मालिका ८ अष्टमी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)
अभंग - १
श्री तुकाराम महाराज वाक्य--
म्हणवितों दास न करितां सेवा ॥ लंडपणे देवा पोट भरी ॥१॥
खेटे कोठे सरे तुझे पायापाशी ॥ अंतर जाणसी पांडुरंगा ॥२॥
आचरण खोटे आपणाशी ठावे ॥ लटिके बोळावे दुसरे ते ॥३॥
तुका ह्मणी ऐसा आहे अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२४ - माता बाळकाचें पिउरवी कोड ॥ तैसे ते माझे लळीवाड ॥ त्याचे प्रेमची मज गोड ॥ उपचारचाड मज नाही ॥३५७॥

अभंग -२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
काय वांचोनिया झालों भूमिभार ॥ तुझ्या पायी थार नाही तरी ॥१॥
जातां भलें काय डोळियांचे काम । जेव पुरुषोत्तम न देखती ॥२॥
काय मुख पेब श्वापदांची धाव । नित्य तुझेगांव नुच्चारिता ॥३॥
तुका ह्मणे आतां पांडुरंगाविण । न वांचता क्षण जीव भ्याला ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - येरे अवषृभ जो आघवा । तो आरुढोनि मद्भाव मजचि आंत पांडवा ॥ पैठा जाहला ॥४१४॥
ऐसे भजतेनि प्रेमभावे ॥ जया शरीरही पाठी न पावे ॥ तेणे भलतया व्हावे ॥ जातीचिया ॥४१५॥

अभंग -३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुमची तो भेटी नव्हे ऐसी झाली ॥ कोरडीच बोली ब्रह्मज्ञान ॥१॥
आतां न बोलावे ऐसे वाटे देवा ॥ संग न करावा कोणासवे ॥२॥
तुका ह्मणे माझी राहिली वासना ॥ आवडी दर्शनाचीच होती ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१० - अज्ञानाचिये राती ॥ माजि तमाची मिळणी दाटती ॥ ते नाशनि घाली परौती ॥ तयां करी नित्योदय ॥१४३॥

अभंग -४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुझा म्हणवून तुज नेणी ॥ ऐसे काय माझेजिणे ॥१॥
तरि मज कवणाचा आधार ॥ करोनिया राहों धीर ॥२॥
काय शुध्दचि ऐकिला ॥ भेटी नव्होता गां विठठला ॥३॥
तुका ह्मणे आता ॥ अभय देई पंढरिनाथा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२४ - ऐशी देखोनि अनन्यप्रीती ॥ मी सर्वस्वें भुललो श्रीपती ॥ मग न पाहतां कुळजाती ॥ त्याच्या घराप्रती मी धावे ॥३४३॥
गर्जता नामाचे पवाडे ॥ माझी कीर्ती गाति वाडेकोडे ॥ माझ्या रामनामापुढें ॥ द्वंद्वाचे उडे बाधकत्व ॥३४६॥

अभंग - ५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
वायां ऐसा जन्म गेला ॥ हे विठठला दु:ख वाटे ॥१॥
नाही सरता झालों पाई ॥ तुम्ही जई न पुसा ॥२॥
कां मी जितों संसारी ॥ अद्यापवरी भूमिभार ॥३॥
तुका ह्मणे पंढरिनाथा ॥ सबळ व्यथा भवरोग ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२४ - त्यासि अल्पही विंचबु पावे ॥ तो सर्वांगे करुंधांवे ॥ त्याचें नाम जिही स्मरावे ॥ त्यांसी म्या तारावें सर्वथा ॥३५५॥
जेवी तान्हयालागी माता ॥ तैसी त्या भक्तांची मज चिंता ॥ त्याची सेवाही करितां ॥ मी सर्वथा लाजे ना ॥३५६॥
 
अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भेटी लागी पंढरिनाथा ॥ जिवा लागली तळमळ व्यथा ॥१॥
कधीं कृपा करसी नेणे ॥ मज दीनाचे धावणे ॥२॥
शिणले माझे मन ॥ वाट पाहाता लोचन ॥३॥
तुका ह्मणे भुक ॥ तुझे पहावया मुख ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०५ - नित्य ध्याता हरिचे चरण ॥ करी भक्तांचे रोग दु:ख हरण ॥ इतुकेच राया नव्हे जाण ॥ करि निर्दळण भवरोगा ॥३६८॥
भक्तांचे पुरवी मनोरथ ॥ तें तू ह्मणसी विषययुक्त ॥ परमानंदे नित्यतृप्त ॥ निववी निजभक्त चरणाअमृते ॥३६९॥

अभंग -७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
सर्व भावे आलों तुजचि शरण ॥ काया वाचा मन सहित देवा ॥१॥
आणिक दुसरे नय माझ्या मना ॥ राहिली वासना तुझ्या पायीं ॥२॥
माझिये जीवीचें कांही जडभारी ॥ तुजविण वारी कोण दुजे ॥३॥
तुझी आम्ही दास आमुचा तु ऋणी ॥ चालत दुरुनी आलें मागे ॥४॥
तुका ह्मणे आतां घेतले धरणें ॥ हिशोबा कारण भेटी देई ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०५ - वानूं चरणाची पवित्रता । शिव पायवणी वाहे माथां । जे जन्मभूमि सकळ तीर्था ॥ पवित्रपण भक्ता चरणे ध्यानें ॥३७०॥
अवचटे लागल्या चरण । पवित्र झाले पाषाण ॥ माजे जाणोनि करिती ध्यान ॥ त्यांचे पवित्रपण काय वानू ॥३७१॥

अभंग -८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
त्राहे त्राहे त्राहे सोडवी अनंता ॥ लागो दे ममता तुझे पायी ॥१॥
एकचि मागणे देई तुझी गोडी ॥ न लावी आवडी आणिकांची ॥२॥
तुझे गुण नाम वर्णीन पोवाडे ॥ अवडीच्या कडें नाचों रंगी ॥३॥
बापा विठठलराया हेचि देई दान ॥ जोडती चरण जेणे तुझ ॥४॥
आवडी सारिखे मागितलें जरी ॥ तुका ह्मणे करी समाधान ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०५ - करुनि सर्वांगांचा वोडा ॥ नित्य भक्तांची निवारी पीडा ॥ जो कां भक्तांचीया भिडा ॥ रणरंगी फुडा वगवी रथ ॥३७७॥
ते चरण वंदितां साष्टांगी ॥ भक्तां प्रतिपाळी उत्संगो ऐसा प्रणत पाळ कृपा बोधी दुसरा जगी असेना ॥३७८॥

अभंग -९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कैसे करूं ध्यान कैसा पाहो तुज ॥ वर्म दावी मज याच कासी ॥१॥
कैसी भक्ती करुं सांग तुझी सेवा ॥ कोण्या भावे दवा आतुडसी ॥२॥
कैसी कीर्ती वाणु कैसा लक्ष आणू ॥ जाणु हा कवणु कैसे तुज ॥३॥
कैसे गाऊं गीती कैसा ध्याउ चित्ती कैसी स्थिती मती दावी मज ॥४॥
तुका म्हणे जैसे दास केले देवी ॥ ऐसे हे अनुभवी मज ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१७ - परि, श्रुति स्मृतीचें अर्थ । जे आपण होऊनि मूर्त ॥ अनुष्ठाने जगा देत ॥ वडील जे जे ॥८६॥
तयाचि आचरती पाउले ॥ पाऊनि सात्विक श्रध्दा चाले ॥ तो तेचि फळ ठेविले ॥ ऐसे लाहे ॥८७॥
ज्ञा०अ०१० - तैसा कृपाळूवांचा रावो । ह्मणे आइके गा महाबाहो ॥ सांगितलाचि अभिप्रायो ॥ सांगेन पुढती ॥५४॥
आह्मा येतु लियाचि कारणे । तेंचि तें तुजशी बोलणे ॥ परी असो हें अंत:करणे ॥अवधान देई ॥६१॥
तरी ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम ॥ जे अक्षरे लेऊनि परब्रह्म ॥ तुज खोवसि आलें ॥६२॥

अभंग -१०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भेटीलागी जीवा लागलीसी आल ॥ पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ॥ तैसे माझे मन वाट पाहे ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली ॥ पाहा तसे वाठुली माहेरिची ॥३॥
भुकेलिया बाळा अति शोक करी ॥ वाट पांहे पारी माऊलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसें भूक ॥ धावूनि श्रीमुख दावी देवा ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ - माता देखोनी प्रेम भावे बालक उडी घालू धावे ते धावे स्वये झेलित पावे ॥ अतिसद्भावे निजमाता ॥३२४॥
तैसा सप्रेम जो निजभक्त । त्याच्या भजनासवे भगवंत ॥ भुलाला चाले स्वानंद युकुस्वये सांभाळितु पदो पदी ॥३२५॥
ए०भा०अ०१४ - ज्या चंद्राचे चंद्रकिरण ॥ आर्त चकोरालागी जाण ॥ स्वानंद चंद्रामृते सबोन ॥ पवभावे पूर करिताती ॥३॥

अभंग -११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मातेविण बाळो ॥ आणीक न माने सोहळा ॥१॥
तैसें जाले माझ्या चित्ता तुजविण पंढरीनाथा ॥२॥
वाट पाहे मेघा बिंदु ॥ नेघे चातक सरिता सिंधू ॥३॥
सारसाशी निशी ॥ ध्यान रवीच्या प्रकाशी ॥ जिवनावीण मत्स्य जैसे धेनूलागी वत्स ॥५॥
पतिव्रते जिणे ॥ भ्रताराच्या वर्तमाने ॥६॥
कृपणाचें धन ॥ लोभ्यालागी जैसे मन ॥७॥
तुका ह्मणे काय ॥ तुजविण प्राणराहे ॥८॥
ज्ञा०अ०८ - आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोस कायसा ॥ ह्मणऊनि हा ध्वनी ऐसा ॥ न वाखाणावा ॥१२९॥
तिही जे वेळीं मी स्मरावा । ते वेळी स्मरिला की पावावा ॥ तो आभार ही जीवा सहवेचिना ॥१३०॥

अभंग -१२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
वाट पाहे हरि कां नये अजुनि ॥ निष्ठर कां मनी धरियले ॥१॥
काय करु धीर होत नाही जीवा ॥ काय आड ठेवा उभा ठेला ॥२॥
नाही माझा धांवा पडियेला कानी ॥ कोठी चक्रपाणी गुंतलेती ॥ नाही कळो आले अंतरा अंतर ॥ कृपावंत फार ऐकतो ॥४॥
बहुतां दिसांचे राहिले भातुके ॥ नाही कवतुके कुरवाळिले ॥५॥
तुका ह्मणे देई एक वेळां भेटा ॥ शीतळ हे पोटी होईल मग ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - आपुली ताहान भूक नेणें ॥ तान्हया निके ते माउलीसिचि करणी । तैसे अनसरले जे मज प्राणी ॥ तयांचे सर्व मी करी ॥३४०॥

अभंग -१३
श्री तुकाराम महाराज वाक्य--॥
भक्ति प्रति पाळ दीन वो वत्सले ॥ विठठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडीला विसर माझा काय गुणे ॥ कपळउणे काय करु ॥२॥
तुका ह्मणे माझे जाळुनि संचित्त ॥ करी वो उचित भेट देई ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - येर माते नेणोनि भजन । ते वायाची गा आनोआन ॥ म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते नीदोष हो आवे ॥३५॥

अभंग -१४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मन वाचातीत तुझे हें स्वरुप ह्मणोनियां माप भक्ति केले ॥१॥
भक्तिचिया मापे मोजितो अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥२॥
योग याग तपे देहाचिया योगे । ज्ञानाचिया लागे न सांपडसी ॥३॥
तुका ह्मणे आम्ही भोळ्या भावें सेवा ॥ घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - मग तिही जे जे करावे तें मजचि पडिले आघवे ॥ जैसी आंजात पक्षाचे निजीवें ॥ पक्षिणी जिये ॥३३९॥

अभंग -१५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
उध्दव अक्रूरासी आणीक व्यास अंवऋषी ॥ रुक्मांगदा प्रल्हादासी दाविले ते दाखवी ॥१॥
तरि मी पाहेन पाहिन तुझे श्रीमुखचरण ॥ उताविळ मन ॥ तयाकारणें तेथें ॥२॥
जनका श्रुतदेवा करी ॥ कैसा शोभलासी हरी ॥ विदुराच्या घरी ॥ कण्या घरी कवतुकें ॥३॥
पांडवां आकांती ॥ तेथें पावसी स्मरती ॥ घातले द्रौपदी ॥ यागी बिरेडे चोळीचे ॥४॥
करि गोपीचे कवतुक ॥ गाई गोपाळांसी सुख ॥ दावी तेचि मुख दृष्टी माझ्या आपुले ॥५॥
तरी तूं अनाथाचा दातां ॥ मागतियां शरणांगतां ॥ तुका ह्मणे आतां ॥ कोड पुरवी हे माझे ॥६॥ ॥धृ०॥
तज्ञा०अ०९ - यां माझिया सायुज्याची चाड ॥ तरी तेचि पुरवी कोंड ॥ का सेवा ह्मणती तरी आड ॥ प्रेम सुये ॥३४१॥
ऐसा मनी जो जो धरिती भावो ॥ तो पुढा पुढा लागे तयां देवो । आणि दिधली याचा निर्वाहो ॥ तोही मीचि करी ॥३४२॥
हा योग क्षेम आघवा । तयांचा मजचि पडिला पांड्वा । जैयांचिया सर्व भावा ॥ आश्रय मी ॥३४३॥

अभंग -१६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
नमो विश्वरुपा विष्णु माय बापां ॥ अपार अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितो रंक दासा मी सेवक ॥ वचन ते एक अयकावे ॥२॥
तुझी स्तुती वेद करीता भागला ॥ निवांतची ठेला नेति नेति ॥३॥
ऋषी मुनि बहुसिध्द कविजन ॥ वर्णितां तुझे गुण न सरती ॥४॥
तुका ह्मणे तेथे काय माझी वाणी ॥ जे तुझ वाखाणि कीर्ती देवा ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - यालागी सांडूनि अभिमान ॥ मज ह्रदयस्था रिघालीया शरण ॥ तुज मी उध्दरीन जाणो ॥ देवकीची आण उध्दवा ॥५५॥

अभंग -१७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भाग्यवंता हेंचि जोडी ॥ परवडी संताची ॥१॥
धन घरी पांडुरंग ॥ अभंग जे सरेना ॥२॥
जनाविरहित हा लाभ ॥ ठांचे नभ सांठवणें ॥३॥
तुका ह्मणे विष्णुदासा नाही आशा दुसरी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२६ - कां ज्याचे मुखी हरिनाम कीर्ति ॥ त्याचे पाय जै मज माजी येती ॥ तै सकळ पापे माझी जाती ॥ एस भागीरथी खबोले ॥३६०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---

१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP