मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका १५ पौर्णिमा ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका १५ पौर्णिमा श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी देवभक्त एकत्व Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--पन्नासा अक्षरी करिसी भरोवरी ॥ शेखिं तुझें तोंड तुज वैरी रया ॥१॥यापरी नामाची वोळ मांडूनी ॥ संसार दवडूनि घाली परता ॥धृ०॥रकारापुढें एक मकार मांडी कां ॥ उतरसी समतुका शंभुचिया ॥२॥बाप रखुमादेवीवर विठठल ह्र्दयी ॥ आपुली आणवाही त्रिभुवनी रया ॥ ए०भा०अ०२० -- नरक स्वर्ग इहलोक ॥ याची प्रीती सांडूनि देख साधावे गा आवश्यक ॥ ज्ञान चोख का निज भक्ति ॥१३५॥ज्ञान सादावया लागी जाण ॥ कष्टवे नलगे गा आपण । सप्रेम करिता माझे भजेन ॥ दवडिता ज्ञान घररिघे ॥१३६॥अभंग -२श्री नामदेव महाराज वाक्य--जन्ममरणाची कायसी हे चिंता ॥ तुझ्या शरणागता पांडुरंगा ॥१॥वदनी तुझें नाम अमॄतसंजीवनी ॥ असतां चक्रपाणी भय कावणा ॥२॥ह्र्दयीं तुझे रुप बिंबलें साचार ॥ तेथें कवणा पार संसाराचा ॥३॥नामा ह्मणे तुझ्या नामाची परिवार ॥ असतां कळीकाळ पायातळीं ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ -- सत्य ज्ञान अनंत ॥ परब्रह्म मी निश्चित ॥ ऐसें जाणुनि मज भजत ॥ उत्तम भक्त ते जाण ॥११२७॥जेथें चक्रपाणी रक्षिता, तेथें न रिघे भयाची कथावार्ता, यापरी कीर्तिवंता, हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥११२८॥अभंग -३श्रीएकनाथ महाराज वाक्य--सर्वभूती भगवद्भाव ॥ तंव तो भावचि झाला देव ॥१॥आह्मा ग्रासूं आला काळ ॥ तंव तो काळच झाला कृपाळ ॥२॥एका जनार्दनी शरण आह्मा कैचें जन्ममरण ॥३॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- जो सर्व भुताच्या ठाई ॥ द्वेषाते नेणेची कांही ॥ आपपरु नाही चैतन्या जैसा ॥१४४॥गाईची तृषा हारु ॥ का व्याघ्रा विष होऊनि मारु ॥ नेणेची गा करु ॥ तोय जैसे ॥१४७॥तओसी अघवि याची भूतमात्री ॥ एक पणे जया मैत्री । कृपेसी धात्री आपणचि जो ॥१४८॥अभंग -४श्रीएकनाथ महाराज वाक्य--भावचि थोर कीं देवचि थोर ॥ दोहींचा निर्धार करुनि पाहा ॥१॥जंव जंव भाव तंव तंव देव ॥ भावचि नाही तेथें देवचि वाव ॥२॥एका जनार्दनी जंव जंव्व भाव लटकेम असेल तरी तरी ह्र्दयी पहा हो ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- एवं जीवांचा निर्वाहो ॥ करिता निज ह्र्दयी असे देवो ॥ तो पहावया बाहेरी धांवो तै मूर्ख पहाहो मी झालों ॥११४६॥तीर्थी क्षेत्री भेटेल देवो ॥ हा आपले ह्र्दयीचा भावो ॥ निजभावेंवीण पहाहा ॥ तीर्थाही देवो असेना ॥११४७॥अभंग -५श्रीएकनाथ महाराज वाक्य--भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली ॥ भक्तीनें मुक्तितें वाढविलें ॥१॥भक्तितें माता मुक्ति ते दुहिता ॥ जाणोनि तत्वतां भजन करी ॥२॥भक्ति सोडोनि मुक्ति वांछितीं वेडी ॥ गूळ सोडोनि कैसी जे गोडी ॥३॥संतोषोनि भक्ति ज्यासी दे मुक्ति ॥ तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥एका जनार्दना एक भाव खरा ॥ भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०११ -- तैसा मी एकीचि परी, आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊनि वरी, चित्तातें गा ॥६८५॥परितेचि भक्ति ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरावाचुनि आनारिसी, गतीचि नेणे ॥५८६॥तैसें सर्वभावसंभारे, न धरत प्रेम एक सरे, मजमाजी संचरे, मीचि होऊनि ॥६८८॥ अभंग -६श्रीएकनाथ महाराज वाक्य--भाव तोचि देव भाव तोचि देव ॥ ये अर्थी संदेह धरुं नका ॥१॥भावें भक्ति फळे भावें देव मिळे ॥ निज भावे सोहळे स्वानंदाचे ॥२॥एका जनार्दनी भावाच्या आवडी ॥ मनोरथ कोडी पुरती तेणें ॥३॥भावचि कारण भावचि कारण ॥ यापुरतें साधन नाहीं नाही एका जनार्दनी भावचि कारण ॥ सच्चिदानंदावरील दावी खूण ॥५॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०८ -- ऐसे जे नित्ययुक्त ॥ तयासी सुलभ मी सतत ॥ म्हणऊनी देहांती निश्चत ॥ मीचि होती ॥१३९॥अभंग -७श्रीएकनाथ महाराज वाक्य--आवसे राती अधारी ॥ प्रभा आंतु आणि बाहेरी ॥१॥मना पाहलें रे मना पाहिले रे ॥ बुध्दि बोध इंद्रिया सम जाहले रे ॥धृ०॥नयनी पाहतां न दिसे बिंब ॥ अवघा प्रकाश स्वयंभू ॥२॥एका जनार्दनी पालटू ॥ जनी वनी लखलखाटू ॥३॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- आतु बाहेरी चोखाळु ॥ सूर्य तैसा निर्मळु ॥ आणि तत्वार्थीचा पायाळू ॥ देखणा जो ॥१७९॥व्यापक आणि उदात्त ॥ जैसा का आकाश ॥ तैसे जयाचे मानस ॥ सर्वत्र गा ॥१८०॥अभंग -८श्रीएकनाथ महाराज वाक्य--सूर्याचि अवनी मा सूर्यचि आकाश ॥ त्याहीवरी कैसा उगवला चंडाशु ॥१॥दीपाचें टवळें मा दीपाचिया वाती ॥ त्याहीवरी कवणें प्रकाशिली ज्योति ॥॥धृ०॥चंद्रचि रात्री मा चंद्रचि चकोरें ॥ त्यातें ही निवविजे कवणे निज चंद्रें ॥२॥एका जनार्दनी नामे सच्चिदानंद स्वरुपी भेटल्या कवण पैं आनंद ॥३॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- हें, असो मग ह्मणितलें ॥ जें कां तुज सांगितलें ॥ तेही भक्त भले ॥ पढियते आह्मा ॥१२३॥परि जाणोनियां मातें ॥ जे पाहो विसरले माधुतें ॥ जैसें सागरा येऊनि सरिते ॥ मुरडावें ठेलें ॥१२४॥तैसी अंत:करणकुहरी जन्मली ॥ जयाची प्रतीतिगंगा मज मीनली ॥ तो मी हे काय बोली ॥ फार करु ॥१२५॥अभंग -९श्रीएकनाथ महाराज वाक्य--रविबिंबु पिळुनी रोंविली भूमी ॥ पाहो गेलों तव नाही आह्मी तुह्मी ॥१॥अवघेपणें झाला तेथें ॥ चराचर ह्याले आपैतें ॥धृ०॥चालों जातां चालणें खुंटे ॥ पाहों जाय तें तेथेंचि भेटे ॥२॥एका जनार्दनी एकला भेटी ॥ स्वप्रभा एकपणेही घोटी ॥३॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- जो निजानंदे घाला ॥ परीणामु आयुष्य आला ॥ पूर्णते जाहाला ॥ वल्लभु जो ॥१७१॥जयाचिया ठायी पाडवा ॥ अपेक्षे नाही रिगावा ॥ सुखासि चढावा ॥ जयाचे आसणे ॥१७२॥अभंग -१०श्री तुकाराम महाराज वाक्य--आंत हरि बाहेर हरि ॥ हरिनें घरी कोंडिलें ॥१॥हरिनें कामा घातला चिरा ॥ वित्तवंरा मुकविलें ॥२॥हरिनेम जीवें केलि साटी ॥ पाडीली तुटी सकळांसी ॥३॥तुका ह्मणे वेगळा नव्हे ॥ हरि भोवें भोवतला ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- तैसा मी वांचूण कांही ॥ आणीक गोमटेंचि नाही मजचि नाम पाही ॥ जिणेया ठेविलें ॥३३६॥जिही मातेंचि अध्यायन, केलें जें आतं बाहेरि मियांचि धाले ॥ जयाचें जीवित्व जोडलें ॥ मजचि लागीं ॥३६१॥जे अहंकार वाहत आंगी ॥ आह्मी हरीचे भूषवयालागीं ॥ जे लोभिये एकचि जगी ॥ माझेनि लोभें ॥३६२॥ज्ञा०अ०७ -- हे असा आणिक कांही ॥ तया सर्वत्र मी वांचूनि नाही सबाह्य जळ डोहीं ॥ बुडालिया घटा ॥१३३॥अभंग -११श्री तुकाराम महाराज वाक्य--तरुवर बीजा पोटीं ॥ बीज तरुवरासेवटी ॥१॥तैसें तुह्मा आह्मां जाले ॥ एकी एक समावलें ॥ उदकावरी तरंग ॥ तरंग उदकाचें अंग ॥३॥तुका ह्मणे बिंबछाया ॥ ठायी पावली विलया ॥४॥ए०भा०अ०१२ -- हो कां तरंगू जैसा सागरी ॥ त्यासी जळचि तळीं वरी ॥ तैसा माझा भक्त मज माझारी ॥ सबाह्यभ्यंतरी मद्रुप ॥११३३॥जेवी निजेल्या पुरुषाची छाया ॥ पुरुषातळी जांयलया ॥ तेवी सविंकार गिळोनि माया ब्रह्म एकलया एकाकी ॥७२॥अभंग -१२श्रीएकनाथ महाराज वाक्य--लवण मेळवितां जळें ॥ काय उरले निराळें ॥१॥तैसा समरस जालों ॥ तुज माजी हरपलों ॥२॥ अग्नि कर्पराच्या मेळीं ॥ काय उरली काजळी ॥३३॥तुका ह्मणे होती तुझी माझी एक ज्योती ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०७ -- तेथ आर्तुतो आर्तीचेनि व्याजे जिज्ञासु तो जाणावयाचि लागी भजे ॥ ती जेनि तेणें इच्छिजे अर्थसिध्दि ॥११०॥मग चौथियाच्या ठायी कांहीचि करणें नाही ह्मणोनि भक्तु एकु पाही ॥ ज्ञानिया जो ॥१११॥जै तया ज्ञानाचेनि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवडसे ॥ मग मीची झाला समरसे ॥ आणि भक्तुही तेविचि ॥११२॥अभंग -१३श्री तुकाराम महाराज वाक्य--पहा रे हें दैवत कैसे ॥ भक्तपिसें भाविका ॥१॥पाचारील्या सारिसें पावे ॥ ऐसे सेवे वराडी ॥२॥शुष्काकाष्टी गुरगुरू ॥ लाज हरि न धरितां ॥३॥तुका ह्मणे अर्धनारी ऐसी धरी रुपडी ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१९ -- पुरुषे याचे उपासन ॥ जरी करी सकामन ॥ तै कामधनुच्या ऐसे जाण ॥ करिती पूर्ण सकळ कामना ॥४१४॥अभंग -१४श्री तुकाराम महाराज वाक्य--भक्ताहुनि देवा आवडतें काई ॥ त्रिभुवनी नादी आन दुजें ॥१॥नावडे वैकुंठ क्षीराचा सागर ॥ धरोनि अंतर राहे दासा ॥२॥सर्व भावें त्याचे सर्वस्वेंही गोड ॥ तुळसीदळ कोड करुनि घ्यावें ॥३॥सर्वस्वे त्याचा ह्मणवी विकिला ॥ चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥४॥तुका ह्मणे भक्ति सुखा बांधिला ॥ आणिक विठठला धर्म नाहीं ॥५॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- आम्ही तयाचे करु ध्यान ॥ ते आमुचे देवतार्चन ॥ ते वाचूनि आन ॥ गोमटे नाही ॥२३६॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजाआरती ---१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ================ N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP