ सुखे स्वजन पुत्र कलत्र ॥ विषय भोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणावर्ती ॥२॥जें जें देखणें सकळ ॥ तें स्वन्पीचें मृगजळ ॥ ह्मणोनि चिती चरणकमळ ॥ रखुमादेवीवर विठठलाचें ॥३॥ ॥धृ०॥अभंग - २श्रीनामदेव महाराज वाक्ये--ऐकतां कीर्तण होती जीवन्मुक्त ॥ दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥मृत्युलोकी जो जन्म ईच्छा नर ॥ त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥भक्ति सारमृत श्रेष्ठ कलियुगी ॥ उध्द्रिले योगी ब्रह्मादिक ॥३॥नामा ह्मणे मज नाही चिंता भय ॥ ह्र्दयीं तुमचे पाय पुरे आतां ॥४॥ ॥धृ०॥कीर्तनें निर्दळिले दोष ॥ जप तप ठेले निरास ॥१॥यमलोक पाडिला वोस ॥ तीर्थाचि आस निराश जाहली ॥५३१॥अभंग - ३श्रीनामदेव महाराज वाक्ये--नाचूं कीर्तनाचे रंगी ॥ ज्ञानदीप लाऊं जगी ॥१॥सर्व सांडुनी माझाई ॥ वाचे विठठल रखुमाबाई ॥२॥परेहुन परतें घर ॥ तेथें राहूं निरंतर ॥३॥सर्वाचें जे अधिष्ठान ॥ तेंचि माझें रुप पूर्ण ॥ अवघी सत्ता आलिहाता नामयाचा खेचरी दाता ॥५॥ ॥धृ०॥अभंग - ४श्रीएकनाथ महाराज वाक्य--नारदें केलासे प्रश्न ॥ सांगतसे जगज्जीवन ॥ कलीमाजी प्रमाण ॥ कीर्तनें करावएं ॥१॥माहा पापीया उध्दार ॥ पावन करती हरिहर ब्रह्मादि समोर ॥ लोटांगण घालिती ॥२॥श्रुति स्मृति वाक्यार्थ ॥ कीर्तन तोची परमार्थ ॥ शास्त्राचा मथितार्थ । कीर्तन पसारा ॥३॥एका शरण जनार्दन ॥ कीर्तनें तरती विश्वजन ॥ हें प्रभूचे वचन ॥ धन्य धन्य मानावें ॥४॥ ॥धृ०॥अभंग - ५श्रीएकनाथ महाराज वाक्य--कीर्तन श्रेष्ठ कलियुगी सेवा ॥ तरले पातली ते देवा ॥१॥वाल्हा तारिला कीर्तनी ॥ पावन झाला त्रिभुवनी ॥२॥गणिका कीर्तनें तारली ॥ मोक्षधामा ती नेली ॥३॥आजामेळ चोखामहार । कीर्तनी तरलें अपार ॥४॥एका जनार्दनी कीर्तन ॥ तिन्ही लोक जाले पावन ॥५॥ ॥धृ०॥अभंग - ६श्रीएकनाथ महाराज वाक्य--तरले तरती भरंवसा ॥ कीर्तन महिमा ऐसा ॥१॥ह्मणोनिया हरिचे दास ॥ कीर्तन करिती सावकाश ॥२॥एका जनार्दनी कीर्तन ॥ आनंदें होती तें पावन ॥३॥ ॥धृ०॥अभंग - ७श्रीएकनाथ महाराज वाक्य--जेथें सर्वदा कीर्तन घोष ॥ जाती दोष पळुनी ॥१॥यमधर्म सांगे दूतां ॥ तुह्मी सर्वथा जाऊं नका ॥२॥जेथें स्वयें हरि उभा ॥ कोण शोभा तुमची ॥३॥तुह्मी रहावें उभें पुढें ॥ आले कोडें निवारावें ॥४॥एका जनार्दनी कीर्तन ॥ श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥ ॥धृ०॥अभंग - ८श्री तुकाराम महाराज वाक्य--करावें कीर्तन ॥ मुखें गावें हरिचें गुण ॥१॥मग कांही नव्हे बाधा ॥ काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ शांतिखड हाती ॥ काळासी ते नागविती ॥३॥तुका ह्मणी दाता सखा ॥ ऐसा अनंतासारिखा ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- चक्रे अभिमानाचा करि चेंदा ॥ मोह ममता छेदी गदा ॥ शंखे उद्बोधी निजबोधा ॥ निज कमळे सदा निज भक्त पुजी ॥५३५॥अभंग - ९श्री तुकाराम महाराज वाक्य--कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचें उत्त्म चरणरज वंदिता ॥१॥जळती दोषांचे डोंगर शुध्द होती नारी नर ॥ गाती एकती सादर जे पवित्र हरिकथा ॥२॥तीर्थे तया ठाया यती पुनीत व्हावया ॥ पर्वकाळ पायांतळी वसे वैष्णवां ॥३॥अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा ॥ तुका ह्मणे ब्रह्मा नेणे वर्णू या सखा ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- रामकृष्णादि नामश्रेणी ॥ अखंड गर्जे ज्याची वाणी ॥ त्यासी तीर्थे यती लोटांगणी ॥ सुरवर चरणी लागती स्वये ॥५४०॥अभंग - १०श्री तुकाराम महाराज वाक्य--कीर्तण चांग कीर्तन चांग ॥ होय अंग हरिरुप ॥१॥प्रेमछंदे नाचे डोले ॥ हरपले देहभाव ॥२॥एकदेशी जीव कळा । हा सकळा सोयरा ॥३॥तुका ह्मणे उरला देव ॥ गेला भव ते काळी ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- जेवढी नामाची निज शक्ती ॥ एवढे पाप नाही त्रिजगती ॥ नामापासी चारी मुक्ती ॥ जाण निश्चिती विदेहा ॥५४३॥अभंग - ११श्री तुकाराम महाराज वाक्य--यम सांगे दूता तुह्मां नाही तेथें सत्ता ॥ जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥नका जाऊ तया गांवां नामधारकाच्या शिवा ॥ सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती ॥२॥चक्र गदा घेऊनि हरि उभा असे त्यांचे द्वारी ॥ लक्ष्मी कामारी ऋध्दिसिध्दी सहित ॥३॥ते बळिया शिरोमणी हरिभक्त्य मेदिनी ॥ तुका ह्मणे कानी यम सांगे दूतांचे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- साच नामाचे निज तेज ॥ यम बंदी चरणरज ॥ नामापाशी आधोक्षज ॥ चतुर्भुज स्वये तिष्टे ॥५४१॥अभंग - १२श्रीएकनाथ महाराज वाक्य--येती कीर्तना आल्हादें ॥ गाती नाचती परमानंदे ॥ सुखाचे ते दोंदे ॥ आनंदे तयासी ॥१॥धन्य धन्य कीर्तन ॥ धन्य धन्य संतजन ॥ जाले कीर्तनी पावन ॥ परमानंद गजरी ॥२॥हरि कृष्ण गोविंद ॥ हाची तया नित्य छंद ॥ तेणे जाय भेदाभेद ॥ कीर्तन गजरीं ॥३॥एका जनार्दनी सार ॥ कीर्तनी केलासे निर्धार ॥ आणिक नाही दुजा विचार ॥ कीर्तनावांचूनी ॥४॥ ॥धृ०॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे --मागणे हे एक तुजप्रती ।भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद --पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजाआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP